ज्ञानवापी मस्जिदितील सर्वेक्षण पूर्ण झाल्या नंतर, तिथे शिवलिंग आसल्याचा दावा हिंदू पक्षाने केला, तर मुस्लिम पक्षाने तो कारंजा असल्याचे सांगून आपली बाजू मांडली.
यावर आता न्यायालयाकडून निकाल येईल. पण सध्या ट्विटर वर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
तो व्हिडीओ You Tube वर 13 वर्षांपूर्वी अपलोड केला गेलेला, CNN चा रिपोर्ट आहे.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट भागातील हा व्हिडीओ, ऑक्टोबर १९९३ च्या घटने बद्दलचा आहे.
या रिपोर्ट मध्ये असं सांगितलं गेलं आहे की, सॅन फ्रान्सिस्को च्या गोल्डन गेट भागात एक दगड ठेवला गेला आहे, ज्याची पूजा करण्यासाठी लोक दुरहून येतात. शिवलिंग म्हणून त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी दूर दूरहून हिंदू लोक श्रद्धेने येत होते. या ठिकाणी मंदिर करण्याची इच्छा हिंदूंची होती. पण तशी परवानगी मिळाली नाही.
कारण या रिपोर्टनुसार ज्याला शिवलिंग समजून पुजले जात होते, तो एक चार फूट उंच आणि बुलेटच्या आकाराचा एक ट्राफिक बॅरिकेट होता. चार वर्षांपूर्वी शहरातल्या क्रेन ऑपरेटर ने हा ट्रॅफिक बॅरिकेट गोल्डन गेट पार्क मध्ये आणून ठेवला होता. आणि हळूहळू हिंदू धर्मीय त्याची पूजा करू लागले.
शिवलिंग म्हणून पुजला जाणारा हा ट्रॅफिक बॅरिकेट काढण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका मूळ धर्माने हिंदू असलेले मायकेल बोवेन, यांनी केली होती. पण न्यायालयाने त्यांच्यावर १४००० डॉलरचा दंड ठोठावला.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.