गृहकर्जासाठी सहअर्जदार कोण राहू शकतो, निर्णय घेण्याआधी हि माहिती समजून घ्या

होम लोन घेत असताना नक्की कोण कोण बनू शकते कोएप्लीकंट किंवा सहअर्जदार. काय आहेत या बाबतीतले नियम?

सहअर्जदार बनताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया या लेखात.

घर खरेदी करताना मध्यमवर्गीय माणसांसाठी होम लोन हा एक चांगला पर्याय आहे. घराच्या रकमेपैकी काही रक्कम स्वतः भरून उरलेली रक्कम होमलोन द्वारे मिळवून ती हळू हळू परत करणे यामुळे मध्यमवर्गीय माणसाचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकते. परंतु होम लोन घेण्याची आणि त्याची परतफेड करण्याची संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने होणे आवश्यक असते.

आज आपण होम लोन घेत असताना अर्जदारा बरोबरच सहअर्जदाराची काय भूमिका असते? सहअर्जदार बनण्यासाठी नेमके काय नियम आहेत? सहअर्जदार बनल्यास नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात हे सर्व जाणून घेणार आहोत.

कोणत्याही होम लोन मध्ये अर्जदाराबरोबरच सहअर्जदाराची देखील महत्त्वाची भूमिका असते.

अर्जदार जर कोणत्याही कारणाने होम लोनची परतफेड करू शकला नाही तर ते होम लोन फेडण्याची कायदेशीर जबाबदारी सहअर्जदाराची असते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराबरोबर सहअर्जदार म्हणून सही करताना भावनात्मक पद्धतीने विचार न करता आपण या होम लोनची आर्थिक जबाबदारी खरंच उचलू शकतो का हा विचार करूनच पाऊल पुढे टाकावे.

नक्की कोण बनू शकते सहअर्जदार? कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ?

सर्वप्रथम आपण सहअर्जदार म्हणजे नक्की कोण हे जाणून घेऊया. सहअर्जदार ही अशी व्यक्ती असते जी होम लोनच्या मुख्य अर्जदाराबरोबर होम लोन मिळण्याबाबतच्या एप्लीकेशनवर सही करते.

सहअर्जदार दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे ज्यांचे उत्पन्न होम लोन फेडण्याकरता वापरले जाऊ शकते आणि दुसरे म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसते परंतु ते सहअर्जदार बनून सही करू शकतात.

यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एखाद्या प्रॉपर्टीचे एकापेक्षा जास्त मालक असतील तर ते सर्वजण सहअर्जदार बनू शकतात, परंतु सगळेच सहअर्जदार प्रॉपर्टीचे मालक असलेच पाहिजे असा काही नियम नाही. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टी साठी मालकाव्यतिरिक्त एखादी तिसरी व्यक्ती होम लोनची सहअर्जदार बनू शकते.

होम लोन साठी अप्लाय करताना परतफेड करण्या करता अर्जदाराच्या पती-पत्नी, माता पिता, मुले यांचे उत्पन्न विचारात घेतले जाऊ शकते. त्याच बरोबर सख्खे बहिण, भाऊ जर सदर प्रॉपर्टीचे मालक असतील तर त्यांचे उत्पन्न देखील परतफेड करण्याकरता विचारात घेतले जाऊ शकते. परंतु अर्जदाराचे बहीण भाऊ जर प्रॉपर्टीचे मालक नसतील तर त्यांचे उत्पन्न विचारात घेतले जात नाही.

सहअर्जदारांचे प्रकार

१. पती/ पत्नी

अर्जदाराचे पती अथवा पत्नी सदर प्रॉपर्टीचे मालक नसतील तरीही सहअर्जदार बनू शकतात. जोडीदारापैकी जो वयाने मोठा असेल त्याच्या रिटायरमेंट पर्यंत होम लोन फेडण्याची मुदत मिळू शकते. पती व पत्नी दोघांच्याही किंवा कोण्या एकाच्या उत्पन्नाचा विचार परतफेडीसाठी होऊ शकतो. पत्नी गृहिणी असेल तरीदेखील ती सहअर्जदार बनू शकते आणि त्यामुळे होम लोन मिळण्याची रक्कम वाढू शकते. अर्थात अशा बाबतीत संपूर्ण होमलोन फेडण्याची जबाबदारी पतीवर असते.

२. भाऊ-बहीण ( दोन भाऊ/ दोन बहिणी) 

जर एकाच घरात रहात असतील आणि दोघेही त्या घराचे मालक असतील तर दोन सख्खे भाऊ एका होम लोनचे सहअर्जदार बनू शकतात. परंतु एक भाऊ आणि एक बहीण किंवा दोन बहिणी एका होम लोनच्या सहअर्जदार बनू शकत नाहीत.

३. वडील-मुलगा

वडील आणि मुलगा होम लोन सहअर्जदार बनू शकतात. त्यासाठी ते दोघेही त्या प्रॉपर्टीचे मालक असणे आवश्यक असते. तसेच वडिलांचे आर्थिक उत्पन्न कमी असेल तरी देखील चालू शकते परंतु होम लोनच्या परतफेडीची मुदत मात्र वडिलांच्या रिटायरमेन्टच्या वयानुसार ठरवली जाते.

४. वडील-मुलगी

लग्न न झालेली मुलगी आपल्या वडिलांबरोबर होम लोनसाठी सहअर्जदार होऊ शकते. परंतु सदर संपत्ती संपूर्णपणे मुलीच्या नावावर असणे आवश्यक असते कारण पुढे विवाह झाल्यावर नाव बदलल्यामुळे कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ नयेत.

५. आई-मुलगा

जर वडिलांचे निधन झाले असेल तर गृहिणी असणारी आई व मुलगा होम लोनसाठी सहअर्जदार बनू शकतात. मात्र जर आई नोकरी करणारी असेल म्हणजेच तिचे स्वतंत्र उत्पन्न असेल तर मात्र वडील जीवित असताना सुद्धा किंवा रिटायर झालेले असताना सुद्धा आई व मुलगा सहअर्जदार बनू शकतात. असे सहसा होम लोनची मुदत वाढवून घेण्यासाठी केले जाते कारण वडिलांपेक्षा आईचे वय लहान असल्यामुळे ती रिटायरहोण्यापर्यंतचा अवधी होम लोन फेडण्यासाठी मिळू शकतो.

६ . मित्र अथवा नातेवाईक

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था मित्र किंवा रक्ताचे नातेवाईक नसलेल्या नातेवाईकांना सहअर्जदार बनण्याची परवानगी देत नाही.

कोणत्याही होम लोनसाठी सहअर्जदार बनण्यापूर्वी खालील गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा.

१. सहअर्जदार बनण्यापूर्वी तुम्ही नक्की सदर संपत्तीचे मालक आहात, की केवळ होम लोनची रक्कम वाढवून मिळण्यासाठी तुम्हाला सहअर्जदार बनवले जात आहे याची तुम्हाला पूर्ण कल्पना असायला हवी.

२. सहअर्जदार जेव्हा अर्जावर सही करतो तेव्हा तो अर्जदाराची आणि सदर होमलोन फेडले जाण्याची संपूर्ण जबाबदारी घेत असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. ही जबाबदारी कायदेशीररीत्या सहअर्जदारावर असते.

३. जर मुख्य अर्जदार होम लोन फेडू शकला नाही तर सहअर्जदारावर त्याच्या बरोबरीने कारवाई होऊ शकते.

४. जर मुख्य अर्जदाराने नियमितपणे ई एम आय भरले नाहीत तर सहअर्जदार असल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर देखील कमी होऊ शकतो.

५. सहअर्जदार म्हणून सही करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे आणि त्यातील अटी व शर्तींचे नीट वाचन करून काही शंका असल्यास त्या सही करण्यापूर्वीच निरसन करून घ्याव्यात.

६. सदर व्यवहार करण्यास जर तुम्ही साशंक असाल , सदर संपत्तीचे तुम्ही मालक नसाल तर सहअर्जदार म्हणून सही करण्यापूर्वी नीट विचार करावा, शंका असल्यास सही करू नये.

तर मित्र मैत्रिणींनो, हे आहेत एखाद्या होम लोन साठी सहअर्जदार बनण्यासाठीचे नियम आणि त्यातील काही महत्त्वाच्या बाबी. सहअर्जदार बनण्यापूर्वी या सर्व बाबींचा नीट विचार करा आणि मगच अशी सही करा.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।