जर जी. डी. पी. दर चांगला असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा होतो की देशात बेकारी कमी आहे. कामगारांचे वेतनमान उच्च आहे. औद्योगिक क्षेत्रात मजुरांना मागणी आहे. उत्पादीत मालाला उठाव आहे.
एखाद्या देशाच्या विशिष्ट कालावधीतील आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जी. डी. पी. म्हणजेच (Gross Domestic Product) ही संज्ञा जगभरात वापरली जाते. राज्यकर्ते, अर्थतज्ञ, गुंतवणूकदार, व्यावसाइक, बँकर, राजकारणी याशिवाय माध्यमे यांनाही त्याच्या आकडेवारी, अंदाजात रस असतो. यात त्या देशातील तिमाही/वार्षिक कालावधीत निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांचे बाजारमूल्य मोजले जाते. जगाच्या तुलनेत एखाद्या विशिष्ठ देशाची प्रगती तसेच इतर देशांच्या तुलनेतील त्या विशिष्ठ देशाची प्रगती किती आहे हे मोजण्याचा तो एक मानदंड आहे. नुसत्या जी. डी. पी. वरून देशातील लोकांचे रहाणीमान आणि क्रयशक्ती निश्चित अशी समजत नसल्यानेच खर्च करण्याच्या त्यांच्या क्षमतेवरुन काढलेला जी. डी. पी. अधिक अचूक असतो. जी. डी. पी. वरून त्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा अंदाज बांधता येतो.
जी. डी. पी. ची व्याख्या करणे सोपे तर मोजमाप करणे ही एक किचकट प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक देशाची जी. डी. पी. मोजण्याची पद्धत वेगवेगळी आहे. साधारणपणे सर्व एकत्रित उत्पन्न किंवा सर्वांनी केलेला खर्च यांची बेरीज साधारण जवळपास सारखी असल्याने तो उत्पनावरून आणि खर्चावरून या दोन प्रकारे काढता येते. उत्पन्नावरून काढलेल्या जी. डी. पी. चा काही लोक जी डी पी (आई) असा उल्लेख करतात. यात सर्वांना मिळणारे वेतन, सर्व नोंदीत आणि अनोंदित फर्मचा करपूर्व नफा याची बेरीज करुन त्याना मिळालेली सरकारी मदत वजा करुन काढतात. तर खर्चावरून जी. डी. पी. काढणे अधिक शास्त्रशुद्ध असून त्यामध्ये सर्वानी केलेला खर्च, गुंतवणूक, सरकारचा खर्च आणि केलेली आयात व निर्यात यांतील फरक यांची बेरीज करुन काढली जातो.
अर्थव्यवस्था खराब असणे म्हणजे कंपन्यांची नफाक्षमता कमी असणे ज्यामूळे शेअरचे भाव खाली येतील त्यामुळे गुंतवणूकदार चिंतित असतील तर अर्थतज्ञ अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे भाकीत करतील.
जी. डी. पी. हा आर्थिक प्रगतीचा मापदंड असल्याने त्याच्या आकडेवारीचा अर्थव्यवस्थेतील सर्व गोष्टींवर परिणाम होतो. जर जी. डी. पी. दर चांगला असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा होतो की देशात बेकारी कमी आहे. कामगारांचे वेतनमान उच्च आहे. औद्योगिक क्षेत्रात मजुरांना मागणी आहे. उत्पादीत मालाला उठाव आहे.जी. डी. पी. तील बदलांचा मग तो कमी होवो अथवा जास्त स्टॉक मार्केटवर ताबडतोब परिणाम होतो. अर्थव्यवस्था खराब असणे म्हणजे कंपन्यांची नफाक्षमता कमी असणे ज्यामूळे शेअरचे भाव खाली येतील त्यामुळे गुंतवणूकदार चिंतित असतील तर अर्थतज्ञ अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे भाकीत करतील.
भारतात जी. डी. पी. मोजण्याचे कार्य केंद्रीय सांख्यकी विभाग (C. S. O.) यांच्याकडून केले जाते. ते दोन्ही प्रकाराने (उत्पादन आणि खर्च) त्याची मोजणी करुन निव्वळ व खरीखूरी (gross and inflection adjusted) आकडेवारी प्रसारित करतात. या दोन्ही मध्ये आठ उपविभाग असून त्यामुळे कोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे ते चांगल्या प्रकारे अधोरेखित होते. यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्याची नोंद ठेवून जतन करणे हे या विभागाचे काम आहे. विविध प्रकारचे सर्व्हे करुन तसेच विविध केंद्र व राज्य सरकारी विभागात समन्वय साधून माहितीचे संकलक केले जाते, जसे शेतीचे उत्पन्न, घावूक बाजार निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, महागाई निर्देशांक इ. या सर्व माहितीचे पृथकरण करुन जी. डी. पी. काढला जातो. याची आकडेवारी तिमाही/वर्ष संपल्यावर दोन महिन्यांनी जाहीर केली जाते तसेच वेळोवेळी माहितीत जी भर पडते त्याप्रमाणे दुरुस्त केली जाते. पुढील तिमाही/वर्ष याबाबतीतील अंदाजही वर्तवला जातो. त्याच्याशी संबंधित घटक त्यांच्या जरूरीप्रमाणे या माहितीचा उपयोग करुन घेतात.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice Information. Sir
thanks
I am NISM student.. Sir…Can u provide basic tutorial for NISM topics in Marathi?
Topics are self explainry but if u will have any difficulty u may contact on mail : udaypingale@yahoo.com
छान साहेब