स्वस्थ, आरोग्यपूर्ण शरीर हि माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी असते. आणि याची जाणीव आपल्याला या कोरोना काळात प्रकर्षाने झालेलीच आहे.
आजार, त्यात वेगवेळी ट्रीटमेन्ट, गोळ्या औषधांच्या सहऱ्याने जगणं ही वेळ कधीही न यावी अशीच आपली इच्छा असते. आज आपण बोलणार आहोत डायबिटीस बद्दल.
मित्रांनो, हे तुम्हाला माहित आहे का, कि आपलं शरीर हा ऊर्जेचा एक प्रचंड मोठा स्रोत आहे. डायबिटीस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीचे ऍक्युप्रेशर पॉईंट्स कोणते आहेत याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आहार नियंत्रण म्हणजे डाएट कंट्रोल करणे अतिशय आवश्यक असते अन्यथा मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या हृदय विकार, किडनीचे विकार आणि इतर काही गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा की नाही? खायचा असल्यास कुठला तांदूळ खावा? याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मधुमेह हा असा आजार आहे की त्याचे तात्पुरते परिणाम तर दिसतात परंतु मुख्यत्वे दूरगामी परिणाम जास्त असतात. मधुमेहाला ‘सायलंट किलर’ असे म्हटले जाते. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण जर नियंत्रणात नसेल तर त्याचा शरीरातील अवयवांवर हळूहळू परिणाम होऊन पुढे ते निकामी होऊ लागतात आणि तरुण वयातच जर मधुमेह झाला तर हा त्रास लवकर सुरु होऊ शकतो.
मधुमेह न होऊ देणे हा ह्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी डायट कंट्रोल, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेणे हे करता येईल.
त्याचबरोबर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे ना हे तपासून पाहणे आवश्यक ठरते. डायबिटीसचे अचूक निदान करण्यासाठी Hba1c टेस्ट करणे गरजेचे का आहे? याबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आपल्या शरीराला कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते.
अर्थातच ही ऊर्जा अन्नातून मिळवली जाते.
अन्नाचे उर्जेत रूपांतर करण्यासाठी आपल्या शरीरातील स्वादुपिंडे इंसुलिन नावाचे हॉर्मोन तयार करतात.
हे इंसुलिन अन्नावर प्रक्रिया करून त्याचे उर्जेत रूपांतर करते.
जर ही इंसुलिन तयार होण्याची प्रक्रिया काही कारणांमुळे मंदावली किंवा बंद झाली तर हे अन्नाचे उर्जेत रूपांतर होण्याचे चक्र बिघडते.
आणि पर्यायाने त्या व्यक्तीस मधुमेह होतो. आहे की नाही सोपी गोष्ट!!
तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? लक्षणे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मधुमेह किंवा डायबेटीस हा एक भयंकर आजार आहे. मात्र तुम्ही तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल कंट्रोल करुन या समस्येवर मात करू शकता.
शुगरची चिंता सतत मनात ठेवूनच डायबेटिस असणारे लोक गोड खाण्याचं टाळतात. अगदी फळंसुद्धा खात नाहीत. फळांमध्ये साखर असते, तर फळे खाऊ नये. या भीतीत आणि गैरसमजात लोक राहतात.
खरंतर डायबेटीस असोसिएशनचं असं म्हणणं आहे की डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी सगळ्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत.
काहींना एखाद्या प्रकारच्या फळाची अँलर्जी असते तेव्हढं फळ सोडून बाकीची फळं खायला काहीच हरकत नाही. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी ही 6 फळं ठरतात वरदान! याबद्दल समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.