सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

आपण ‘इन्फॉरमेशन युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या  दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. दररोजच्या जीवनातील विविध पैलूंमधील तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटचा वाढता वापर, यामुळे सायबर अपराधी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर हल्ला करत आहेत. हे अपराध्यांसाठी एका जागी बसून करणे सोपे आहे याचे एक कारण असेही आहे की माहितीच्या देवघेवीचे हे तंत्रज्ञान वापरतांना ते करणाऱ्या व्यक्ती या बरेचदा पूर्णपणे अनोळखी असतात, यात काही सीमारेषा नसतात, म्हणजेच नायजेरियात बसून कोणी तुमच्याशी संवाद साधेल पण भासवेल की हा संवाद अमेरिकेतून होतोय. हे एक साधे सोपे समजावे असे उदाहरण झाले पण सांगायचा मुद्दा हाच की यातले बरेच गुन्हे हे अनोळखीपणाचा फायदा घेऊन केले जातात.

सायबर गुन्हे काय आहे ?

“सायबर स्पेसचे” साधन वापरुन केलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य हे सायबर गुन्ह्यात मोडतात. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात. सोशल नेटवर्कींग द्वारे धमक्या देणे, आर्थिक गुन्हेगारी, मुलांविरूद्ध गुन्हे आणि इ-मेल द्वारे फसवणूक हे सुद्धा सायबर गुन्हेगारीच्या कक्षेत येते.

cyber space

सायबर स्पेस म्हणजे काय ?
जगभरात पसरलेले संगणकीय नेटवर्क तसेच त्यातील माहितीचे भांडार म्हणजेच स्टोरेज याला “सायबर स्पेस” हे काल्पनिक नाव दिले गेलेले आहे. मोबाईल फोन अगदी जीपीएस नेव्हिगेशन सिस्टम्स तसेच इंटरनेटशी जोडली गेलेली इतर कुठलीही साधनं ही सायबर स्पेसचाच भाग आहेत.

इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे आणि निश्चितच ते समाजासाठी एक वरदानही आहे पण त्याचा वापर तेवढा आपण सजगतेने केला पाहिजे तरच आपण त्यातील इंटरनेट बँकिंग सारख्या साधनांचा चांगला फायदा आणि सोशल नेटवर्कींगचा सुद्धा सकारात्मक उपयोग करू शकतो.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

4 thoughts on “सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।