स्त्रियांच्या आरोग्यविषयी समस्या आणि त्यांच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी

आजच्या जगात स्त्रीने इतर सर्वच क्षेत्रात आपल्या यशाची शिखरे गाठली असली, तरीही आरोग्याच्या बाबतीत मात्र ती थोडी कमीच पडते.

घरातील इतर सदस्य तिच्या आरोग्याची काळजी घेवो न घेवो मात्र स्त्री स्वतः स्वतःच्या आरोग्याला दुय्यम स्थान देताना दिसून येते.

घरातील पुरुष जर आजारी पडला तर जेवढ्या तातडीने तो डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतो तेवढी स्त्री घेत नाही. जमेल तसे उपाय करून किंवा मनाने औषध घेऊन ती दुखणे अंगावर काढते.

स्त्री व पुरुष यांच्या शारीरिक प्रकृतीत फरक आहे, आणि म्हणूनच विविध आजारांचा त्यांच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो व त्या आजाराची लक्षणेही दोघांमध्ये वेगवेगळी दिसतात.

स्त्रियांच्या आरोग्यविषयक आढळणाऱ्या काही सामान्य समस्यांची तपशिलवार माहिती या लेखात घेऊया.

१) ह्रदयरोग : ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अशा बातम्या सर्रास ऐकू येतात, मात्र स्त्रीचे निधन ह्रदयविकाराने झाल्याचे फारसे ऐकू येत नाही. परंतु संशोधनानुसार महिला मृत्युमुखी पडण्याचे पहिले कारण ह्रदयविकाराचा झटका हे आहे.

स्त्रीच्या शरीरात असणाऱ्या मासिक पाळी मुळे तिला ह्रदयविकार होण्याची शक्यता कमी असली तरीही सध्याच्या बदलत्या जीवनशैली मुळे व वाढत्या ताणतणावामुळे या रोगाचे प्रमाण वाढले आहे.

तरुण वयात ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याच्या बातम्या सिनेसृष्टीतुन सतत येत आहेत. रजोनिवृत्ती नंतर स्त्रियांना छातीत जळजळ होणे, मळमळ होणे, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे जाणवतात. मात्र ही ह्रदयविकाराचीच लक्षणे आहेत हे ओळखू न शकल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते व पुढे उदभवू शकणारा धोका वाढतो.

२) स्ट्रोक: स्ट्रोक चा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त आहे. मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन येणारा स्ट्रोक व शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा (ब्लॉकेजेस) होऊन येणारा स्ट्रोक असे स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत.

या आजाराचे सामान्य लक्षण म्हणजे हातापायाला मुंग्या येणे किंवा शरीराच्या एखाद्या भागात बधीरता जाणवणे. रक्ताच्या गुठळ्या झाल्या तर आपल्या मेंदूपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही, परिणामी एखाद्या अवयवाला मुंग्या येतात किंवा त्याची हालचाल मंदावते.

अशी लक्षणे आढळल्यानंतर डॉक्टर बरेचदा मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे निदान करतात. उपाय म्हणून रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरू केल्या जातात. स्त्रियांमध्ये गर्भधारणा आणि स्ट्रोक याचा संबंध आहे. गर्भधारणे दरम्यान उच्च रक्तदाबाची समस्या बऱ्याच स्त्रियांना जाणवते व वाढत्या रक्तदाबामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

३) मधुमेह: जगभरात मधुमेह ग्रस्तांची सर्वात जास्त संख्या चीनमध्ये आहे व त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो भारताचा! भारतात प्रत्येक अकरा व्यक्तींमधील एक व्यक्ती मधुमेहानी ग्रस्त आहे. एकूण ७७ मिलियन भारतीयांना मधुमेह आहे. हा एक मेटाबोलीक आजार आहे ज्यामध्ये आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढते व इन्सुलिन तयार होत नाही. म्हणूनच रुग्णाला बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते. स्त्री-पुरुषांप्रमाणे लहान मुलांमधेही या आजाराचे प्रमाण वाढतेच आहे. 

बरेचदा प्रसूतीनंतर किंवा गर्भधारणे दरम्यान महिलांना मधुमेहाची लागण होते. यामुळे गर्भधारणा सामान्यपेक्षा अधिक जटिल व गुंतागुंतीची बनते. त्यासाठी काही विशेष चाचण्या व योग्य औषधोपचाराची गरज निर्माण होते.

संतुलित आहार, योग्य व्यायाम व जीवनशैली मध्ये बदल करून हा धोका कमी करता येऊ शकतो.

४) माता आरोग्य समस्या:
आई होण्याचा निर्णय घेण्याच्या अगोदरच खरंतर त्या स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण चाचणी केली तर पुढील गर्भधारणा सोपी होते. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या स्त्रियांना विशेष काळजी घ्यावी लागते.

तसेच वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केलेली असल्यास काही दिवस गर्भधारणा होऊ न देणे श्रेयस्कर ठरते. डॉक्टरांच्या सल्याने योग्य उपचार घेऊन सुलभ प्रसूती साध्य करता येऊ शकते.

भारत सरकारने गर्भस्थ स्त्रियांसाठी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ सुरू केली आहे, यामध्ये गर्भधारणेचपासून तर बाळाच्या जन्मापर्यंत आईला एकूण ५००० रु टप्याटप्याने देण्यात येतात.

या काळात आईला भरपूर लोह, कॅल्शियम व सकस आहाराची गरज असते. आता अंगणवाडी आशा सेविकांकडे औषध गोळ्या मोफत उपलब्ध असतात व त्या योग्य मार्गदर्शनही करतात.

५) मूत्रमार्गात संक्रमण :
मुळातच स्त्री व पुरुष यांच्या शरीर रचनेतील फरकामुळे अशा प्रकारच्या संसर्गाचा जास्त धोका स्त्रीला असतो. मूत्रमार्ग लहान असल्यामुळे स्त्रियांना जिवाणू संसर्ग लवकर होऊ शकतो. वारंवार लघवी होणे, मूत्रमार्गात जळजळ होणे ही संक्रमणाची लक्षणे आहेत. सामान्यता हे संक्रमण विना औषधाचेही ठीक होते, परंतु तसे न झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक घेऊन पूर्णतः बरे होऊ शकते.

६) लैगिंक आरोग्य :  स्त्री-पुरुष लैगिंक संबंधा दरम्यान होणाऱ्या संसर्गाचे एकूण ३० पेक्षा जास्त प्रकार आहेत. त्यापैकी काही संसर्ग हे योग्य लसीकरणाने प्रतिबंधित करता येतात.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे एकेकाळी स्त्रियांमध्ये मृत्युमुखी पडण्याचे एक प्रमुख कारण होते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कॅन्सरच्या पेशी वेळीच ओळखता येतात व नष्ट करता येतात.

त्यामुळे सर्वायकल कॅन्सर चे प्रमाण लक्षणीय रित्या कमी झालेले आहे.

७) स्तनाचा कर्करोग : स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा सामान्य कर्करोग आहे. त्यांच्या आयुष्यात हा कर्करोग होण्याची शक्यता सरासरी १२% इतकी असते. म्हणून वयाच्या ४० नंतर प्रत्येक स्त्रीने मॅमोग्राफी (स्तनाच्या कर्करोगाची स्वचाचणी) करायला शिकणे गरजेचे आहे.

दर महिन्याला अशी चाचणी करून स्तनात एखादा बदल जाणवल्यास 3D मॅमोग्राफी करून निदान केले जाते.

निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून हा कर्करोग टाळता येऊ शकतो.

स्तनाच्या कर्करोगाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

८) ऑस्टिओपोरोसिस : या आजारात हाडे कमकुवत होतात, वारंवार फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढते. स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्याचे बेरचदा आढळून आले आहे.

मुळातच कृश प्रकृती, कमी बीएमआय असणाऱ्यांना या आजाराची धोका जास्त असतो. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन व कोवळ्या उन्हातील व्हिटॅमिन डी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येते.

९) अल्झायमर : अल्झायमर म्हणजे विस्मृतीचा आजार. या रोगामध्ये रुग्णांच्या मेंदूत काही अशा प्रकारचे कण तयार होतात की जे निरोगी पेशींना नष्ट करतात. त्याला शास्त्रीय भाषेत न्यूरॉन म्हणतात. आपल्या मेंदूत असे अनेक न्यूरॉन एकमेकांना जोडून एक मोठी जाळी (नेटवर्क) तयार झालेले असते, ज्यामुळे आपण लक्षात ठेऊ शकतो. इथल्या पेशी नष्ट झाल्यावर रुग्णाला लक्षात ठेवणे कठीण होते, याशिवाय निर्णय घेण्यात अडचण येत, बोलताना अडथळा निर्माण होतो.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।