प्रभावी व्यक्तीमत्वांत उंचीचं अनन्यसाधारण महत्व आहे. एखादया उंच व्यक्तीने एखाद्या कार्यक्रमात एंट्री घेतली, की सगळ्यांच्या नजरा त्या व्यक्तीवर खिळतात.
सेलिब्रिटींमध्ये पण पहा ज्यांची उंची जास्त असते त्यांचा प्रभाव जास्त पडतो. लहान मुलामुलींना सल्ले दिले जातात भरपूर सायकल चालव बरं का, म्हणजे उंची वाढेल. चांगली उंची लाभणं आजकाल फार महत्त्वाचं वाटतं. ज्यांची उंची नॉर्मलपेक्षा जास्त आहे त्यांना मात्र काही समस्यांचा सामना करावा लागतो. आता या लेखात बघुयात त्या समस्या कोणत्या?
पाठ आणि मणक्यांच्या समस्या
प्रत्येक देशाच्या नागरिकांच्या सरासरी उंचीचं प्रमाण असतं. जगाच्या तुलनेत आपण भारतीय किंचित बुटके असतो. गेल्या 100 वर्षांची सरासरी पाहिली तर आजच्या मुलांची उंची पालकांपेक्षा वाढलेली दिसून येते.
हे विचारात न घेता एका ठराविक मापाच्या खुर्च्या आणि टेबल सगळीकडे वापरले जातात. उंच व्यक्तींना अशा टेबलखुर्च्या वापराव्या लागल्या तर त्यांना पाठीचे आणि मणक्याच्या समस्या जाणवायला लागतात.
यावर अभ्यास करणा-या संशोधकांचं असं म्हणणं आहे की, उंच व्यक्तींमध्ये मणक्यांचं एका बाजूला झुकणं उद्भवू शकतं. याचं नेमकं कारण अजून लक्षात आलं नाही. बैठक सोयिस्कर नसल्यामुळे पाठदुखी आणि मणक्यांचे विकार उंच व्यक्तींमध्ये जाणवतात.
जगभरातील अनेक ठिकाणी सरासरी, उंची जास्त असते. भारतीयांची ही उंची वाढते आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात साधारण कमरेजवळ वेदनांचं प्रमाण वाढलं आहे. बसण्याची योग्य पध्दत वापरणं हाच यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे.
रक्त गोठणे.
उंची मध्ये पायाची उंची जास्त असणे, व्यक्तीमत्वाला झळाळी देऊ शकते. मात्र यामुळे रक्त गोठण्याचा त्रास होऊ शकतो. अफाट उंचीबरोबर वजन ही जास्त असेल तर, पायातील शिरांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया होऊ शकते. आणि हो महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हा धोका जास्त जाणवतो.
पायात रक्त गोठलं तर त्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. त्यामुळे श्वास घ्यायला अडचण होते आणि मृत्यू ओढवण्याची शक्यता वाढते.
मधुमेहाचा धोका.
उंची जास्त असली तरी काहींची उंची पायात तर काहींची उंची ही पायापेक्षा वरच्या भागात जास्त असते. ज्यांची उंची पायात नसते त्यांना मधुमेहाचा धोका असतो.
उंच व्यक्तींचं आयुष्य छोटं असतं.
उंचीचा प्रभाव आयुष्यावर पडण्याची शक्यता असते. याला संशोधनाची पुष्टी देता येत नाही, पण सर्वसाधारण असा मतप्रवाह आहे की बुटक्या लोकांचं आयुष्य जास्त असतं. याउलट उंच व्यक्तींना मात्र आयुष्य कमी उपभोगायला मिळतं. असं नेमकं का होतं? ते मात्र कळलेलं नाही.
कमी जास्त उंची ही आपल्या हातात नसते. योग्य आहार, आणि व्यायाम यांच्या माध्यमातून आपण आरोग्य आणि दीर्घ आयुष्य निश्चित उपभोगू शकतो.
उंच व्यक्तींमध्ये कॅन्सरची शक्यता वाढते.
ब-याच संशोधनामध्ये असं जाणवलं आहे की उंच व्यक्तींना कॅन्सरचा धोका जास्त असतो. ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरीज कॅन्सर, प्रोस्टेट, आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर यांचा विशेष करुन धोका उंच व्यक्तींना जाणवू शकतो.
उंची वाढवायला कारणीभूत जे हार्मोन्स असतात त्यांच्यामुळे ही हा कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
हृदय विकार
उंच व्यक्तींमध्ये हृदयविकारांचा धोका मात्र कमी असतो. उंच लोकांच्या रक्त वाहिन्या शक्तीशाली असतात. त्यामुळे हृदय विकारापासून ते लांब राहू शकतात. याउलट काही संशोधकांचं मात्र असं म्हणणं पडलयं की बुटक्या लोकांमध्ये रक्ताचं पंपीग चांगल्या पद्धतीने होतं आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया कमी प्रमाणात होते त्यामुळे बुटक्या व्यक्तीत हृदय विकाराची शक्यता कमी असते. दोन्ही उदाहरणात खूप संशोधन झालं आहे.
उंचीचा मुद्दा जरी लक्षात घेतला हेल्दी डाएट आणि व्यायामाच्या मदतीने. आपण आपलं आयुष्य आरोग्यदायी करू शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.