मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजे काय? (भाग-१)

माणसाने कितीही नाही म्हटलं तरी स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीबाबत माणूस खूप भावूक व जागरूक असतो. आपल्या मालमत्तेच आपल्या पश्चात काय होणार? हा प्रश्न प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी पडतोच.  अनेक लोकं म्हणतात, “कुठे घेऊन जाणार आहे हा पैसा? तसंही आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेच काय होतंय हे बघायला आपण तर नसणारच” एकाअर्थी हे बरोबर आहे. पण जरी आपण नसलो तरी आपण आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचं काय काय करायच हे मात्र ठरवू शकतो. आपण आपल्या मालमत्तेचं इच्छापत्र / मृत्यूपत्र(Will) बनवून ठेवलं तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या संपत्तीची विभागणी करु शकतोच, पण पुढे त्या संपत्तीसाठी होणारे अनेक वादही टाळू शकतो. मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित करु शकता.

मृत्यूपत्र (Will) म्हणजे काय?

  • मृत्यूपत्र (Will) हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन  मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते.
  • मृत्यूपत्र हे लिखीत स्वरुपात असावे.
  • त्यावर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने साक्षीदारांसमोर सही करणे आवश्यक आहे.
  • साक्षीदार म्हणून अन्य दोन व्यक्तींची सही तारीख, वार, वेळ व ठिकाण यांची नोंद असणेही आवश्यक आहे.
  • मृत्यूपत्र तयार करताना व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ व सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही.

मृत्यूपत्राचे प्रकार-

  1. सेल्फ-प्रूव्हिंग / टेस्टमेंटरी मृत्यूपत्र: हा मृत्यूपत्राचा पारंपारिक प्रकार आहे. यामध्ये मृत्यूपत्र तयार झाल्यावर त्यावर साक्षीदारांसमोर सही केली जाते.
  2. होलोग्राफीक मृत्यूपत्र: हे मृत्यूपत्र साक्षीदारांच्या समोर केले जात नाही. कोर्टात या प्रकाराला फारशी मान्यता नसते.
  3. तोंडी (Oral) मृत्यूपत्र: यामध्ये मृत्यूपत्राबद्दल साक्षीदारांसमोर बोलले जाते. पण या प्रकाराला कायद्याची फारशी मान्यता नसते.

महत्वाचे मुद्दे:

  • मृत्यूपत्रामध्ये अल्पवयीन(minor) अथवा मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलांच्या पालनपोषणाची, भविष्याची तरतूद करुन ठेवता येते. तसच विवाहापूर्वी  अथवा विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या अपत्यांच्या (अल्पवयीन अथवा सज्ञान) नावेही मृत्यूपत्राद्वारे मालमत्ता करता येते.
  • मृत्यूपत्राद्वारे व्यक्तीच्या मालकीची संपूर्ण मालमत्ता दान करता येते अथवा एखाद्या संस्थेच्या नावावरही करता येते.
  • जेव्हा व्यक्ती मृत्यूपत्र करुन ठेवते तेव्हा त्या वक्तीच्या  मृत्यपश्चात संपत्तीचे वाटप हे “Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारस अनुक्रम कायदा १९२५” मधील तरतूदींनुसार केले जाते. परंतु मृत्यूपत्राअभावी मात्र व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” च्या तरतुदीनुसार केले जाते.
  • मृत्यूपत्राद्वारे मालमत्तेची विभागणी करता येते, परंतु काही मालमत्तांची विभागणी मात्र मृत्यूपत्राद्वारे केली जात नाही. यामध्ये प्रामुख्याने आयुर्विमा पॉलिसी, निवृत्तीवेतन, बॉंड्स, स्टॉक, बॅंक खाते यासारख्या मालमत्तांसाठी नॉमिनीसाठीचा फॉर्म हा आधीच भरुन घेतला जात असल्यामुळे या मालमत्तांचा सामावेश मृत्यूपत्रामध्ये करता येत नाही. तसेच  संयुक्त भाडेकरी मालमत्ता(Joint tenant property)  टेनंट प्रॉपर्टी मध्ये  उत्तरजीविता (survivorship) ही संयुक्त भाडेकरी मालमत्ता कायद्यानुसार ठरवण्यात येत असल्यामुळे या प्रकारच्या मालमत्तेसाठीही मृत्यूपत्र करता येत नाही.
  • टॅक्सच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास ज्या मालमत्तेसाठी  मृत्यूपत्र झालेले आहे अशा मालमत्तेची टॅक्स लायबिलीटी (कर दायित्व) तुलनेने कमी असते.
  • संपूर्ण मालमत्तेचा आणि कायदेशीर वारसांचा व कायदेशीर तरतूदींचा  योग्य तो विचार करुनच मृत्यूपत्र बनवावे म्हणजे त्या मृत्यूपत्राला आव्हान देणे सहज शक्य होणार नाही.
  • मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर ते कायदेशीर सल्लागाराकडे किंवा योग्य त्या अधिकाऱ्याकडे सुपूर्त करावे. यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते मृत्यूपत्र सादर केले जाऊ शकते.

मृत्यूपत्राचे  रजिस्ट्रेशन:-

मृत्यूपत्राचे रजिस्ट्रेशन हे बंधनकारक नसले तरी आवश्यक आहे. मृत्यूपत्र रजिस्टर करण्यासाठी त्या भागातील रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार समोर सादर करावे लागते. रजिस्ट्रारकडून सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर आणि सर्व शंकांचे समाधान झाल्यावर त्याची नोंद तारीख, वार, दिवस, तास इ. सह केली जाते. कोर्टामध्ये रजिस्टर्ड मृत्यूपत्र नेहमीच ग्राह्य धरण्यात येते.

मृत्यूपत्र बदलता येते का ?

  • हो. एकदा केलेले मृत्यूपत्र तुम्ही बदलू शकता किंवा त्यामध्ये अमेंडमेंट्स म्हणजेच दुरूस्त्या किंवा सुधारणाही करता येतात.
  • मालमत्तेची खरेदी-विक्री, लग्न किंवा घटस्फोट, मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, मुलांचा किंवा नातवंडांचा जन्म, इ. यासारख्या अनेक कारणांमुळे मृत्यूपत्र बदलण्याची गरज पडते.
  • मृत्यूपत्र बदलण्याची प्रक्रिया अगदी सहज शक्य आहे. पहिले मृत्यूपत्र रद्द करुन दुसरे मृत्यूपत्र करता येते किंवा मृत्यूपत्राला नवीन पुरवणी (codicil) कधीही जोडता येते. Codicil जोडण्यातानाही  मृत्यूपत्राप्रमाणेच साक्षीदारांसमोर सही करावी लागते तसेच त्यावर  साक्षीदारांची सही, तारीख , वार व वेळ व स्थळाचा उल्लेख असणेही आवश्यक आहे.
  • एकापेक्षा अधिक इच्छापत्रं एकाच वेळी अस्तित्वात असतील तर तारखेनुसार/वेळेनुसार ज्या इच्छापत्रावर शेवटी स्वाक्षरी केली गेली असेल तेच ग्राह्य मानलं जाते.
  • मात्र नवीन मृत्यूपत्र तयार करताना अथवा Codicil जोडताना व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ व सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा Codicil किंवा नवीन मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही.

सौजन्य : www.arthasakshar.com


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मृत्युपत्र / इच्छापत्र म्हणजे काय? (भाग-१)”

  1. सर मला एक विचाराचे हाेते तूम्ही वाचसप वर बालू शकता का ७६२०३६६५२०

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।