पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तर कित्येक आजार होऊ शकतात. आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे की नळाला येणारं पाणी हे पिण्या लायक नसतं, तर वॉटर फिल्टर आणि प्युरीफायरचा वापर सुद्धा शरीराच्या कालांतराने इम्युनिटी वर परिणाम करतो.
पण तरीही शुद्ध पाणी ही आपली गरज असते. आणि त्याचमुळे वॉटर फिल्टर चं मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललंय.
अशात जर तुम्ही वॉटर फिल्टर घेण्याच्या विचारात असाल, तर आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमच्या साठी कोणतं प्युरीफायर योग्य असेल.
RO, UV, UF यातलं कोणतं प्युरीफायर तुमच्या घरातल्या पाण्यासाठी योग्य असेल हे माहीत करून घेऊन मगच योग्य तो फिल्टर निवडावा.
TDS म्हणजे काय?
‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’ BIS च्या नियमांनुसार पिण्याच्या आणि पॅकेज्ड वॉटरच्या शुद्धतेच्या मापनासाठी काही मानक तयार केले गेलेले आहेत. पिण्याच्या पाण्यातील शुद्धतेच्या मापनासाठी TDS म्हणजेच ‘टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स’ यात पीएच आणि हार्डन्स चे प्रमाण मोजले जाते.
BIS मानकानुसार मानवी शरीर जास्तीत जास्त ५०० PPM ‘पार्टस पर मिलियन’ इतकं TDS सहन करू शकतं. यापेक्षा जास्त TDS असलेलं पाणी हे शरीरासाठी घातक ठरतं.
TDS मोजण्याचे इंस्ट्रुमेन्ट जवळ असणे कधीही चांगले. अगदी रुपये २२५ पर्यंतच्या किरकोळ किमतीत ते तुम्ही घेऊ शकता.
बरेचदा तुम्ही फिल्टर ची सर्व्हिसिंग किंवा रिपेअरिंग करता तेव्हा टेक्निशियन त्याच्या कडच्या TDS मीटरने ने पाणी तपासून दाखवतो. TDS बद्दल माहिती असणं आणि तो स्वतः नेहमी तपासता येणं हि सवय आपण करून घेतली पाहिजे. ज्यामुळे योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकाल.
पण हल्ली काही फिल्टर्स मधून प्रमाणापेक्षा जास्त कमी TDS असलेले पाणी मिळते. जे आरोग्यासाठी हानिकारक असते.
WHO च्या निर्धारित मानका नुसार १०० ते १५० इतके TDS पिण्याच्या पाण्याचे असले पाहिजे.
वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्टरबद्दल माहिती बघा:
RO रिव्हर्स ओसमोसिस:
RO या प्युरीफिकेशन टेक्निक मध्ये पाण्यावर दाब देऊन पाणी साफ केलं जातं. यात पाण्यातले अशुद्ध घटक कमी केले जातात. ज्या ठिकाणी TDS चं प्रमाण जास्त असेल म्हणजे बोअर वेलच पाणी असल्यास RO प्युरीफायर वापरणं योग्य ठरेल.
RO वापरण्याचे प्लस पॉईंट्स:
१) RO च्या वापराने पाण्यातील अशुद्ध घटक नाहीसे होतात.
२) बॅक्टेरिया आणि व्हायरस यांना प्रतिबंध होतो.
३) क्लोरीन आणि आर्सेनिक सारख्या अशुद्ध घटकांना अटकाव केला जातो.
RO वापरण्याचे निगेटिव्हीटी पॉईंट्स:
१) विजेची जास्त लागते
२) मोठ्या प्रमाणात पाणी RO च्या रिजेक्ट सिस्टीम मधून बाहेर टाकले जाते.
३) RO मध्ये पिण्याच्या पाण्यातील मिनरल्स मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात.
४) RO च्या कायमच्या वापरामुळे मिनरल्स च्या कमतरतेने रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.
UV प्युरीफायर:
UV म्हणजे अल्ट्रा व्होयलेट तंत्रज्ञानाने पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी केले जातात. यात पाण्यातील क्लोरीन आणि आर्सेनिक काढले जात नाहीत.
याचा वापर अशाच ठिकाणी केला गेला पाहिजे, जिथे खारट पाणी नसून फक्त बॅक्टेरिया मारण्यासाठी फिल्टर ची गरज पडत असेल.
प्रदूषण कमी असलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बोअरवेल चे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही अशा ठिकाणी UV प्युरीफायर वापरला गेला पाहिजे.
UV वापरण्याचे प्लस पॉईंट्स:
१) यात वेगवेगळ्या लेअर्स चा वापर करून पाणी साफ केले जाते.
२) बॅक्टेरिया आणि व्हायरस कमी केले जातात.
UV वापरण्याचे निगेटिव्हीटी पॉईंट्स:
१) बॅक्टेरिया आणि व्हायरस ला पुर्णतः न संपवता फक्त मारले जाते.
२) विजेची गरज पडते
UF अल्ट्रा फिल्टरेशन:
यात वेगवेगळ्या थरांच्या मेम्बरेन मधून पाण्यातील अशुद्ध घाटक साफ केले जातात. हा इलेक्ट्रिसिटी वर न चालत मेकॅनिकल फिल्टरचा प्रकार आहे.
UF वापरण्याचे प्लस पॉईंट्स:
१) वीज वापरली जात नाही
२) नॉर्मल टॅप वॉटर प्रेशर वर काम होऊ शकते
३) बॅक्टेरिया ना मारून पाण्या बाहेर फेकले जाते.
UV वापरण्याचे निगेटिव्हीटी पॉईंट्स:
१) हार्ड वॉटर साठी याचा वापर करता येत नाही
२) आर्सेनिक आणि क्लोरीन जास्त असल्यास याचा वापर करणे उपयोगाचे नाही.
कोणते प्युरीफायर घ्यावे
वॉटर प्युरिफायर नवडताना आपल्या भागातला वॉटर सप्लाय कसा आहे हे माहीत करून घ्यावे
मेट्रो सिटी मध्ये राहत असल्यास तिथले पोल्युशन जास्त असते, याचा परिणाम सप्लाय केल्या जाणाऱ्या पाण्यावर सुद्धा होतो. अशा वेळी RO, UV, UF तिन्ही तंत्रज्ञान असलेले फिल्टर घ्यावे.
फिल्टर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे मिनरल्स ची मात्रा कमी केली जात असल्याने बाजारात TDS कंट्रोलर टेक्निक असलेले फिल्टर सुध्दा उपलब्ध असतात. ते घेण्याचा पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.