लहान मुलांच्या आरोग्यासाठी आले कसे फायदेशीर आहे ते वाचा या लेखात

आपण आजारी पडलो तर काय घरगुती उपाय करायचे हे सहसा आपल्याला माहीत असते.

त्यानुसार आपण तसे करतो सुद्धा.

दोन दिवस वाट बघून, बरे वाटले नाही तर डॉक्टरांकडे जातो किंवा कधी डॉक्टरांच्या औषधा बरोबरच हे घरगुती उपाय चालू ठेवतो कारण याचे आपल्या आरोग्यावर काहीच अपाय होत नसतात,

पण तरीही मुलांना कोणते घरगुती उपाय करावेत या संभ्रमात अनेक पालक असतात.

तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. आपले घरगुती उपाय लहान मुलांना चालतील का?

त्याचा त्यांना इतर काही त्रास तर होणार नाही ना असे बरेच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असतील.

त्यांच्या आरोग्यासाठी काय चांगले काय वाईट हे समजत नाही.

पण मुलांच्या किरकोळ आजारांवर आपल्या स्वयंपाकघरातच सापडतील असे अनेक, रामबाण घरगुती उपाय आहेत.

वर्षानुवर्षे या उपायांचा वापर सुद्धा केला जातो.

लहान मुलांच्या बाबतीत जास्त काळजी घ्यावी लागते, कारण हे उपाय त्यांना सूट होतील का नाही याची भीती पालकांना वाटत असते.

पण खरेतर या उपायांचा काहीच विपरीत परिणाम होत नाही त्यामुळे हे मुलांसाठी फायदेशीरच असतात,

आले हा अशाच उपायांपैकी एक आहे.

आपल्या स्वयंपाकात वापरला जाणारा अतिशय महत्वाचा पदार्थ.

आल्याचे मुलांच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत, कोणत्या आजारांसाठी आले हा एक चांगला उपाय ठरू शकतो आणि का?

तसेच त्याचा वापर कसा करायचा ही सगळी माहिती या लेखात दिली आहे.

१. पोटांच्या तक्रारींवर उपयुक्त

आल्यामुळे पोटाच्या तक्रारी, अपचन यासारखे त्रास कमी होतात.

आल्यामुळे मुलांच्या तोंडातील लाळ तयार व्हायचे प्रमाण वाढते.

यामुळे मुलांची भूक वाढण्यासाठी मदत होते.

मुले जर व्यवस्थित खात नसतील तर त्यांची भूक वाढावी, त्यांनी योग्य प्रमाणात खावे यासाठी आल्याचा वापर केला जातो.

लहान मुलांना जर कॉन्स्टीपेशन, गॅस यासारखे त्रास असतील तर ते सुद्धा आल्यामुळे दूर होतात.

आल्याचा अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे उलट्या आणि मळमळ यावर ते अत्यंत प्रभावी औषध आहे.

लहान मुलांना जर गाडी लागण्याचा त्रास होत असेल, प्रवासात उलट्या होत असतील तर त्यांना तोंडात चघळायला एक छोटा आल्याचा तुकडा किंवा आलेपाक, म्हणजे आल्याची साखर घालून केलेली वडी दिली तर फायदा होतो.

२. यकृतासाठी फायदेशीर

आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढणे हे यकृताचे काम असते.

आले हे यकृताच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

आल्यामध्ये antiinflammatory आणि antioxidant गुणधर्म असतात जे यकृताचे रक्षण करण्यात गुणकारी असतात.

३. Anti bacterial गुणधर्म

आल्याचे हे Anti bacterial गुणधर्म प्रचलित आहेत.

पोट बिघडवण्यासाठी कारणीभूत असणारे अनेक जीवाणू आल्याच्या रसाने नष्ट होतात.

यामुळेच पोटाच्या विविध तक्रारींवर आले हा एक हमखास उपाय आहे.

घशाच्या इन्फेक्शनसाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्यासाठी आल्याचा फायदा होतो.

म्हणूनच खोकला, सर्दी यासारख्या विकारांमध्ये आल्याच्या किंवा सुंठीच्या औषधाने लहान मुलांमध्ये लगेच फरक दिसून येतो.

४. ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक

आल्यामुळे रक्त पातळ व्हायला मदत होते.

याचाच दुसरा अर्थ असा, की आल्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुधारतो.

यामुळे शरीरातील सगळ्या पेशींना व्यवथित प्रमाणात रक्त मिळते ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.

शरीराचा रक्तपुरवठा सुधारल्यावर साहजिकच ह्रदयाला सुद्धा रक्त योग्य प्रमाणात पुरवले जाते.

म्हणूनच आले हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे.

५. श्वसनाच्या विकारांवर गुणकारी

लहान मुलांना श्वसनाचे विकार सतत होत असतात.

लहान मुलांमध्ये अशा आजारांवर घरगुती उपायच बहुतेक वेळा गुणकारी ठरतात.

आले हे सुद्धा अशाच लहान मुलांना चालणाऱ्या घरगुती उपायांपैकी एक आहे.

मुलांना जर कफ साठून राहायचा त्रास असेल तर आल्याचा फायदा होतो.

आल्यामुळे साठून राहिलेला कफ बाहेर पडण्यासाठी मदत होते.

आल्यामुळे सर्दी सुद्धा मोकळी व्हायला मदत होते. म्हणजेच मुलांना जर सर्दी, खोकला किंवा फ्लू सारखी लक्षणे दिसत असतील तर त्यावर आले हा एक रामबाण उपाय आहे.

आल्याचे मुलांच्या आरोग्यासाठी इतके फायदे आहेत हे जरी खरे असले तरी आले खायला तिखट असल्यामुळे मुलांना ते खायला देणे अवघड होऊन बसते.

आले हे अनेक विकारांवर गुणकारी असून सुद्धा बऱ्याचदा मुले आले खायला नाही म्हणतात.

पण मुलांना आले थेट खायला न देता त्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.

यासाठीच काही सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. आलेपाक – आल्याची ही वडी खायला जरी काही प्रमाणात तिखटच लागली तरी आले खाण्यापेक्षा मुलांना ती नक्कीच आवडेल.

घसा दुखत असेल, खोकला येत असेल तर ती आल्याची वडी लहान मुलांना तोंडात धरायला दिली तर लगेच फरक दिसून येतो.

प्रवासात सुद्धा मुलांची मळमळ कमी व्हावी, उलटीचा त्रास होऊ नये यासाठी गुणकारी असते.

२. आले-लिंबू-साखर – आल्याचे हे आंबट गोड औषध मुले आवडीने खातात.

पोटदुखी, पोट बिघडून जुलाब किवा उलट्या होत असल्याच हे अत्यंत गुणकारी औषध आहे.

लहान मुलांना पित्ताचा त्रास होत असेल तरीही या औषधाचा फायदा होतो.

आले किसून त्यात तेवढीच साखर घालायची आणि वरून लिंबू पिळून मुलांना थोडे थोडे खायला दिले तर पोटाच्या त्रासापासून आराम मिळतो.

३. आवळा-आले – आवळा आणि आले हे दोन्ही तब्येतीसाठी अत्यंत चांगले असतात.

मळमळ होणे, गाडी लागणे यासाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर आहेत.

आवळा आणि आले यांचे एकत्रित अनेक पदार्थ करता येतात.

आंबट, तिखट आणि खारट चव एकत्र आल्याने मुलांना ते खायला चांगले वाटते.

आवळा सुपारीमध्ये आले किसून घातले तर उलट्या थांबायला मदत होते.

आवळ्याच्या वाटून केलेल्या पेस्टमध्ये आल्याची पेस्ट घातली तरी ते आंबट गोड मिश्रण मुले आवडीने खातात.

यामुळे तोंडातील लाळेच्या ग्रंथी सक्रीय होऊन जास्त लाळ तयार होते ज्यामुळे मुलांना जास्त भूक लागते.

४. लिंबू सरबत-आले – लिंबू सरबतात किंचित आले किसून घालून ते सरबत मुलांना प्यायला दिले तर पोटाच्या तक्रारी सहज दूर होतात.

सर्दीसाठी सुद्धा हा एक चांगला उपाय आहे,

कारण लिंबामधून ‘सी’ व्हिटामिन जास्त प्रमाणात मिळते. सर्दी असेल तर हे सरबत थोडे कोमट पाण्यातून द्यावे.

५. सुंठ – सुंठ पावडर करून त्यात पिठी साखर मिसळून मुलांना खायला दिली तर ते त्यांच्या सर्दी-खोकल्यावर प्रभावी औषध असते.

६. सूप – मुलांना खोकला झाला असेल, घसा बसला असेल तर त्यांना थोड्या थोड्या वेळाने गरम सूप प्यायला द्यायचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात.

अशा सूपमध्ये जर थोडे थोडे आले ठेचून घातले तर आल्याचा अर्क सूपमध्ये उतरतो आणि तो सूपच्या इतर घटकांमध्ये मिक्स होऊन त्याची उग्र चव लागत नाही.

७. आल्याचा काढा – हा काढा खरेतर तिखट असतो, तरीही सर्दी खोकला, घसादुखी अशा विकारांवर तो अतिशय उपयुक्त आहे.

आल्याचे बारीक तुकडे करू, त्यात थोडे मिरे घालून एकत्र वाटून घ्यायचे.

एक कप पाण्यात हे घालून चांगले उकळून घ्यायचे म्हणजे आल्याचा अर्क त्यात उतरेल.

नंतर ५ मिनिटांसाठी पातेले तसेच झाकून ठेवावे.

या काढ्यात गोडसरपणासाठी मध किंवा साखर घालून मुलांना प्यायला दिला तर सर्दी-खोकला पटकन बरा व्हायला मदत होते.

आले लहान मुलांसाठी फायदेशीर आहे. हे तर खरे आहे, पण त्याचा काही दुष्परिणाम होऊ शकतो का?

मुले म्हटले की हा प्रश्न प्रत्येक पालकांना येणारच आणि तो अगदी रास्त आहे.

आल्याचा औषधाप्रमाणे अगदी थोड्या प्रमाणात वापर केला तर खरेतर काही दुष्परिणाम होत नाही.

पण जर आले जास्त प्रमाणात मुलांना दिले गेले तर काही त्रास मात्र होऊ शकतात.

जसे की पोटात जळजळ होणे, आल्याच्या तिखटपणामुळे तोंडाची आग होणे.

त्यामुळे आले गुणकारी असते म्हणून त्याचा प्रमाणाबाहेर वापर सुद्धा योग्य नाही.

ते एक औषध म्हणून, औषधाइतकेच वापरायला हवे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय