वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???

वांग्याचा हा पोस्टमोर्टेर्म बघून हिरव्या मिरच्यांनी धसका घेतला आणि त्यांनी गरम तव्यावर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हा सगळा प्रकार बघून पांढरा शुभ्र लसणाचा कांदा इकडे तिकडे बरळत होता. मी त्याला चांगला एका हाथाने धरून दुसऱ्या हाताच्या मुठीने एकाच दणक्यात मोडून काढणार तोच निसटला….

रोज रोज त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला. म्हणून, मी आज भरीत करायचं ठरविलं. इथे हि अमेरिकेत भरताचे वांगे मिळतात बघून आनंद झाला. सगळं सामान आणला कांद्याची पात पण मिळाली. खूप उत्साहात कामाला लागले. वांगे घेतले अन् गॅस च्या दिशेने वळले. गॅस कडे बघून अरे देवा!!! माझ्या लक्षातच आलं नाह…. अशी काही मी “हे मॅा माताजी” नेहमीप्रमाणे ओव्हर ऍक्टिंग केली…. आता कसं करू मी भरीत?? ह्या विचारतच डोक्यला हाथ मारला. मूड ऑफ झाला.

या सगळ्या विचाराने प्रचंड भूक लागलीये ह्याची जाणीव मुद्दाम होत होती. इथले गॅस “इलेक्ट्रॉनिक कॉईल” चे…. वांगे भाजणार कसे?? नुकतेच आले होते अमेरीकेला त्यामुळे जास्त सामानही नव्हतं कि बारीक चाळणी ठेवून भाजू. पण भरीत खायची इच्छा तर भयंकर होती. ह्या दुःखातून स्वतःला सावरत ट्राय करून बघू म्हंटल… डायरेक्ट ठेवून बघितले कॉईल वरच …दिल त्यांची, आहुती…कच्चे-पक्के भाजतायेत… एवढ्यानेच ख़ुशी होत होती…. येस्स!!! आज भरीत खायला मिळणार म्हणजे!!! त्या आनंदातच होते कि, अचानक खूप मोठ- मोठ्याने आवाज झाला….. सारखंच वाजत होतं… टु…टु…टु………..टु…टु…

भयाण शांततेत असा आवाज आला, काय होतंय???? क्षणभर कळलंच नाही. इकडे तिकडे पळापळ केली आवाज येतोय कुठून??? अचानक येणाऱ्या आवाजने माझी जाम घाबरगुंडी झाली होती. वांगे भाजले जात होते. जिवाच्या आकांताने आक्रोश करत होते. पूर्ण घर भर थैमान घातला होता त्यांनी (वांग्यांनी), आणि हे अमेरिकन वांगे मला घाबरवत होते त्यांच्या त्या स्मोक डिटेक्टरच्या मदतीने… आणि ते यशस्वी पण झाले, मी खरंच घाबरले…. हा असा पहिलाच प्रसंग, मी घरात एकटीच होते. हे जर असंच वाजत राहिलं तर दारा पुढे अग्निशामक केव्हा येऊन उभा राहिल सांगता येत नाह… काय करू?? काय करू?? इकडे हे वांगे कोकलत होते अन् हा स्मोक डिटेक्टर त्याचा रेड टॉर्च माझयावर चमकवून मी खूप मोठा गुन्हा केल्यासारखं भासवत होता. पटकन फोन घेतला. ह्यांना फोन लावला. माझा घाबरलेला आवाज ऐकून हे खूपच घाबरले त्याना वाटलं काय झालं?? मग सगळं वांग्याचं रडगाणं सांगितलं. त्यांनी पटकन स्मोक डिटेक्टर समोर चक्क नाचायला सांगितलं?? आता ह्याच्या समोर नाचायचं काय मी?? पाय आपटत हातात येईल ते फडकं घेऊन स्मोक डिटेक्टर समोर येऊन उभे राहिले. अरे हळू बोंबल बाबा नाही करणार पुन्हा असं म्हणत विनंती ही केली तरी त्याच टु…टु…टु………..टु…टु…चालूच.

एवढ्याने तो ऐकत नाही. म्हणून हे घेतला हातातला नॅपकिन अन् त्याच तोंड दाबायचा येथेच प्रयत्न केला. पण ऐकेल तर शप्पत मग काय नाचवच लागलं. मग तो हि “”अभि तो पार्टी शुरु हुई है! “” करत दणक्यातच बोंबलायला लागला.

तेवढ्यात हे ऑफिस मधून आले. मी म्हंटलं बघा ना एवढेच बाकी होत भाजायचा आणि हा कोकलतोय. हे राहू दे म्हंटले नको करू हा थाट. म्हंटल आज तर भरीत खायचंच!! आता तुम्ही नाचा थोडा वेळ. मी ह्यांना चांगला थाऱ्यावर आणते…. कशी माझी तक्रार करत गाव भर धिंडोरा पिटत आहे बघतेच… वांगे बघून ह्यांना हि भरीत खायची इच्छा झाली. पण नाचावं लागेल हि खूप मोठी किंमत द्यायची म्हणजे…” नाच ना आये अंगण टेढा”. कधी नाही ते स्वताच्यला लग्नानंतर आज नाचले. खूपच थकले न भुकेने तेही व्याकुळ झाले. ५ मिनिटे झाली नाचून पण ह्याची पार्टी काय आज संपत नाही असं एकूणच जाणवलं. मग ह्यांनी एक मुस्काटात हाणली त्याच्या तेव्हा कुठे तो शांत झाला कायमचा. हुश्श!!! नाचून नाचून दमायला झालं आणि हे बेड च्या दिशेने जात म्हणाले इकडे ह्याच थांबलं आणि पोटातल्या कावळ्याचं सुरु झालं…. मी म्हंटलं हो ना. आहो आवरतेच आता पटकन असं म्हणत मी किचन च्या दिशेने निघाले.

आता माझ्यापासून तुम्हाला कोण वाचविणारा असं खोचक नजरेने मी त्या गॅस वरच्या वांग्यांना खुन्नस दिली. आता त्यांना माहित झालं होत. आता आज काही हि बया आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली. मग गॅस वरच्या वाग्यांना एका डिश मध्ये झोपवून पोस्टमोर्टेर्म साठी रेडी केलं. पहिले वांग्यांची भाजलेली खरपूस पाठ सोलून काढली आणि मग थोडं पोस्टमोर्टेर्म पण केलं. त्यात त्याचा शेपूट म्हणजे त्याचा अभिमान सहजच गाळून पडला. वांग्याचा हा पोस्टमोर्टेर्म बघून हिरव्या मिरच्यांनी धसका घेतला आणि त्यांनी गरम तव्यावर स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. हा सगळा प्रकार बघून पांढरा शुभ्र लसणाचा कांदा इकडे तिकडे बरळत होता. मी त्याला चांगला एका हाथाने धरून दुसऱ्या हाताच्या मुठीने एकाच दणक्यात मोडून काढणार तोच निसटला….. अरे जातोस कुठे करत त्याच्या डोक्यला जमिनीवर ठेचून ठेचून तीक्ष्ण नखांनी सोलून काढले. आणि मग तव्यावर आहुती दिलेल्या मिरच्या आणि लसूण माझ्या मिक्सि मधून चांगलेच पिसून काढले. आणि मग त्याच्या देहातून बनलेल्या ठेच्याला पोस्टमोर्टेर्म केलेल्या वांग्यात घालून चांगलं बड बड बदडलं. एवढ्याने माझं मन भरलं नाही म्हणून मी त्यांना उकळत्या तेलात सोडायचं ठरविलं. सोबत चार पाच डबे पालथे घालून शेंगदाणे शोधले अन् त्यांनाही उकळत्या तेलात ढकलून खरपूस भाजले.

त्यांना तडफडत बघताना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. एकूणच आज भरीत खायला मिळेल ह्या आनंदात मी हिरव्या गार कांद्याच्या पातीला हातात घेतले आणि तिच्या नाजूक मानेला अलगद मुरगाळून टाकली. आणि तिचा हि बळी घेतला. मग पाण्यात दडून राहिलेल्या कोथम्बिरीला बाहेर काढत तिला मस्त खरपूस तयार झालेल्या भरितावर पसरविली. आता मात्र भूकेवर कंट्रोल करण अवघड झालं होतं . कधी पोटात पडेल असं झालं पटकन ताट घेतलं आणि जेवायला बसलो पहिला घास जिभेवर ठेवला. दोघांना अगदीच गहिवरून आलं होत. दोघांचे डोळे आपसूक बंद झाले आणि मनात माझ्या मातीची, माझ्या गावाची आठवण झाली.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय