धीरुभाई, धीरुभाई आव्या छे!….

उद्योगजगताचा अनाभिषिक्त राजा, साहसी योद्धा, वाटाघाटी जिकंणारा चतुर, शेअर मार्केटला आपल्या बोटांवर नाचवणारा एक चलाख माणुस….

अशी कित्येक विशेषणे असणारा एक माणुस होता…

त्याने जगाला दाखवुन दिलं की हॉवर्ड, स्टॅंडफोर्ड आणि ऑक्सफर्ड इत्यादी ठिकाणी न जाता देखील जगातला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक बनता येतं…
त्यांचं नाव धीरजलाल गोवर्धन दास अंबानी….

तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, धीरुभाई अंबानीनी त्यांच्या आयुष्यात अंमलात आणलेली आणि इतरांना सांगींतलेली यशाची पाच सुत्रे….

धडा पहीला – जे मोठी स्वप्नं पाहतात, ते संपुर्ण जगाला जिंकतात…..

धीरुभाई लहान असल्यापासुनच स्वप्ने पाहायचे, लहानपणीच सातवीत असताना त्यांनी पैसे कमवायचे ठरवले आणि शाळेबाहेर भज्यांची गाडी लावली, परदेशात जायचे स्वप्न बघीतले आणि येमेनला जाऊन नौकरी ही केली. दोन वर्षात अजुन एक स्वप्न पाहीलं, भारतात जाऊन स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं करीन..स्वप्न पाहत गेले, वाटचाल करत गेले…

त्यांनी मोठ्ठी स्वप्नं पाहीली, आपण बघतो का?….

प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वप्नांपासुनच होते…

धड दुसरा – कठीण समयीही लक्ष्य सोडु नका, मग संकटांचं रुपांतर संधीत करता येतं!…..

धीरुभाईंच्या आयुष्यात का प्रॉब्लेम्स आले नाहीत? खुप खुप संकटं आली, पण ते खऱ्या यौद्ध्याप्रमाणे लढत राहीले, त्यांनी कधीच हार मानली नाही. १९६५ ला पार्टनरशिप तुटली, पण ते निराश झाले नाहीत, उलट कष्ट करायचे वाढवले, १९६६ मध्ये आपला पहीला कारखाना बनवला पण रुपयाचं अवमुल्यन झालं, सारी गणित उलटी झाली, खर्च वाढला, पण ते डगमगले नाहीत, त्यांचा स्वतःच्या स्वप्नांवर पुर्ण विश्वास होता.

त्यांनी ‘विमल’ नावाने कापड आणले होते, पण इतर स्पर्धकांनी आधीच बाजारपेठ काबीज केली होती, त्यांची धंद्यावर पकड होती. त्यांनी ह्या नव्या खेळाडुचे सर्व रस्ते बंद केले. होलसेलर्सनीही दबावात येऊन विमल कापड ठेवायचे नाकारले. पण थांबतील ते धीरुभाई कसले? त्यांनी ही मक्तेदारी मोडुन काढली.

आरोग्याचीही आव्हाने आली, १९८६ मध्ये पक्षाघाताचा झटका आला,

एखादा माणुस किती खंबीर असु शकतो, बघा!,

सरकार कडुन, परीवाराकडुन अडचणी आल्या, कमी म्ह्णुन की काय, आजारपण आले, आणि त्यात भरमसाठ दंड आकारला गेला, आर्थिक अडचणी आल्या, पण ते पाठ दाखवुन पळाले नाहीत, ते लढत राहीले, शिकत राहीले..आणि जिंकले….

धडा तिसरा – व्यापाराची खरी माहीती जोखीम घेतल्यावरच होते….

नॉलेजचा सर्वात मोठा स्त्रोत रिस्क असते.
त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की ते जसजसे मोठे होते गेले, तसतशे मोठ्या जोखमी उचलत गेले.

पहील्यांदा ते फक्त मसाल्यांचा व्यापार करत होते, त्यांना समजलं, यापेक्षा जास्त फायदा तर तागाच्या व्यवसायात आहे,फार विचार करत न बसता त्यांनी, त्यात उडी मारली, बरेचशे लोक आपल्या सेट झालेल्या लायनीला बदलण्याची रिस्क कधीच घेत नाहीत. पण पुढेतर त्यांनी तागाची फॅक्ट्री उभारली.

पण मग १९९१ ते तेल रिफायनरीतही उतरले. ९५ ला कम्युनिकेशनच्या धंद्यात आले. ९८ ला रिलायंस गॅसचाही धंदा उघडला.

ते किनार्यावर बसुन लाटांचा आनंद घेणार्यातले नव्हते, आपली होडी घेऊन खवळलेल्या समुद्राच्या छाताडावर मुक्त संचार करणार्यातले होते धीरुभाई…

धडा चौथा – बडा सोचो, जल्दी सोचो, आगे सोचो, विचारों पर किसीका अधिकार नही होता…..

ते म्हणायचे, जर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त प्रगती करायची असेल तर इतरांपेक्षा मोठ्ठा विचार करा, त्यांच्या आधी करा आणि काळाची पावलं ओळखुन तुमची पावलं टाका…

अशा विचारसरणींमुळेच ते रिलायन्स ला १९७७ मध्येच पब्लिक लिमीटेड बनवु शकले. भारतात आयपीओ ऑफर करणारी पहीली कंपनी आहे रिलायन्स. इतिहासात जे आधी कोणीही केलं नव्हतं ते त्यांनी केलं, आणि एका झटक्यात त्यांना अठ्ठावन्न हजार गुंतवणुकदार मिळाले. हा एक रेकॉर्ड होता.

त्यांच्या अशाच विचारांमुळे की काय…. रिलायंस, नेहमीच, आजही आपल्या स्पर्धकांच्या एक पाऊल पुढेच असते. म्हणुनच की काय ती फॉर्चुन ५०० मध्ये येणारी भारतातली पहीली कंपनी होती. म्हणुनच की काय… मुकेश अंबानीनेही जिओ लॉच करताना खळबळ उडवली. तेव्हा १५५ क्रमांकावर असलेलं जिओ आज एक नंबरला आहे.

धडा पाचवा – तुमको जो आता है, वो करो, बाकी सब छोड दो!…

हा उपदेश बिझनेसच्या शहेनशहाने एक्टींगच्या शहानशहाला दिला होता.

अमिताभने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगीतलं की तो राजकारणात असताना त्याला दडपण आलं होतं, तो धीरुभाईंना भेटला तेव्हा त्यांनी अमिताभला सांगितलं, अमिताभ, तु मनोरंजन छान करतोस, तेच कर!..

धीरुभाईंना व्यवसाय चांगला जमायचा, त्यांनी आयुष्यभर तो निष्ठेने केला….

आणि आपल्यासारख्यांना काहीतरी भव्यदिव्य बनायची प्रेरणा देऊन ते अजरामर झाले.

लाखो भारतीयांना प्रेरणा देणाऱ्या धीरूभाई अंबानींना लाख लाख सलाम!!

तुमची सारी स्वप्ने पुर्ण होवो ह्याच शुभेच्छा!!

वाचण्यासारखे आणखी काही..

“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!
प्रेमप्रकरणं, प्रेमभंग आणि नैराश्य याचा सामना कसा करावा?
पुस्तकं, लायब्ररी आणि मेनु कार्ड


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय