उष्माघात होण्याचे प्रमाण वाढतेय, त्यापासून वाचण्याकरता अशी काळजी घ्या.

थंडी संपून आता उन्हाळा वाढायला लागला आहे. अशा वेळी वातावरण अचानक एकदम बदलते.

ह्या बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात.

त्यातील एक म्हणजेच उष्माघात. आज आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

उष्माघात म्हणजे काय

जेव्हा तीव्र स्वरूपाचा उन्हाळा सुरू होतो, तेव्हा हवा देखील अधिकाधिक कोरडी बनत जाते.

अशा वेळी कडक उन्हात खूप वेळ थांबले असता शरीरातील पाण्याचे प्रमाण एकदम कमी होऊन चक्कर येते त्यास उष्माघात असे म्हणतात.

तसेच खूप कडक उन्हात असताना अचानक गार पाणी किंवा कोल्ड्रिंक प्यायले तरी त्रास होऊन चक्कर येऊ शकते.

हादेखील उष्माघाताचाच एक प्रकार.

अशा प्रकारच्या उन्हाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आयुर्वेदात काही घरगुती उपाय सांगितले आहेत.

ते कोणते ते पाहूया.

यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा.

उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

घरगुती उपाय

१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास होणार नाही.

२) अनुलोम विलोम जास्त करा. शरीराचे तापमान स्थिर राहिल.

३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्त वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

४) उजव्या कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.

५) हलका आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढु देऊ नका.

६) माठातील थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. उभ्याने घटाघटा पाणी पिऊ नका.

७) कोणत्याही पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ हा प्रवृत्तीने गरम आहे.

८) आवळा / कोकम / लिंबू सरबत तसेच मठ्ठा /ताक इ. जरूर प्या.

९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

१०) प्रत्येक काम सावकाशच करा.

११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्या.

१२) ऊन्हातून आल्यावर गुळाचा खडा खाऊन मग पाणी प्यावे.

१३) खडीसाखर सोबत ठेवून थोडी थोडी खाणे.

१४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.

१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.

१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.

१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गॉगल वापरा.

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आपला आहार कसा असावा

आपल्या आहारातील काही पदार्थ हे प्रवृत्तीने उष्ण तर काही पदार्थ हे प्रवृत्तीने थंड असतात.

कडक उन्हाळा असताना मूळ थंड असणाऱ्या पदार्थांचेच सेवन करावे.

म्हणजे ऊन बाधत नाही.

खाली स्वभावाने उष्ण व थंड असणाऱ्या पदार्थांची यादी दिली आहे. त्याप्रमाणे आपला आहार ठरवावा.

उष्ण व थंड पदार्थ कोणते

  • कलिंगड – थंड
  • सफरचंद – थंड
  • चिकू – थंड
  • लिंबू – थंड
  • कांदा – थंड
  • काकडी – थंड
  • पालक – थंड
  • टॉमेटो कच्चा – थंड
  • कोबी – थंड
  • गाजर – थंड
  • मुळा – थंड
  • कोथिंबीर – थंड
  • पुदिना – थंड
  • भेंडी – थंड
  • बीट – थंड
  • बडीशेप – थंड
  • वेलची – थंड
  • डाळींब – थंड
  • ऊसाचा रस – थंड
  • नारळ (शहाळं ) पाणी – थंड
  • पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) – थंड
  • मीठ – थंड
  • मूग डाळ – थंड
  • कॉफी – थंड
  • शेवगा उकडलेला – थंड
  • दूध, दही, तूप, ताक (फ्रिज मधले नाही) – थंड
  • ज्वारी – थंड
  • माठातील पाणी – थंड
  • एरंडेल तेल – अती थंड
  • तुळस – थंड
  • तुळशीचे बी – उत्तम थंड
  • सब्जा बी – उत्तम थंड
  • नीरा – थंड
  • मनुका – थंड
  • अंडी (फक्त उकडलेल पांढरे) – थंड
  • संत्री – उष्ण
  • आंबा – उष्ण
  • आलं/लसूण – उष्ण
  • बटाटा – उष्ण
  • कारले – उष्ण
  • मिरची – उष्ण
  • मका – उष्ण
  • मेथी – उष्ण
  • वांगे – उष्ण
  • गवार – उष्ण
  • पपई – उष्ण
  • अननस – उष्ण
  • मध – उष्ण
  • तूर डाळ – उष्ण
  • चणा डाळ – उष्ण
  • गुळ – उष्ण
  • तिळ – उष्ण
  • शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर – उष्ण
  • हळद – उष्ण
  • चहा – उष्ण
  • पनीर – उष्ण
  • बाजरी/नाचणी -उष्ण
  • आईस्क्रीम – उष्ण
  • श्रीखंड/आम्रखंड – उष्ण
  • फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
  • फ्रिज मधिल पाणी – उष्ण
  • पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
  • हॉट ड्रिंक सर्व – उष्ण
  • कोल्डरिंग सर्व – उष्ण
  • मास/चिकन/मटण- उष्ण

 

तर वर दिलेले घरगुती उपाय केले आणि वर सांगितलेल्या तक्त्याप्रमाणे आपला आहार ठेवला तर उष्माघातापासून सहज बचाव करता येऊ शकतो.

ह्या माहितीचा जरूर लाभ घ्या.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment