बारटेंडर म्हणून काम सुरू करून, स्वाभिमानाने आणि अभ्यासपूर्ण काम करून आपल्या कामाची किंमत जपणारी ही एक मराठी मुलगी!!
मुलींनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःची छाप उमटवली वगैरे आपण नेहमी सांगतो.
मात्र अजूनही काही बाबतीत आपल्या भुवया अजुनही उंचावतात.
आता जसं की बारटेंडर म्हणून एक मुलगी काम करते हे सांगीतले तर नजरा जरा विस्फारणारच…
तर ही आहे मुंबईतली त्रिशा कोपर्डे जी बारटेंडर म्हणून काम करते.
लहानपणी स्पोर्टसमध्ये रमणारी त्रिशा टेनीस, फुटबॉल, क्रिकेट असे खेळ स्टेट लेव्हलवर खेळायची.
तेव्हा तिला वाटायचं की खेळात करिअर करावं वयानुसार कधी तिला लॉयर व्हावं असं वाटायचा तर कधी डिटेक्टिव्ह होण्याची स्वप्न ती बघायची.
सायन्सला ऍडमिशन घेण्यामागे त्रिशाचा असा विचार होता की मग पुढे कोणताही मार्ग स्वीकारता येऊ शकतो.
फूड शोज मध्ये रमणारी त्रिशा बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटकडे वळली. इथे तिची ओळख अल्कोहोलशी झाली.
सामान्यपणे अल्कोहल विषयी बरेच समज-गैरसमज असतात पण त्रिशाला हळूहळू त्यातली खोली कळत गेली.
अल्कोहोलचा अभ्यासातला इंट्रेस्ट वाढला तसं त्रिशाने आई-वडिलांशी चर्चा करून अल्कोहोलचा आणखी अभ्यासही केला.
ड्रिंक, कॉकटेल तयार केल्यानंतर ती टेस्ट करावी लागते. पण जॉब करत असताना ऑन ड्युटी कोणीही बार टेंडर दारू पीत नाही हे त्रिशा आवर्जून सगळ्यांना सांगते.
100% पँशन घेऊनच या क्षेत्रात उतरायला हवं हे त्रिशाच्या लक्षात आलं.
यासाठी आधी या क्षेत्रामध्ये कुठल्या मुलींनी काम केलं आहे का? याचा तिने शोध घेतला तेंव्हा एक ठराविक चार ते पाच नावे तिच्या समोर सातत्याने आली.
अभिमानाची गोष्ट अशी होती की त्यातली दोन ते तीन नावं ही मराठी मुलींची होती.
आई वडिलांशी चर्चा करूनच त्रिशा बारटेंडर या जॉब कडे बघत होती.
आई-वडिलांनी तिचं कामही प्रत्यक्ष येऊन पाहिलं आणि त्यांनी त्यांचा पाठिंबा कायम ठेवला.
एकदा शिक्षणाचा भाग म्हणून तिला कॉफी शॉप सांभाळायला मिळालेलं होतं.
तिथं एका ग्राहकांनं रेअर व्हिस्की ऑर्डर केली. त्रिशाची उत्सुकता चाळवली तिने बाटली वरची माहिती वाचली. ग्राहकांशी संवाद साधला.
बोलणं संपलं तेव्हा तिने पक्कं केलं होतं की मला बार टेंडर व्हायचं आहे.
बार टेंडर होणं ही सोपी गोष्ट नक्कीच नसते. संध्याकाळच्या ड्युटीसाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते.
ग्राहकांशी सुसंवाद साधत नवनवे ड्रिंक ट्राय करण्यासाठी त्यांना हळुच सुचवावं लागतं.
कॉकटेलची तयारी करावी लागते. काम संपून सगळी आवराआवर होते, तेंव्हा पहाटेचे 2 ते 3 वाजलेले असतात. तोपर्यंत एनर्जी ही टिकवावी लागते.
कॉकटेल करताना भारतीय सामग्रीचा वापर करण्याकडे त्रिशाचा कल असतो.
प्रत्येक ब्रँडचा इतिहास आणि एक संस्कृती असते त्याचा अभ्यास करूनच बार वरती उभं रहाता येतं.
मुलगी म्हणून सतत घाबरत राहण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेणं त्रिशाला महत्त्वाचं वाटतं.
बारटेंडर जॉबचं शेड्युल, लाइफस्टाइल मॅच करणं हे एक आव्हान असतं.
एक मुलगी बार टेंडर म्हणून समोर आली की माणूस अनकम्फर्टेबल होतो. त्याच्याशी संवाद साधत त्याला कम्फर्टेबल करावं लागतं.
काही ब्रँडच्या कॉकटेल स्पर्धेतही तिने भाग घेतला होता.
अनुभव आणि बक्षिसंही मिळवली. स्पर्धेत आंबेहळद ड्रिंक करून परीक्षकांची मनं जिंकली.
आज तिने स्वतः चा एक व्यवसाय सुरू केलेला आहे, आणि आणि मुलींसाठी एक नवीन मार्ग, एक नवं क्षेत्रं खुलं केलेलं आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.