सध्या चर्चेत असलेला बायोलुमीनीसन्स हा निसर्गाचा चमत्कार म्हणजे काय?

सध्या सोशल मिडियावर समुद्राचे एकदम फ्लुरोसेंट निळ्या रंगाचे अतिशय सुंदर फोटो बघायला मिळत आहेत.

हे फोटो जुहू या मुंबईच्या किनारपट्टीचे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही किनारपट्ट्यांचे आहेत.

पाणी रात्रीच्या वेळी अचानक इतके निळे कसे दिसायला लागले?

पाण्यातल्या कोणत्या प्राण्यांमुळे असे होत आहे?

वर्षातून काहीच दवस हे का बघायला मिळते? असे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील.

मोघमपणे याची माहिती मिळवायचा तुम्ही प्रयत्न ही केला असेल..

त्यातून तुम्हाला समजले असेल की हा उजेड, निळा लाईट चक्क पाण्यातील काही सूक्ष्म जीवाणू तयार करत आहेत!

ज्याप्रमाणे काजवे अंधारात चमकतात अगदी तसेच समुद्रात रात्रीच्या वेळी हे सूक्ष्म जीव चमकतात.

याबद्दल अधिक माहिती, ते ही अगदी सोप्या भाषेत वाचायला सगळ्यांचाच आवडेल.

म्हणूनच आज हा लेख खास त्यासाठी.

हे प्राणी कोणते, या लाईटला काय म्हणतात, तो कसा तयार केला जातो आणि का तयार केला जातो याबद्दल माहिती वाचून आपल्या सामान्य ज्ञानात भर पडायला तुम्हाला आवडेलच.

आणि शिवाय ही माहिती सोप्या भाषेत असल्यामुळे तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही वाचून दाखवू शकता ज्यामुळे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अपोआप मिळतील.

प्राण्यांच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या उजेडामुळे पाण्याचा रंग असा फ्लुरोसेंट निळा दिसतो.

खरेतर हे प्राणी आपल्या मुंबईच्या आणि कोकण किनारपट्टीवर हल्लीच, म्हणजे मागच्या चार पाच वर्षातच दिसायला लागले आहेत.

साधारण थंडीच्या सुरुवातीला हे समुद्रात खोलवर राहणारे प्राणी किनाऱ्याजवळ येऊ लागतात, तसे ते यंदा ही आले आहेत.

मागच्या आठवड्यात जुहू बीचला त्यांचे दर्शन झाले, त्यानंतर रत्नागिरी, देवगड, वेळस या किनाऱ्यांवर अजून सुद्धा रात्री ते दिसत आहेत.

या भागात राहणाऱ्या लोकांना निसर्गाचा हा अत्भुत चमत्कार आणि अमाप सौंदर्य अनुभवायला मिळत आहे.

समुद्रातून लाट येऊन ती जेव्हा किनाऱ्याला धडकते तेव्हा हा प्रखर निळा उजेड दिसतो.

म्हणूनच याला ‘ब्लू टाईड’ या नावाने सुद्धा संबोधले जाते.

रात्रीच्या काळोखात, चांदण्यांच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य अतिशय लोभस दिसते.

हा निळा प्रकाश कसा दिसतो हेच आता आपण बघूया..

खोल समुद्रात राहणारे काही सूक्ष्मजीव हा उजेड निर्माण करतात.

सूक्ष्म जीवांमध्ये घडणाऱ्या काही केमिकल रीएक्शनमुळे हे घडते.

सगळ्या सूक्ष्म जीवांना काही हा प्रकाश तयार करता येत नाही.

पण काही सूक्ष्मजीव जसे की, पाण्यातील वनस्पती ज्यांना फायटोप्लांकटन म्हणतात, काही प्रकारचे बॅक्टेरीया, फंगस, जेली फिश, शार्क हा उजेड निर्माण करू शकतात.

हा उजेड निर्माण करणाऱ्या वनस्पतीला बायोलुमीनीसंट म्हणतात आणि या उजेड तयार करणाऱ्या निसर्गघटनेला बायोलुमीनीसन्स म्हणजे ‘जीवदीप्ती’ असे म्हणतात.

हे जीव जेव्हा लाटेवर तरंगतात तेव्हा लाटेच्या हेलकाव्यामुळे त्यांच्यातून या निळ्या लाईटची निर्मिती होते.

हा उजेड हे सूक्ष्म जीव स्वतः तयार करतात, विशेषतः खोल, समुद्रात राहणारे प्राणी बायोलुमीनीसंट असतात.

हे प्राणी हा उजेड निर्माण करू शकतात हे तर ठीक आहे.

पण प्रत्येक प्राण्याचे काही खास वैशिष्ट असते.

जसे की मोर हा लांडोरीला आकर्षित करण्यासाठी आपला पिसारा फुलवतो, किंवा बेडूक पावसाळ्यात एक विशिष्ट आवाज काढतात, सरडा रंग बदलतो..

आणि अशी अनेक उदाहरणे आहेत.

या सगळ्या गोष्टींनी माणूस हरखून जातो कारण यातल्या काही गोष्टी सौंदर्यपूर्ण असतात, तर काही गोष्टी कुतूहल निर्माण करणाऱ्या.

या ब्लू टाईडबद्दल देखील असेच कुतूहल तुम्हाला वाटत असेल ना?

मित्रांनो, माणसासकट या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाची जगण्यासाठी धडपड सुरु असते.

त्यासाठी दोन गोष्टींचा प्रयत्न करत राहणे यालाच खरेतर जीवन म्हणतात.

या दोन गोष्टी म्हणजे आपला वंश पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आणि आपल्या शत्रूंपासून स्वतःचा बचाव करत आयुष्य वाढवणे.

या फायटोप्लांकटन जो प्रकाश निर्माण करतात. त्यामागे सुद्धा हीच दोन कारणे आहेत.

१. प्रकाशामुळे शत्रूला घाबरवणे

समुद्रात खोल तळाशी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात.

ते अर्थातच समुद्रातील इतर वनस्पती आणि माशांची शिकार करून राहतात.

मोठ्या माशांपासून वाचायला हे फायटोप्लांकटन या प्रकाशाची निर्मिती करतात जेणेकरून मोठे शिकारी मासे (प्रीडेटर) या फायटोप्लांटनच्या जवळ यायला, खायला घाबरतील.

२. काॅलनी तयार करणे

एका सारखे दिसणारे सूक्ष्म जीव एकत्र येऊन स्वतःची काॅलनी तयार करतात.

कारण त्यामुळे त्यांना एकमेकांचे संरक्षण करणे बरे पडते, इतर प्राण्यापासून स्वतःचा बचाव करणे बरे पडते.

या लाईटचा वापर एकसारख्या जीवाणूंना आकर्षित करण्यासाठी केला जातो.

काॅलनी करण्यासाठीचे अजून एक कारण म्हणजे अन्न शोधण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी एकत्रितपणे हल्ला करता येतो.

आता हे बायोलुमीनीसंट जीव जर नेहमी समुद्रात राहत असतील, तर काही ठराविक वेळेलाच का किनाऱ्यावर दिसतात? हा प्रश्न पडला असेलच ना?

खरेतर किनाऱ्यावर हे बायोलुमीनीसंट जीव सहसा दिसत नाहीत पण काही छोट्या किनाऱ्यावर ते उन्हाळा ते थंडीची सुरुवात या दिवसात येऊ शकतात.

समुद्राच्या अगदी आत राहणाऱ्या या जीवांना समुद्रातील काही हालचाली, मोठ्या लाटा कधी कधी किनाऱ्यावर घेऊन येतात.

त्यांचा उजेड तेव्हाच पडतो जेव्हा त्यांना लाटेचा धक्का लागतो.

आजूबाजूला अंधार असेल तर आपल्याला हा उजेड दिसतो.

त्यामुळे हे दृश बघायला जाताना शक्यतो मोबाईल, टाॅर्च याचा वापर करू नये.

एकदा हे जीव किनाऱ्यावर आले की ते साधारण दोन, तीन दिवस दिसत राहतात, पण याबद्दल काहीच खात्री देता येत नाही.

काही ठिकाणी ते अगदी एखाद्या दिवसासाठी दिसतात तर काही ठिकाणी आठवड्याभरासाठी सुद्धा!

मित्रानो, हे वाचून तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल की या एवढ्या सुंदर दृशाब्द्द्ल इतके वर्षे तुम्ही ऐकले कसे नाही.. हो न?

खरेतर ‘बायोलुमिनीसंस’ बघण्यासाठी जगभरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘पोर्तो रिको’ या देशातील मोसकिटो बे ज्याला ‘बायोलुमीनीसंट बे’ सुद्धा म्हणतात.

इथला बायोलुमीनीसंस जगात सगळ्यात जास्त प्रखर असतो.

मालदीव बेटांवर सुद्धा बायोलुमीनीसंस बघायला मिळतो..

पण हल्लीच, म्हणजे २०१६ पासून ते आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दिसायला लागले आहेत, ते सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात.

मागच्या बुधवारी हे जुहूच्या किनाऱ्यावर दिसले आणि सध्या ते रत्नागिरी देवगड, वेळस असा प्रवास करून कर्नाटकातील उडपी या किनाऱ्यावर पोहोचले आहेत.

बंगाराम आयलंड (लक्षदीप), बेतालबातीम बीच (गोवा), जुहू बीच (मुंबई), म्हाडेई सँचुरी (गोवा) या भारतातील काही ठिकाणी हे दृश अनुभवायला मिळते.

हे दिसायला लोभसवाणे दिसते तर खरे पण हे धोकादायक असू शकते का, आपल्याला, माणसांना यामुळे धोका असू शकतो का?

खरेतर समुद्राच्या आत राहणारे हे जीव जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा त्यामागे समुद्रातील हालचाली, मोठ्या लाटा ही कारणे तर असतातच पण त्याचबरोबर हवामानातील बदल हे सुद्धा मोठे कारण आहे.

हे जीव अशाच पाण्यात आढळतात जिथे ऑक्सिजनची पातळी कमी असते आणि नायट्रोजनची जास्त.

त्यामुळे हे जीव जर किनाऱ्यावर आढळत असतील तर ती समुद्राचे पाणी खराब होत चालल्याची खूण आहे, असे गुरुदास नलकर, (सीमबायोसीस इंटरनॅशनल युनिव्हरसिटी) या प्रोफेसरांचे म्हणणे आहे.

खूप पाऊस, समुद्रात सोडलेले सांडपाणी यामुळे हे बायोलुमीनीसन्स दिसण्याची शक्यता वाढते असे शास्त्रद्यांचे म्हणणे आहे.

सध्या सगळीकडे चर्चेत असणाऱ्या या विषयाबद्दल मिळाली न महत्वाची माहिती? ती सुद्धा सोप्या भाषेत? मग लवकर शेयर करून ही माहिती सगळ्यांना पोहोचवा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय