‘सर्दीवर औषध’ याशिवाय विक्स वेपोरबचे चमत्कारिक उपयोग

व्हिक्स वेपोरब सारख्या मेंन्थॉल मलमचे आणखी काही उपयोग आहेत.

मित्रांनो काही वेळेला आपण झापड लावलेल्या घोड्यासारखं आयुष्य जगत असतो.

ठराविक रस्त्यावरून ठराविक विचार करत जगत राहायचं.

आजूबाजूला अजिबात बघायचं नाही की नवं काही ट्राय करायचं नाही.

आता बघा ना आपल्या घरात अनेक पदार्थ असतात ज्यांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करू शकतो.

जसं की कोल्यासारखी कोल्ड्रिंक्स फरशीवरचे डाग घालवायला उपयुक्त असतात.

व्हिनेगर आपण वस्तू साफ करण्यासाठी वापरू शकतो.

तसंच व्हिक्स वेपोरब सारख्या मेंन्थॉल मलमचे आणखी काही उपयोग आहेत.

पावसाळ्यात, हिवाळ्यात सर्दी झाल्यावर नाक चोंदल्यावर व्हिक्सचा सर्रास वापर केला जातोच.

पण त्याचबरोबर व्हिक्सला आपण एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा वापरू शकतो.

व्हिक्सचे सर्दीच्या औषधाशिवाय इतर पाच उपयोग

1) स्नायू दुखी साठी उपयुक्त व्हिक्स

श्वसनमार्गाला मोकळं करणारं व्हिक्स आणि त्यातलं मेंन्थॉल स्नायूंसाठी सुद्धा प्रभावी ठरतं.

कारण मेंन्थॉल हे प्रभावी वेदनाशामक आहे त्यात कूलिंग करण्याचा गुणधर्म असतो, जो दुखऱ्या स्नायूंना थंड करून वेदना कमी करायला मदत करतो.

तर असं हे मेंन्थॉल असणारं व्हिक्स तुम्ही स्नायूदुखीसाठी सुद्धा वापरून पहा.

2) नखांवरच्या फंगलचा उपाय

प्रवासात, ट्रेकिंगला जाताना तुम्ही व्हिक्सची बॉटल कॅरी करू शकता.

जर तुम्हाला कधी नखांना फंगल इन्फेक्शन झालं तर त्यावर व्हिक्स लावून पहा.

हे बरं होण्यासाठी थोडा वेळ लागतो पण त्याचा चांगला परिणाम नक्कीच दिसतो.

एका प्रयोगांमध्ये काही जणांवर नखांच्या फंगलवर व्हिक्सचा वापर करण्यात आला.

यासाठी 48 आठवड्यांचा कालावधी होता. तेव्हा व्हिक्सचे चांगले परिणाम समोर आले.

3) स्ट्रेच मार्क

गरोदरपणात किंवा वजन वाढल्यानंतर शरीरावरती स्ट्रेच मार्क्स दिसायला लागतात.

वजन कमी केल्यानंतर हे स्ट्रेच मार्क्स ठळकपणे दिसतात, जे नकोसे वाटतात.

ते कमी करण्यासाठी काही जणांनी विक्स वेपोरबचा वापर केलेला आहे.

याबद्दल ठोस पुरावा उपलब्ध नाही पण यापासून कोणतंही नुकसान होणार नाही हे मात्र नक्की.

4) कोरड्या टाचा

शुष्क वातावरणात तुमच्या टाचा कोरड्या पडल्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.

त्वचारोगतज्ञ अशा वेळेला तुमच्या टाचांना ओलावा द्या असं सुचवतात.

टाचांसाठी खास क्रीम बाजारात उपलब्ध आहे.

तरीही काहीजण कोरड्या टाचांना विक्स वेपोरब लावतात आणि कोरड्या टाचांपासून सुटका करून घेतात.

अर्थात यालाही कोणताही ठोस पुरावा नाही.

5) डासांना दूर ठेवतं

व्हिक्स वेपोरबमध्ये मेंन्थॉल असतं. मेंन्थॉल म्हणजे कच्चा कापूर.

सध्या बऱ्याच ठिकाणी डासांना पळवून लावायला कापूरदाणीचा वापर होतो तर काही जण व्हिक्स शरीरावरती लावून डासांना पळवून लावतात.

व्हिक्सचे हे अनोखे उपाय तुम्ही ही करून बघा नुकसान तर काही होणार नाही फायदा झाला तर आम्हांला अनुभव नक्की कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।