फलाहार सर्वात सर्वात उत्तम आहार असतो असे म्हणतात. पण त्याची ठराविक वेळ असते. आपल्या दैनंदिनीप्रमाणे आणि पचन प्रायिकेनुसार कोणता आहार कधी आणि किती घ्यायचा हे ठरवायला हवे.
तसे तर सर्वच फळं हे आरोग्यसाठी चांगले असतात.
पण त्यातही उपाशी पोटी केळ खाल्याने अनेकांना त्रास होतो असे दिसून आले आहे. आजकाल सकाळची वेळ फार संघर्षाची असते.
ऑफिसला जाण्याची गडबड नाहीतर घरचे सर्व उरकायची घाई यामध्ये सकाळचा नाश्ता शांततेत घेणे फार अवघड होते. मग अशा घाईच्या वेळी कधी कधी आपण नुसतेच एखादे केळ खाऊन निभावून नेतो.
त्यावेळी आपल्याला असं वाटत असतं कि आपण चांगलं आणि पौष्टिक फळ खाल्लंय. कधी कधी उपाशी पोटी फळे खाल्याने होणाऱ्या नुकसानीचे परिणाम आपल्याला माहित नसतात. तेच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
खरंतर ब्रेकफास्ट हा दिवसाच्या सुरुवातीला झोपून उठल्यावर केल्या जातो. दिवसाचे पहिले जेवण हे नेहमी भरपूर प्रमाणात असायला हवे असे म्हणतात कारण मग नंतर अख्खा दिवस आपल्याला काम करत घालवायचा असतो.
त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये नेहमी पौष्टिक आणि भरपूर असे पदार्थ असावेत.
नुसते केळ किंवा कुठलेही एखादे फळ खाल्याने कधी कधी पोटाला नुकसान होऊ शकते.
आजच्या या लेखामध्ये आपण रिकाम्या पोटी केळ खाल्याने होणारे फायदे आणि नुकसान या विषयी जाणून घेणार आहोत.चला तर सुरुवात करूया फायद्यांपासून….
रिकाम्या पोटी केळी खाण्याचे फायदे
रोज सकाळी नाश्त्यामध्ये एक केळ खाल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्तता मिळू शकते. केळामध्ये कार्ब्स , विटामिन ए , लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असल्याने दिवसभर शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करते. यामध्ये नैसर्गिक इन्सुलिन असल्याने थकवा जाणवत नाही.
पोटाच्या बऱ्याच समस्यांवर डॉक्टर सुद्धा कधी कधी केळ खाण्याचा सल्ला देतात.
बहुतेक वेळा रिकाम्या पोटी केळ खाल्याने अनेकांना एनर्जेटिक जाणवत असेल.
सकाळच्या वेळी केळ खाल्ल्याने पोटामध्ये झालेली उष्णता निघून जाऊन ऍसिड रेफ्लेक्सच्या समस्या दूर होतात. केळामध्ये असलेल्या फायबरमुळे अपचन आणि त्यासंदर्भातील समस्या कमी होऊ शकतात.
सकाळी सकाळी व्यायाम करण्यापूर्वी एक पेला पाणी घेतल्यावर थोडा वेळाने एक केळ खाल्ल्यास व्यायामाला लागणारी ऊर्जा शरीराला थकू देत नाही.
उपाशी पोटी व्यायाम करण्यापेक्षा एक केळ खाऊन व्यायामाला सुरुवात केली तर त्याचा फायदा होतो. आणि व्यायामा दरम्यान भूक लागत नाही.
काहीही न खाल्ल्याने व्यायाम करताना कधी कधी रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाबाची लेवल कमी होते. त्यामुळे भोवळ येऊन पडण्याची भीती असते.
त्यामुळे एखादे फळ खाऊन व्यायाम केला तर व्यायाम झाल्यावर या समस्या उद्भवत नाहीत.
गर्भवती स्त्रियांना देखील केळ खाणे फायदेशीर समजल्या जाते.
सकाळी ब्रेकफास्टला उशीर होत असेल किंवा एखादे वेळी ब्रेकफास्ट बनवायला जमणार नसेल तर एक केळ खाऊन भूक शांत केली तर पुढचे काही तास तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते त्यामुळे केळ हे इन्स्टंट एनर्जी फ्रुट आहे.
केळाचे शिकरण आणि पोळी खूप लोकांना आवडते. पण केळामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने दुधासोबत केळ खाणे काही लोकांना नुकसानकारक ठरू शकते.
रिकाम्या पोटी केळ खाण्याचे तोटे
१. बहुतेक वेळा उपाशी पोटी केळ खाल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो. कारण केळामध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स मुळे उपाशी पोटामध्ये असलेल्या ऍसिडसोबत रिऍक्शन होऊन आम्ल पित्ताचा त्रास संभवतो. त्यामुळे शक्यतोवर सकाळी पोट रिकामे असताना केळ खाऊ नये.
२. सकाळी नाश्त्यामध्ये नुसतेच केळ खाल्ले तर त्याचा पचनसंस्थेवर सुद्धा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
३. ज्यांना उपशी पोटी केळ खाल्ल्यावर ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. कारण केळामध्ये जास्त प्रमाणात असलेले मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम. यामुळे उपाशी पोटी केळ खाल्ले तर त्याचा हृदयावर प्रत्यक्ष परिणाम होतो.
४. सकाळच्या वेळी उपाशी पोट असल्यास केळ खाल्ल्याने सुस्ती येऊन आजून काही खाण्याची सतत इच्छा होत राहते. केळ खाल्ल्यावर अजून इतर काही पदार्थ खाल्ले तर अपचन होते. आणि त्यामुळेसुद्धा ऍसिडिटीचा त्रास उद्भवतो.
सकाळी ब्रेकफास्टमध्ये केळ खायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. सकाळी नाश्त्यामध्ये आधी उपमा, पोहे किंवा ओट्स खावेत. त्यावर केळाचे सेवन केल्यास पोटही भरतं आणि त्रास होत नाही.
२. दूध आणि कॉर्न फ्लेक्स च्या कॉम्बिनेशनसोबत केळ खाल्ले तरी त्रास ना होता पोट भरतं.
३. केळ खाण्यापूर्वी ओट्स किंवा सोजी खाल्ली आणि त्यानंतर केळ खाल्ले तर पौष्टिक आहार पोटात जाऊन दिवसभर काम करण्याची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
४. केळ खाल्ल्यावर लगेचच पाणी घेऊ नये. घसा खवखवतो आणि मग खोकला किंवा सर्दी होण्याची दाट शक्यता असते.
थोडक्यात, केळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषक घटक जास्त प्रमाणात असल्याने ते उपाशी पोटी खाल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून केळ खाण्यापूर्वी हेल्दी आहार घेऊन मगच केळाचे सेवन करावे. त्यामुळे उपाशी पोटी केळ खाल्ल्याने होणारा त्रास टळू शकेल.
तुम्हाला उपाशी पोटी केळ खाल्ल्याने यापैकी काही त्रास होत असतील तर…
या लेखामध्ये सांगितलेले उपाय करून बघा. आणि जर हि माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल तर आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.