“कभी आए ना जुदाई” म्हणणा-या पत्नीनं नव-याला त्याच्या प्रेयसीशी लग्न करू देण्यासाठी दीड कोटी रूपये मागितले.
श्रीदेवी, अनिलकपूर आणि उर्मिला मातोंडकरचा जुदाई चित्रपट आठवतोय?
मध्यमवर्गीय काजल (श्रीदेवी) काटकसरीने संसार करायला वैतागलेली असते.
लॉटरीची तिकिटं काढून श्रीमंत होण्यासाठी धडपडणाऱ्या गृहिणीला, म्हणजेच काजलला जान्हवी (उर्मिला) दीड कोटीची ऑफर देते.
ही ऑफर चक्क नवरा विकण्यासाठी असते!
परदेशातून परतलेली जान्हवी प्रामाणिक इंजिनिअरच्या प्रेमात पडते, त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याच्या बायकोला दीड कोटी रुपये देण्याची तयारी दाखवते.
काजल ही ऑफर स्वीकारते आणि पुढं काय घडतं हे चित्रपट ज्यांनी पहिला आहे, त्यांना माहीत आहेच.
ही कथा चित्रपटातच शोभते, भारतात असं घडणं शक्य नाही असा विचार जर तुम्ही करत असाल तर मात्र तुम्ही चुकताय.
भारतात मध्यप्रदेशात नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली.
तिथल्या एका महिलेनं फसवणूक करणाऱ्या पतीला दीड कोटी रुपयांच्या बदल्यात त्याच्या प्रेयसीशी लग्न करू द्यायला परवानगी दिली.
या घटनेची सुरवात तेंव्हा झाली जेंव्हा एका अल्पवयीन मुलीनं कौटुंबिक न्यायालयात केस दाखल केली.
या मुलीनं सांगितलं की तिच्या वडिलांचे त्यांच्या ऑफीसमधल्या महिला सहकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते आणि त्यामुळे घरात अनेकदा भांडणं होत होती.
या भांडणामुळे तिच्या आणि तिच्या बहिणीच्या शिक्षणात अडथळा येतो असं ही त्या अल्पवयीन मुलीनं सांगितलं.
अधिक चौकशीतून समोर आलं की या माणसानं खरंच त्याच्या ऑफिसमधल्या एका महिलेसोबत संबंध जोडले होते.
आपल्या पत्नीला सोडून त्या माणसाला दुसऱ्या स्त्रीसोबत राहायचे होतं.
पत्नी मात्र नव-याच्या दुसऱ्या लग्नाच्या साफ विरोधात होती.
शेवटी कोर्टानं दोघांनाही समुपदेशनासाठी बोलावलं.
अनेक फेऱ्यांनंतर, महिलें तिच्या पतीला सोडण्यास सहमती दर्शवली, पण एका अटीवर.
तिच्या पतीचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, तिचंं घर आणि २७ लाख रुपये रोख असे एकूण दीड करोड रुपये तिला मिळावेत.
ही ती अट होती.
जुदाई चित्रपट १९९७ सालचा. त्या चित्रपटात ही पतीची किंमत दीड ते दोन करोड एव्हढीच देण्यात येते.
मध्यप्रदेशातल्या या घटनेनंतर नेटक-यांनी २५ वर्षात नव-याच्या किंमतीत काहीच बदल न झाल्याचे मिम्स ही व्हायरल केले होते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.