आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय वाचा या लेखात

financial freedom

वरती दिलेल्या चित्रात एक पिगी बँक दिसते आहे, जी आरामात चिल करत पहुडलेली आहे.

तुम्हाला पण असं, सगळ्या चिंता सोडून आरामाचे क्षण अनुभवणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा, तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवलेलं असेल.

आपल्याला माहित आहे, कोरोनाच्या संकटात सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली. पण तरीही तुम्ही पाहत असाल, काही लोक मात्र त्या परिस्थतीतही आर्थिक दृष्ट्या सक्षम दिसले होतेच.

मित्रांनो, लक्षात घ्या… यामागे त्यांची श्रीमंती किंवा त्यांनी आधी कमावलेला पैसा नाही, तर त्यांचे आर्थिक नियोजन हे प्रमुख कारण आहे. म्हणून या लेखात सक्षम अशा आर्थिक नियोजनाचे सहा प्रभावी उपाय काय आहेत ते बघा.

ह्या आर्थिक नियोजनात सर्वात महत्वाचा घटक आहे, आपल्याकडे आपल्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत असणे. म्हणजे असं म्हणायची वेळ येणार नाही कि, ‘ये जो थोडेसे हैं पैसे, खर्च किसपर करू कैसे-कैसें’

आज आपण अशाच आर्थिक नियोजनाचे ६ प्रभावी उपाय बघणार आहोत.

१. उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबत लवकर सुरवात करणे

आपल्याला तहान लागल्यानंतर विहीर खोदायची फार सवय असते. आपला उत्पन्नाचा स्त्रोत जेव्हा धोक्यात येतो तेव्हा आपण घाईघाईत दुसरा उत्पनाचा स्त्रोत शोधायचा प्रयत्न करायला लागतो मात्र तेव्हा ह्या सगळ्याला उशीर झालेला असतो.

ह्यासाठी आपल्याला शक्य असेल तेवढ्या लवकर आपल्या उत्पन्नाचे जास्तीतजास्त स्त्रोत शोधून काढणे गरजेचे असते. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांच्या यादीत नेहमी पहिल्या पाचात असणारे वॉरेन बफेट ह्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी आपला सगळ्यात पहिला शेअर विकत घेतला आणि तेव्हा पासून ते सतत वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत.

तरीही ते आपल्या मुलाखतीत बऱ्याचदा आपण थोडे उशिराच गुंतवणूक करायला सुरवात केली अशी खंत व्यक्त करतात. त्यामुळे आपण सुद्धा जेवढ्या लवकरात लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि गुंतवणुकीला सुरुवात करणे गरजेचे आहे गरजेचे आहे.

इंटरनेटचा वापर करून पैसे कसे कमवावे?

२. वेगवेगळ्या क्षेत्रातून उत्पन्न मिळवणे

असे म्हणतात की एका ठिकाणावरून मिळणाऱ्या शंभर रुपयांपेक्षा, शंभर ठिकाणावरून मिळणारा एक एक रुपया नेहमी चांगला असतो.

आपल्या उत्पन्नाचा एकच स्त्रोत असेल मग भले तो कितीही मोठा असेल तरीही आपण फार मोठी चूक करत असतो. आपण पूर्णपणे त्यावर अवलंबून असतो आणि काही कारणाने तो जर का बंद झाला तर आपल्या हातात काहीच शिल्लक राहत नाही.

त्यामुळे जरी आपल्याकडे उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत असला तरी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सतत प्रयत्न करत राहणे महत्वाचे असते. आपला उत्पनाचा महत्वाचा स्त्रोत जेव्हा सुरु असतो अशावेळी आपल्याला जर बाकी कुठेही अपयश आले तरी आपल्याला त्याचा फार मोठा फरक पडत नाही आणि ह्यातूनच आपण आपले इतर स्त्रोत शोधून काढू शकतो.

ब्लॉगिंग हा घरबसल्या पैसे कमावण्याचा खास मार्ग, कसा ते बघा!

३. कुठल्याही कामात आणि प्रयत्नात सातत्य ठेवा

कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी सातत्य हे सर्वात महत्वाचे असते. हीच गोष्ट आर्थिक नियोजनात सुद्धा लागू होते. आपण जेव्हा उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत शोधत असतो तेव्हा आपल्याला त्या प्रयत्नात सातत्य राखणे गरजेचे असते.

बऱ्याच क्षेत्रात आपल्याला उत्पन्न मिळायला सुरवात व्हायला काही वेळ जावा लागतो. ह्यासाठी नारळाच्या झाडाचे उदाहरण आपण डोळ्यांसमोर ठेवायला हवे.

नारळाच्या झाडाला सुरवातीची साधारण ४ वर्ष पाणी, खत, त्याची योग्य निगा हे सगळे सतत करावे लागते पण सुरुवातीला त्यापासून आपल्याला काहीही उत्पन्न मिळत नाही. आणि त्यामुळे जर आपण तेवढ्यात कंटाळून ते सोडून दिले तर आपला वेळ आणि खर्च सगळेच फुकट जाते.

पण एकदा का पाच वर्षानंतर झाडाला नारळ लागायला सुरु झाले की आपल्याला उत्पनाचा एक स्त्रोत तयार होतो आणि हळूहळू आपला वेळ आणि मेहनत कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्या प्रयत्नात सातत्य असणे आणि आपल्या अंगी धैर्य असणे हे फार महत्वाचे असते.

४. कुठे थांबायचे हे ठरवा

मागच्या मुद्यामध्ये आपण जे बघितले आहे त्याच्या काहीसे विरुद्ध आपण ह्या मुद्यात बघणार आहोत असे आपल्याला वरवर वाटेल. आपण एखाद्या क्षेत्रात प्रयत्न सुरु केले आणि आपल्याला काही वेळात अपेक्षित यश आले नाही तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत, धीर सोडायचा नाही हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे की कधी थांबायचे.

अशावेळी सुरेश भटांच्या एका ओळीची आठवण येते “थांबणे ही अघोरी कला यार हो!“… आपण कोणत्याही संधीला किती वेळ द्यायचा आहे हे मनात ठरवणे फार महत्वाचे आहे.

वर्षानुवषे एकच गोष्ट जर आपण करत असू आणि त्यातून आपल्याला काहीच उत्पन्न मिळत नसेल तर तो आपल्या वेळेचा, पैशाचा अपव्यय म्हणावा लागेल.

नारळाच्या झाडाला नारळ लागावेत म्हणून पाच वर्षे मेहेनत करणे हे बरोबर आहे. पण पिंपळाचे झाड लाऊन त्याला नारळ लागतील म्हणून आयुष्यभर वाट बघणे हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.

त्यामुळे कोणत्याही क्षेत्राला किती वेळ द्यावा हे ठरवणे फार महत्वाचे असते. आपण अशा एखाद्या उत्पन्न न देणाऱ्या क्षेत्रात अडकून पडल्यामुळे कदाचित आपल्या हातून दुसऱ्या क्षेत्रातील एखादी सुवर्णसंधी निसटून जाऊ शकते.

५. अपयशाने खचून जाऊ नका

जेव्हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा सगळीकडेच आपल्याला यश मिळणे शक्य नसते. अनेकवेळा आपण पूर्ण प्रयत्न करून सुद्धा अपयशी होऊ शकतो.

अशावेळी ते अपयश फार काळ मनाला लाऊन न घेता त्यातून आपल्याला काय शिकायला मिळाले आहे ते घेऊन पुढे वाटचाल करणे फार महत्वाचे असते.

प्रत्येक अपयश आपल्याला काही ना काही शिकवून जात असते आणि अशा मिळणाऱ्या धड्यांतून आपण आपल्या यशाकडे वाटचाल करत असतो.

६. चांगल्या संधी ओळखा

आपण एकाचवेळी जर चार – पाच ठिकाणी काही ना काही करत असू तर आपल्याला लवकरात लवकर प्रत्येक क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पनाचा, यश मिळण्याच्या शक्यतेचा अंदाज घेतला पाहिजे.

कुठून आपल्याला जास्त उत्पन्न मिळण्याची संधी आहे ह्याचा आपल्याला एकदा अंदाज आला की आपल्या प्रयत्नांची दिशा त्या दृष्टीने ठरवता येते.

ज्या क्षेत्रात आपल्याला यश मिळण्याशी शक्यता सगळ्यात जास्त आहे असे आपल्याला वाटते त्या क्षेत्रात आपला सगळ्यात जास्त वेळ द्यावा आणि जिथे यश मिळण्याची शक्यता सगळ्यात कमी असेल अशा क्षेत्रात आपण थोडा कमी वेळ द्यायला हवा.

अशा विळी तुम्हाला हे शोधणं गरजेचं आहे, कि तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुम्हाला करियर करण्याची काही संधी शोधता येऊ शकेल का?

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्यासाठी कोणती पावले उचलावीत?

अशाप्रकारे आपण चांगल्या संधीला जास्तीजास्त वेळ आणि प्रयत्न ह्यांची जोड देऊन त्यातून यश मिळवू शकतो आणि तो आपल्या उत्पन्नाचा एक मुख्य स्त्रोत होऊ शकतो.

अशाप्रकारे हे सहा रामबाण उपाय वापरून आपण जास्तीतजास्त उत्पनाचे स्त्रोत निर्माण करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत आपले आर्थिक स्थैय अबाधित ठेऊ शकतो.

मनाचे श्लोक

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय