कोविड १९ पासून आपला बचाव करायचा तर लस घ्यायलाच हवी हे एव्हाना सगळ्यानाच माहीत झाले आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु देखील झाले आहे. परंतु हे लसीकरण घेण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करून बुकिंग स्लॉट मिळवणे आवश्यक आहे. डायरेक्ट वॉक इन जाऊन ही लस मिळत नाहीये.
सध्या प्रॉब्लेम असा झालाय की अनेकांना कितीही प्रयत्न केला तरी हा स्लॉट मिळत नाहीये. वेबसाइट लॉग इन करून ओटीपी येईपर्यंत सगळे स्लॉट बुक होऊन जात आहेत.
काही असे लोकही आहेत ज्यांना ह्या स्लॉट बुकिंगची काही माहितीच नाहीये. त्यांना देखील स्लॉट मिळवणे अवघड होऊन बसले आहे.
सध्या कोविन पोर्टल, आरोग्यसेतू ऍप किंवा उमंग ऍपद्वारे लसीकरणाचे स्लॉट बुकिंग करता येत आहे. परंतु ज्या लोकांना असे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करणे शक्य होत नाहीये (ह्यात विशेषतः ग्रामीण भागातले लोक आहेत, जिथे इंटरनेट, वीज ह्या सुविधा सहज उपलब्ध नाहीत.)
त्यांच्यासाठी भारत सरकारने फोन कॉल द्वारा स्लॉट बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातर्फे असे सांगण्यात आले आहे की हेल्पलाइन नंबर १०७५ वर कॉल करून रजिस्ट्रेशन आणि स्लॉट बुकिंग करणे शक्य आहे.
कॉल करून स्लॉट बुकिंग नक्की कसे करायचे ?
१. सर्वप्रथम आपल्या फोनवरून हेल्पलाइन नंबर १०७५ डायल करावा.
२. कॉल रिसिव्ह झाल्यावर आपल्याला स्लॉट बुकिंग बद्दल विचारले जाईल.
३. स्लॉट बुक करण्यासाठी २ प्रेस करा असे सांगण्यात येईल.
४. त्यानंतर कॉल सेंटर प्रतिनिधीने विचारलेली माहिती योग्य स्वरूपात सांगितली की लसीकरण स्लॉट आपल्यासाठी बुक केला जाईल.
५. ह्या कॉल दरम्यान आपले ओळखपत्र म्हणून आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पेन्शन पासबुक, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र ह्यापैकी एक जवळ ठेवावे लागेल व त्यावरची माहिती योग्य प्रकारे कॉल प्रतिनिधीला सांगावी लागेल. त्यामुळे स्लॉट तुमच्याच नावावर बुक होऊ शकेल.
तर अशी आहे फोन करून लसीकरणाचा स्लॉट मिळवण्याची प्रोसेस. ह्याचा सर्व नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना खूप फायदा होणार आहे.
तर ह्या सुविधेचा जरूर लाभ घ्या आणि लवकरात लवकर स्लॉट बुक करून लस घ्या आणि करोनापासून स्वतःचा बचाव करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.