घरातील सकारात्मक उर्जेसाठी वास्तु टिप्स : सजावट करताना विचारपूर्वक करा.
1) ताजी हवा आणि स्वच्छ सुर्यप्रकाश यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. सकाळी थोड्या वेळासाठी तरी घराच्या सगळ्या खिडक्या उघड्या राहून ताजी हवा आत येईल याची दक्षता घ्या.
2) घरातला कोणताही कोपरा अंधारा राहू नये याची पुरेपुर काळजी घ्या. एखाद्या ठिकाणी अंधार जास्त आहे असं वाटलं तर तिथं लाईटची व्यवस्था करून ती जागा उजळवून टाका.
3) अंधार झाल्यावर लगेचच घरातले, खोलीतले लाईट सुरु करा त्यामुळं खोली उजळून निघेलच पण सकारात्मकता ही जाणवेल.
4) हलत्या पाण्यासारखे भासणारे फिश टँक ईशान्य दिशेला ठेवा तुमच्या घरासाठी ते शुभ स्पंदनं देतात.
5) एखादं झाड, किंवा खांब मुख्य दरवाजासमोर असणं टाळा, त्याचबरोबर एखादं वाळलेलं झाड सुद्धा प्रवेशद्वारापाशी नसेल याची काळजी घ्या.
6) बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. टॉयलेटचे झाकण वापरात नसताना नेहमी खाली ठेवा.
घरामध्ये कोणताही नळ गळू देऊ नका, गळती सुरु झाली तर लगेच दुरुस्त करून घ्या.
बाथरूममध्ये सुवासिक मन प्रसन्न करणारं फ्रेशनर वापरा.
7) किचनमध्ये चुकुनही औषधं ठेवू नका.
8) विश्रांतीच्या वेळी घरातली सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, वाय फाय बंद करा.
सकाळच्या प्रसन्न वेळी सगळ्यांच्या मनाला शांतता लाभेल असं स्तोत्र, मंत्र किंवा संगीत लावा.
9) घरात फर्निचर करताना त्याच्या बाजू टोकदार होणार नाहीत याची काळजी घ्या.
घराच्या सजावटीसाठी लाल, काळा, ग्रे या रंगांचा अतिवापर टाळा.
10) जमिनीची पातळी एकसमान ठेवा. घरामध्ये युद्धाचे, हिंसेचे दारिद्रयाचे फोटो लावू नका.
त्यापेक्षा सकारात्मक एनर्जी देणा-या निसर्गचित्रांनी घर सजवा.
11) घरामध्ये शांतता नांदण्यासाठी दिवा लावा, कापूर जाळा, धुप घाला किंवा चंदनचा सुगंध दरवळू द्या .
सुगंधी तेलं नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकतात आणि घरातील सकारात्मकता वाढवतात.
दालचिनी आणि गवती चहाचा अर्काचा वापर ही घरातलं वातावरण शुद्ध करण्यासाठी करून पहा.
12) धुपदाणीत काही तमालपत्र जाळल्यामुळं घरातील नकारात्मक आणि हानिकारक ऊर्जा बाहेर जाते. घराच्या प्रवेशद्वारापाशी कचराकुंडी ठेवण्याची चूक करु नका.
13) किचनमध्ये तुटलेल्या वस्तू वापरू नका. घरातल्या ज्या वस्तूंचा ब-याच दिवसात वापर केलेला नाही त्या वस्तू गरजूंना द्या किंवा त्या वस्तू फारच खराब झाल्या असतील तर त्यांची विल्हेवाट लावा.
14) देवघर जिन्याखाली किंवा बेडरूममध्ये चुकून ही करू नका.
15) नादनिर्मिती मनाला शांतता देते, समृद्धी आणि संपत्तीला आकर्षित करते. त्यामुळे मुख्य दारापाशी विंड चिमस् किंवा घंटा टांगून ठेवा.
त्याचबरोबर तुमचा दिवस आनंदी होण्यासाठी दिवसाची सुरवात श्लोक, मंत्र, जपाने करा. सकाळचा थोडासा वेळ बासरीवादन ऐकण्यासाठी राखून ठेवा.
16) घरामध्ये इनडोअर गार्डन सजवा, जिथे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरवात सकारात्मक उर्जेने करू शकता.
इनडोअर गार्डन साठी तुम्ही बांबू किंवा फुलांच्या रोपांची किंवा मनी प्लांटची निवड करू शकता.
तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार काळ्या रंगात रंगवणे टाळा. त्याऐवजी, गडद तपकिरी शेड्स निवडा.
हा मुख्य दरवाजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उघडेल याची खात्री करून घ्या.
दिवाणखान्यात सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आग्नेय दिशेला ठेवा.
धबधबा, सोन्याचा मासा किंवा वाहत्या नदीच्या चित्रांनी लिव्हिंग रूम सजवा, ही चित्रं चांगलं नशीब आणि संपत्ती यांना खेचून आणतात.
तुम्हांला परदेशात करिअरच्या संधी हव्या असतील तर परकीय चलन, उडणारे पक्षी, रेसिंग बाइक आणि कार यांची पेंटिंग ठेवा.
मोरपीसामुळं सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते, वास्तु दोषांवर मात होते आणि तुमच्या घरात सकारात्मकता पसरते.
संपत्ती आकर्षित करण्यासाठी मोरपीस आग्नेय दिशेला ठेवा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशमूर्ती आणि मोराची पिसे सुखसमाधानाच्या प्राप्तीसाठी ठेवा.
17) तुमच्या घरातील नकारात्मक आभा काढून टाकण्यासाठी लाफिंग बुद्धा ठेऊ शकता.
तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असल्यास लाफिंग बुद्धाची मूर्ती पूर्व दिशेला ठेवा. जर प्रवेशद्वार उत्तर-पूर्व दिशेला असेल तर ते उत्तर-पश्चिम दिशेला ठेवा.
घरामध्ये सकारात्मक उर्जेसाठी पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यात लाकडी कासव ठेवा.
18) वास्तूशास्त्रानुसार घड्याळं चांगले मार्ग दाखवतात. म्हणून, घरातील सर्व घड्याळं चालू स्थितीत असल्याची खात्री करा.
बिघडलेली, बंद पडलेली घड्याळं काढून टाका, कारण त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत अडचणी येतात.
सर्व घड्याळे उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवा
19) वास्तूशास्त्रानुसार पक्ष्यांना खायला दिल्याने धन आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
तुम्ही तुमच्या अंगणात, टेरेसमध्ये किंवा बाल्कनीमध्ये बर्ड फीडर ठेवू शकता आणि त्यात पाणी आणि धान्य भरू शकता.
ही भांडी वेळोवेळी स्वच्छ असल्याची खात्री करा.
सकारात्मक उर्जेच्या प्रवाहासाठी तुमचा पलंग नेहमी व्यवस्थित ठेवा. दररोज सकाळी तुमचं अंथरुण नीट घडी करून तुमच्या उशा नीट मांडून ठेवा.
20) घरात प्रेरणादायी कविता, वचन लावल्याने तुम्हांला प्रेरणा मिळेलच सकारात्मक एनर्जी पण मिळेल.
21) घरातली प्रत्येक खोली स्वच्छ, नीटनेटकी ठेवा
तुटक्या वस्तुंची वेळच्या वेळी विल्हेवाट लावा.
कपाटं, ड्रावर्स, यांच्यात पसारा करू नका तर नीट मांडणी करून ठेवा.
जाळी जळमटं वेळच्या वेळी स्वच्छ करून केर फरशी करताना त्यात थोडं खडे मीठ टाका.
22) घराच्या प्रवेशद्वारावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढल्यामुळं निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करू शकत नाही.
23) मिरची आणि लिंबू तुमच्या घराबाहेर किंवा ऑफीसबाहेर लटकवल्यामुळं दुष्ट शक्ती आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेरच राहतात.
तर अशा या साध्या सोप्या टीप्स वापरुन तुम्ही घराची सजावट करू शकता, आणि तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार अनुभवू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अत्यावश्यक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.