मनाचं कम्प्युटर अपडेट ठेऊन यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी हे करा!

मनाचा कॉम्पूटर फॉर्मॅट करायला शिकायचं, त्याला व्हायरस मुक्त करायचं मग बघा तो कसा परफॉर्मन्स देईल, ताबडतोब उर्जेची पातळी वाढल्याचे जाणवेल. यश आणि समृद्धी मिळवायची असेल तर या लेखात सांगितलेल्या गोष्टी नीट ध्यानात घ्या.

मित्रांनो,

जवळपास शंभर वर्षांपुर्वी म्हणजे १९२० मध्ये पहीला व्यावसायिक रेडीओ बाजारात खरेदी केला गेला. अख्ख्या जगाला त्याचे कोण कौतुक होते?

त्या काळात आपल्या घरी रेडीओ असणं, हे प्रतिष्ठेंचं लक्षण मानलं जायचं.

जगभरामध्ये रेडीओ खुप लोकप्रिय झाला, रेडीओचं वेड सगळीकडे खुप वेगाने पसरलं.

तरीही रेडीओला पाच कोटी माणसांपर्यंत पोहचायला तब्बल ३८ वर्ष लागली होती.

टी.व्ही. ला पाच कोटींचा टप्पा गाठायला अठरा वर्ष लागली.

जग वरचेवर गतिमान होत गेलं, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत होतं.

मोबाईलचे पाच कोटी युजर्स व्हायला अवघे तीन वर्ष लागले!!!

आयफोनने हे तेवीस महिन्यात साध्य केलं…

आणि….

फेसबुकला पाच कोटींचा टप्पा गाठायला फक्त तेरा महिने, फक्त तेरा महीने!..

ह्यातुन दोन धडे शिकण्यासारखे आहेत.

धडा पहिला

मागच्या शंभर वर्षात काळाची पावलं किती झपाट्याने बदलत आहेत, हे समजण्यासाठी एवढं एकच उदाहरण पुरेसं आहे.

जग वेगानं बदलतयं, तुम्ही काळासोबत आपली गती वाढवायला शिकलात की नाही?

धडा दुसरा

हे सर्व अब्जोपती होवुन जगावर राज्य करत आहेत, कारण त्यांनी पाच कोटी लोकांना सेवा दिली.

आपल्या सगळ्यांना श्रीमंत व्हायला नक्की आवडेल.

मग रोजच्या जीवनात तुम्ही किती लोकांना सेवा देता?

व्यवसाय नफ्यात किंवा तोट्यात का जातो, याचं एक गुपित आहे,

ज्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, ज्याला नीट समजुन घेतलं जात नाही, असं एक मला समजलेलं सिक्रेट, आज मी तुम्हाला सांगतो.

तुमचे उत्पन्न जर का महिना पाच ते वीस हजार रुपयांच्या मध्ये आहे, तर तुम्ही फक्त एक ते पाच माणसांना सेवा देत आहात.

जर तुमचे उत्पन्न महिना पन्नास हजारांच्या आसपास आहे, तर तुम्ही पन्नास एक लोकांच्या आयुष्याला प्रभावित करत आहात.

तुमचे दर महिन्याचे उत्पन्न एक लाख रुपये आहे, याचा अर्थ नियमित तुमची सेवा घेणारे शंभर ग्राहक तरी तुम्ही जोडले आहेत.

हे उत्पन्न महिना दहा लाख रुपयांपर्यंत न्यायचे असेल तर तुम्हाला तुमची सेवा एक हजार माणसांपर्यंत पोहचवावी लागेल.

तुम्हीही पाच कोटी लोकांवर प्रभाव टाकु शकलात तर जगाच्या इतिहासात तुमचंही नाव सोन्याच्या अक्षरात लिहलं जाईल.

सगळं जग तुम्हाला स्टीव्ह जॉब्ज आणि मार्क झुकरबर्ग सारखं डोक्यावर घेईल.

सुख, समृद्धी, प्रसिद्धी तुमच्या पायाशी लोळण घेईल.

माझी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोर्सची बॅच सुरु झाली की मला मॅसेज सुरु व्हायचे…

  • सर, मला दहा लाख रुपये हवे आहेत, कसे मिळतील?
  • मी नियमित व्हिज्वलायजेशन करतो, मला अजुन पैसे का मिळाले नाहीत?…
  • मी चाळीस कोटींचा मालक आहे, असे स्वप्न मी पाहतो. केव्हा येणार प्रत्यक्षात?

अशा लोकांना माझा पहिला प्रश्ण हाच असतो, की तुम्ही किती लोकांना सेवा देता?

तुमची ग्राहकसंख्या वाढवा. सेवेचा दर्जा वाढवा.

“तुमची स्वप्ने नक्की पुर्ण होणार.”

कामाच्या पद्धतीत बदल न करणं, वर्षानुवर्ष एकाच पद्धतीचं काम करणं आणि आपोआप बदल घडतील अशी वेडी आशा बाळगणं, हा एक प्रकारचा मुर्खपणाच आहे.

आपल्या आजुबाजुलाच एक नजर टाका, असे लोक तुमच्या बघण्यात आहेत का?

एखादा मेहनती, कामसु, दिवसरात्र कष्ट उपसणारा शेतकरी तीच आपली कालबाह्य पद्धतीची शेती करुन जगण्यासाठी, रोजच संघर्ष करतो.

एखादा दुकानदार त्याच पन्नास साठ वर्षांखालच्या आऊटडेडेट पद्धतीने, पद्धतशीर दुकान मांडुन, नटून थटुन, गल्ल्यावर बसतो, आणि ग्राहक दुकानात येण्याची वाट बघुन बघुन थकतो.

शेवटी कंटाळतो आणि टॅक्स भरावा लागतोय म्हणुन सरकारला दोष देतो.

आणि एखादा नोकरदार फक्त नोकरीवरुन काढुन टाकले जाणार नाही, अशा बेताचे मोजुनमापुन काम करतो, आणि कंपनीकडुन भरमसाठ पगारीची अपेक्षा करतो.

कामचोर कूठला!…

अशा वेळकाढु वृत्तीने ह्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन येईल का?

आपल्या ‘सो कॉल्ड’ सुरक्षित कोषामध्ये, रोज रोज तेच ते, जीवन जगणार्‍या लोकांना, जगामध्ये स्वतःची वेगळी अशी छाप पाडता येईल? असामान्य अशी ओळख निर्माण करता येईल?

आपण राहतो त्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये आपले नाव आदराने घेतले जावे, असे एखादे तरी मोठे काम, काही उल्लेखनीय असे ह्यांच्याकडून घडले आहे का?

ते ही जाऊ द्या, अशा लोकांना स्वतःकडुन अपेक्षित आहे, एवढे तरी यश मिळेल का?

यश नाही मिळाले तर का नाही येणार निराशा?

मग नेमकं काय केलं म्हणजे अशा तुमची स्वप्नं पुर्ण होण्याचा दरवाजा उघडेल?

१. स्वतःला ओळखा

तुम्ही महान आहात. तुम्ही साधारण आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेला नाहीत.

आपल्या प्रत्येकामध्ये एक अदभुत शक्तीचा आणि उर्जेचा अखंड स्त्रोत आहे, कधीही न आटणारा हा वाहता झरा आहे.

कधीनाकधी आधी प्रचंड अवघड आणि अशक्य काम सहज साध्य करुन तुम्ही स्वतःला चकित केले आहे….. तो प्रसंग आठवा.

त्या प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्यात दडलेल्या त्या शक्तीची झलक बघितली आहे.

जेव्हा जेव्हा आपण दुःखी कष्टी होतो, तेव्हा आपण आपल्या आतमधल्या शक्तीला विसरतो.

त्या शक्तीला विसरतो, म्हणुन तर आपण निराश आणि उदास होतो.

त्या उर्जेचा दररोज वापर करा. त्या शक्तीची पुर्ण अनुभुती घ्या. ती शक्ती कशी जागृत करता येईल?

१) रोज कमीत कमी अर्धा तास ध्यान करा. काही नसेल येत तर मांडी घालुन डोळे मिटुन फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. विचार शृंखला तुटेल.

मनाचा कॉम्पूटर फॉर्मॅट करायला शिकुन घ्या, तो व्हायरसमुक्त होईल, आणि जबरदस्त परफॉर्मन्स देईल. ताबडतोब उर्जेची पातळी वाढल्याचे जाणवेल.

२) सकारात्मक संगतीत रहा, आनंदी, उत्साही मित्र निवडा, दुःखी, कष्टी, रागीट, रडक्या लोकांना चार हात दुर ठेवा, त्यांच्याप्रती करुणा असावी, पण त्यांच्या दुःखात गुंतु नका.

३) कोणत्या ना कोणत्या प्रकारे ह्या जगाची, इथे राहणार्‍या लोकांची निस्वार्थ सेवा करा. आपल्या जखमांना कुरवाळुन बसण्यासाठी, एका कोपर्‍यात बसुन मुळुमुळु रडण्यासाठी, तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आणि इतर यशस्वी लोकांचा द्वेष करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही

याउलट आपल्या आजुबाजुच्या लोकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे.

२. माणसं जोडा

पैसा काही आपोआप आकाशातुन पडत नाही, किंवा प्रत्येकालाच काही लॉटरी लागत नाही, खुप पैसे मिळवण्याचे स्वप्न पाहिले की गुप्तधनाचा हंडा सापडुन आपण एका क्षणात श्रीमंत होणार नाही.

काही न करता पैसा मिळेल हा भ्रम आहे. कुछ पाने के लिए कुछ देना पडता है!..

हो, पैसा नक्की येईल. पण तो कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्फत येईल. तुमच्या आजुबाजुची माणसं, तुमचे ग्राहक तुम्हाला शोधत येतील, आणि तुम्हाला स्वखुशीने पैसेही देतील.

जर तुम्ही त्यांना आवडलात, जर तुम्ही त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी झालात तर!…

जर तुम्ही त्यांना वारंवार तुमच्याकडे यायला भाग पाडले तर!

३. स्वतःला रोज चांगल्या चांगल्या सवयी लावा

तुम्हाला ती हत्तीच्या पायाला बांधलेल्या दोरीची गोष्ट माहीतीये ना!

लहानपणी हत्तीच्या पायाला दोरखंडाने बांधलं, की मोठा झाल्यावर तो बलदंड हत्ती एका साध्या काथ्याच्या दोरीचा पण गुलाम बनुन जगतो.

तीच गत आपलीही होते, कारण आपली स्वतःला कमी लेखण्याची लागलेली सवय!

मी हे करु शकेन का? मला हे जमेल का? माझी स्वप्नं खरचं पुर्ण होतील का? तुम्ही स्वतःवर घातलेल्या मर्यादा हे काल्पनिक बांध आहेत!

स्वप्नं बघायची सवय लावा, जागेपणी स्वप्न जगायची सवय लावा.

लवकर उठण्याची सवय लावा, ध्यान, व्यायामाची सवय लावा, वेळच्या वेळी जेवण करा, भरपुर पाणी प्या, छान छान पुस्तकं वाचण्याची सवय लावा.

जिथे जाल तिथे आनंद आणि उत्साह पसरवण्याची सवय लावा. खळखळुन हसण्याची सवय लावा.

भीतीदायक संकटांसमोर मिश्किलतेने हसण्यावर नेण्याची सवय लावा.

तुमच्या चेहर्‍यावरचे गोड स्मितहास्य बघुन मनात दबा धरुन बसलेल्या भीतीच्या काळजाचा थरकाप उडेल आणि ती छुमंतर होईल.

मनापासुन स्वतःवर प्रेम करण्याची सवय लावा.

का नाही बदलणार आयुष्य? त्याला बदलावचं लागेल.

आपल्या ह्या छोट्या छोट्या सवयी म्हणजेच तर आपलं आयुष्य!…

जे लोक स्वतःला चांगल्या सवयी लावण्यासाठी जागरुक राहतात, त्यांची मनस्थिती, त्यांचं आरोग्य, त्याचं उत्पन्न अधिकाधिक सुधरत जातं.

बी पेरलं की झाड येतंच येतं, तसं श्रम केले की मोबादला मिळतोच मिळतो.

लेख आवडल्यास, लेखातील मुद्दे पटल्यास, मनमोकळी प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.

धन्यवाद आणि मनःपुर्वक शुभेच्छा

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

10 thoughts on “मनाचं कम्प्युटर अपडेट ठेऊन यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी हे करा!”

  1. अतिशय मोजक्या शब्दात जिवन जगण्याची कला शिकवणारख आपला हा लेख मला खूप च आवडला.नकारात्मक अवस्थेतील व्यक्ती ने एकदम उर्जा मिळावी व सकारात्मक मोड मधे याव असा हा तुमचा अतिशय छान, सुंदर,लेख आहे. धन्यवाद.

    Reply
  2. हा लेख वाचल्यानंतर शरीरात एक सकारात्मक उर्जा निर्माण झाली.खरचं तुमचे लेख खूपच सुंदर असतात.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय