वारी – एक आनंदसोहळा

‘पंढरीची वारी’ हे ब्रीदवाक्य प्रत्येक शाळकरी मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत ज्ञात असते. जून जुलै महिना हा वारीनेच बहरलेला असतो. पावसाची सुरुवात आणि वारीची तयारी हे जणू गणितच ठरलेलं असतं. असंख्य मराठी माणसं या वारीसाठी आसुसलेली असतात. देहू आळंदी ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे एक विलक्षणीय सोहळा असतो. हजारो वर्षांपूर्वीची हि परंपरा असते. या वारीचं सौंदर्य, कौतुक हे केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. आपण आपल्या लहानपणापासून हि परंपरा पाहत आलो आहे. प्रत्येकाच्या घरातील व्यक्ती या वारीमध्ये सामील होत असते, त्यामुळे आपण सर्वांना वारी म्हणजे काय माहीतच असेल. आता इंटरनेटच्या माध्यमामुळे आपली पंढरीची वारी हि जगभरात लोक अवाक होऊन बघत असतात अशावेळी मराठी असल्याचा अभिमान जागृत होतो.

Palkhi Procession

वारीमध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारची लोक प्रवास करत असतात. कुणी लाखो करोडोची मालमत्ता असणारा तर कुणी काहीही मालमत्ता नसणारा, कुणी इंजिनअर कुणी डॉक्टर असे हे सगळे एकत्र पायी चालत असतात. अशारितीने श्रीमंत गरीब, सुशिक्षित अशिक्षित व्यक्ती सामील असतात. या वारीने सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले आहे. जणू, मराठी माणूस हा समाजाला एकत्रित संगनमताने राहण्याचा संदेश देत असतो. या वारीत कुणी थोर नसतो कुणी लहान नसतो. तो असतो फक्त वारकरी. प्रत्येकजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालत असतो. यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट असते ती म्हणजे “पांडुरंगा तु जे काही दिलंय त्यात मी समाधानी आहे. पण तू सदैव माझ्या पाठीशी रहा “. हे सांगण्यासाठी वारकरी हजारो मैलाचा प्रवास करत असतो. तेव्हा जणू पांडुरंग सुद्धा वारीमध्ये सामील आहे हा भास जाणवत असतो.

Wari

असंख्य नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेल्या या जगतात जिथे आजची तरुण पिढी व्हाट्सअप आणि फेसबुक च्या माध्यमात बुडालेली असते पण हे वारीचे रूप बघून त्यांच्याही अंगावर शहारे येतात आणि हि तरुणपिढी सुद्धा इथे नतमस्तक होते. तेव्हा आपल्या मराठी संस्कृतीचा वारसा भक्कम असल्याची जाणीव इथे होते. हि सर्व वारकरी मंडळी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येतात. कित्येक वेळा परदेशातूनही वारकरी यामध्ये सामील होतो. कोणत्याही प्रकारचा परकेपणा न मानता सर्व वारकरी मंडळी एकत्र आपली सुख दुःख वाटत असतात. एकत्र राहणे, जेवणे आणि एकत्र पायी चालणे. अशावेळी एकत्र असल्याची भावना निर्माण होते. टाळ मृदूंग, भजन, अभंग, भारुडे यांनी वारीचं रूपच पालटून जातं. एकमेंकाविषयी चा आपुलकी आदर इथे दिसते. यातूनच वारीची ओळख निर्माण होते. या वारीमध्ये सामील न झालेली माणसे वारकऱ्यांना वेगवेगळ्या रूपाने मदत करत असतात. कुणी जेवण पुरवत असतो कुणी वारकऱ्यांची राहण्याची सोय करत असतो तर कुणी वैद्यकीय सेवा पुरवत असतो. अशावेळी जाणवते कि या वारीमध्ये एवढी ताकद असते कि सामान्य माणुसही आपला थोडा वेळ बाजूला काढून वारकऱ्याला मदतीचा हात पुढे करतो.

Vari Ek Pravasविशेषतः जेव्हा वारी पुण्यासारख्या मोठ्या शहरातून जाते आणि काही कालावधीसाठी रस्ते बंद करण्यात येतात तेव्हा या वारीचे महत्व अधिकच जाणवते. प्रत्येक मराठी माणूस हा पालखीच्या दार्शनासाठी रस्त्यावर उतरलेला असतो. असंख्य कंपनीच्या वेळाही बदलेल्या असतात. खरोखरच या वारीमध्ये सकारात्मक ताकद असते. केवळ माणसच नाही तर बैल घोडे हि चालत असतात. बैलं पालखीचा रथ ओढत असतात. तर घोडा माउली बनून वारकऱ्यांचे मनोरंजन करत असतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करूनही या सर्वांमध्ये कमालीची ताकद निर्माण होते. ती केवळ संगळ्यांच्या एकत्रित असणाऱ्या विश्वासामुळेच. जेव्हा हि वारी अखेरीस पंढरपुरात पोहोचते आणि वारकऱ्यांचे जणू ध्येयच साध्य होते तेव्हा आनंदाला तोडच नसते. आपल्या जन्मदात्यांशी खूप दिवसांनी भेट झाली याचा आनंद जाणवत असतो. आणि मनात त्याच्या येते कि भरपूर पाऊस पडू दे आणि पुन्हा वारीत सामील करण्याची ताकद दे, ‘अशा या सुखद प्रवासाची प्रत्येकजण वाट पाहत असतो. भरपूर महत्वाकांक्षा आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतो……

वाचण्यासारखे आणखी काही…

स्वप्नातलं आयुष्य (परिपूर्ण आयुष्य) सत्यात कसं उतरवता येईल?
तीन जीवघेण्या शत्रुंपासुन सावधान!…. Salt, Sugar & फॅट
मेडीटेशन – तेरा ध्यान किधर है?…

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।