व्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर!!!

नमस्कार मित्रांनो, आज चौदा फेब्रुवारी, जीवनातल्या प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यासाठी हवं असलेलं निमीत्त..

तरुणाईच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच, वेध लागतात, प्रेमात पडण्याचे आणि प्रेम करण्याचे!!

ह्या वयात आपली नजर त्या जोडीदाराला शोधत असते, काही नशीबवानांना त्यांचं प्रेम गवसतं, आणि उरलेल्यांची कॉलेजची वर्षे ह्या आकर्षणातच निघुन जातात, शिक्षण संपते, नौकरी लागते, बहुतांशाच्या प्रेमाच्या इच्छा अधुऱ्या, अतृप्तच राहतात.

आता वेध लागतात लग्नाचे. ड्रीम पार्टनर सोबत पुर्ण न झालेली स्वप्ने, लग्नानंतर मनसोक्त पुर्ण करायचे, मनोमन ठरवले जाते. एंगेजमेंट ते हनिमुन, हा प्रवास, अलगद हवेत तरंगत, आयुष्याची गुलाबी स्वप्ने जगण्याची वचने देऊन, पार पडतो.

आणि थोड्याच दिवसात विमान धाडकन जमिनीवर लॅंड होतं….आणि खडबडुन जाग येते…..

लग्न झाल्यावर अंगावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची अचानक जाणीव होते, (न झाल्यास, मुद्दाम पुन्हा पुन्हा करवुन दिली जाते.)

“पुरे झाला अल्लडपणा, आता मोठे व्हा, आतातरी सुधरा” चा जयघोष सुरु होतो. प्रत्यक्ष आयुष्य आणि स्वप्नातलं आयुष्य यांच्यातलं अंतर हळुहळु वाढत जातं, आणि एके दिवशी आता ड्रिम लाईफ जगणं, अशक्य वाटायला लागतं…….

तुमचं ‘ड्रीम लाईफ’ प्रत्यक्षात आणण्यासाठी या सात टिप्स लक्षात घ्या

सुरुवातीच्या दिवसांत, प्रेमात चिंब चिंब भिजलेलं नातं, हळुहळु कोरडं आणि रुक्ष पडायला लागतं.

छोट्या कारणांवरुन खटके उडतात, क्षुल्लक गोष्टींवरुन वाद होतात, रुसवे-फुगवे-अबोले होतात. दिवसा आवाज नको तितका वाढतो, रात्री नको तितक्या, मौन होतात. ज्या व्यक्तीवर जीव तोडुन प्रेम केलं त्याच व्यक्तीचा रागराग यायला लागतो.

दोन्ही बाजुंनी, मनात खोलवर कुठेतरी प्रेमाचा झरा अजुनही फुटतच असतो, पण आता तो बाहेर तसाच्या तसा बरसल्या जात नाही.

रिसर्च सांगतो, नव्वद टक्के जोडप्यांसोबत हेच होतं, उरलेले दहा टक्के आयुष्यात प्रेम टिकवण्यात यशस्वी होतात, उरलेले सहन करत, अळणी आयुष्य जगतात….

आकाश पेलण्याची, दररोज, हीच घाई,
घरट्यास सांधण्याची, आम्हा उसंत नाही…

मग, नव्या नवलाईत एकमेकांना वेडं करणारं, ओढ लावणारं, एकमेकांसाठी आतुर करणारं हे प्रेम असं अचानक, इतक्या सहजपणे विरुन का जातं?…

आयुष्याची कित्येक वर्ष खर्च करुन अमेरीकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, डॉ. गॅरी चॅपमॅनने हे शोधुन काढलं, आणि त्याचं उत्तर “The 5 Love Languages: The Secret to Love That Lasts” (पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा) नावाच्या पुस्तकात शब्दबद्ध केलं.

घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या, हजारो जोडप्यांच्या आयुष्यात, ह्या पुस्तकाने पुन्हा प्रेमाचा बहर फुलविला.

अनेक प्रेमी युगुलांची आयुष्यं, उध्वस्त होण्यापासुन वाचविली. ह्यात दिलेले प्रेमाचे फॉर्मुले आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वापरले तर आपलंही आयुष्य कित्येक पट सुखी, आनंदी आणि रोमॅन्टीक होऊन जाईल यात शंकाच नाही.

अशी कोणती जादु सांगीतलीय त्या पुस्तकात? तर हे पुस्तक आपल्याला बोलायला आणि ऐकायला शिकवतं, प्रेमाच्या पाच भाषा… आपल्या जीवनसाथीबरोबर आपल्या ह्रद्यातुन संवाद साधायला शिकवतं..

१) सकारात्मक शब्द – जोडीदाराकडुन, प्रेमाने बोललेले गोड शब्द हे रोजच्या दमवुन टाकणाऱ्या जगण्यासाठी, उर्जा देणारे, शक्तिशाली इंधन असतात.

“ह्या ड्रेसमध्ये तु खुप सुंदर दिसतेस…….”

“आजची संध्याकाळ किती मस्त होती, पिक्चर, डीनर आणि शॉपींग, तुम्ही आमच्या सर्वांवर किती प्रेम करता, थॅंक यु, व्हेरी मच!……..”

“तुझ्यासारखी बटाट्याची भाजी जगात कोणीही बनवु शकत नाही!! अप्रतिम……..”

“तुमच्याशी लग्न करुन मी अगदी सुखात आहे, मला कश्शाकश्शाची कमी नाही!…….”

रोजच्या बोलण्यात अशी साखरपेरणी केलेली वाक्य वापरली तर आपोआप सुखं आकर्षित होतील, हृदयाचा प्रेमाचा झरा कधीच आटणार नाही.

कौन कहता है क़ि चाँद तारे तोड़ लाना ज़रूरी है,
दिल को छू जाए प्यार से दो लफ्ज़, वही काफ़ी है!

२) प्रतिबद्ध वेळ – डॉ. चॅपमॅन सांगतात, नुसतं गोड बोलुन मन जिंकता येत नाहीत, प्रसंगी ते कृतीतुन सिद्ध करावे लागते.

रोजच्या छोट्याछोट्या कामात जोडीदाराला, आवर्जुन मदत केली पाहीजे. त्याच्या आवडीनिवडी, छंद ह्यासाठी वेळ दिला पाहीजे. जोडीदारच्या चेहर्यावर पसरलेलं हास्य, हीच आयुष्यातील सर्वात आनंददायक गोष्ट आहे!…

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही मला,
तुझं असणं हवं आहे …

३) भेटवस्तु – गिफ्ट अनमोल असतात, जिथे शब्द थिटे पडतात, तिथे भेटवस्तु काम करतात, भेटवस्तु ह्या चिरकाळ टिकणाऱ्या आठवणी सजवण्याचं काम करतात, “लग्नाच्या पहील्या वाढदिवशी यांनी मला ही साडी आणली होती”, असं म्हणुन ती साडी आयुष्यभर उराशी चिटकुन ठेवली जाते.

तिने बर्थडे गिफ्ट दिलेलं वॉलेट किंवा वॉच सदा जीवापाड जपलं जातं…..

बरं, गिफ्ट नेहमी महागडीच असावी असे काही नाही, एखादं गुलाब, एखादं चॉकलेट, एक गजरा, एक छोटीशी अंगठी किंवा छोटासा दागीना काहीही चालतं, देवुन तर बघा!..सरप्राईज गिफ्ट आनंदाश्रु आणतात. (हे अनुभवाचे बोल आहेत.)

ये जो हलकी सी फ़िक्र करते हो न हमारी,
बस इसलिए हम बेफिक्र रहने लगे हैं।

४) मनःपुर्वक सेवा – कधी कधी मात्र आयुष्य परीक्षा घेतं, कितीही प्रेम करुन उपेक्षाच वाट्याला येते, माणुस जिंकण्यासाठी तेव्हा एकच हुकुमाचा एक्का असतो, कितीही त्रास होत असला तरी चेहऱ्यावर प्रेमळ हास्य, कायम करुन मनःपुर्वक सेवा करायची.

तुमचं हे वर्तन जोडीदाराला कडक, तुसडा स्वभाव बदलावयला भाग पाडेल.

वो महोब्बत के सौदे भी अजीब करती है,
बस मुस्कुराती है और दिल चुरा लेती है..

भांडणं करुन, आपली बाजु बरोबर हे सिद्ध करुन, समोरच्याला निरुत्तर करुन काहीच साध्य होत नाही, उलट मन दुखावतात, त्यापेक्षा जाणुन बुजुन घेतलेली माघार मन जिंकते.

५) शारीरिक स्पर्श –

जो मैं रूठ जाऊँ, तो तुम मना लेना,
कुछ न कहना, बस… सीने से लगा लेना।

गजबजलेला रस्ता क्रॉस करताना, हातात हात धरणं, प्रेम व्यक्त करतं….

दिवसभराच्या थकावटीनंतर उत्कटतेनं दिलेलं प्रेमाचं आलिंगन दिवसाचा शीणवटा पळवुन लावतं.

शारीरिक स्पर्श म्हणजे वासना इतका मर्यादित अर्थ घेऊन आयुष्याला थिटे करु नये. शारीरिक स्पर्शात प्रचंड ताकत असते.

कर्कश्य चिरकणारं बाळ, प्रेमाने थोपाटलं की शांत का होत?…..कडाडुन भांडल्यावर, एका मिठीत सगळे भेद का विरघळले जातात?….. शब्द संपले की स्पर्शाची जादुई भाषा काम करते.

तू मला समजुन घे, मी तुला समजुन घेतो……
चांदण्याचे दान माझ्या, मी तुला मोजुन देतो……
ओंजळीतुन चांदणे ने, पण सखे सांडू नको…….
स्वप्नातही माझ्यासवे, येऊनी भांडू नको……..

प्रेम व्यक्त होण्यासाठी, खास अशा दिवसाची गरज नसतेच, तरीही आज व्हॅलेंटाईन डे च्या निमीत्ताने ह्या पाच भाषा शिकुन, तुमच्या आयुष्यात प्रेमाची बाग फुलुन जावी, तिला आनंदाचा बहर यावा, प्रेमाच्या रंगबेरंगी फुलांची तुमच्यावर उधळण व्हावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।