जीसॅट ६-ए आकाशात झेपावताना…

जीसॅट ६-ए हा उपग्रह आज म्हणजे २९ मार्च २०१८ च्या दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांनी अवकाशात उड्डाण भरेल. आज दुपारी १:५६ मिनिटांनी ह्याच्या उलट्या मोजणीला सुरवात होईल. इस्रो च्या मिशन रेडीनेस रिव्यू कमिटी ने आधीच उड्डाणाला हिरवा कंदील दिला आहे. सुमारे २५० कोटी रुपये किमतीचा हा उपग्रह जी.एस.एल.व्ही रॉकेट अवघ्या १७ मिनिटे ४७ सेकंदात त्याच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. भारताच्या दूरसंचार दळणवळणाच्या दृष्ट्रीने हा उपग्रह खूप महत्वाचा आहे.

हि मोहीम इस्रो च्या दृष्टीने खूप महत्वाची आहे ती ह्यासाठी कि ह्याच्या पाठोपाठ येणार चंद्रयान-२ मिशन. भारताच किंबहुना जगाच लक्ष लागून राहिलेल्या ह्या मोहिमेत इस्रो कुठल्याही टप्प्यावर असफलता येऊ नये यासाठी दक्ष आहे. चंद्रयान-२ मोहिमेत जी.एस.एल.व्ही. रॉकेट चा वापर होणार आहे. ह्या मोहिमेत लँडर आणि रोवर चा पे लोड जास्त असल्याने रॉकेट च्या क्षमतांचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे. ह्यासाठी इस्रो रॉकेट च्या क्षमतेवर अधिक लक्ष देऊन आहे. ह्याची रंगीत तालीम म्हणून ह्या उड्डाणात इस्रो पुढल्या पिढीतील नवीन विकास इंजिनाचा वापर करत आहे.

विकास इंजिन हे नाव ( VIKAS :- VIKram Ambalal Sarabhai ) ह्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बनलं असून हे लिक्विड फ्युएल रॉकेट इंजिन आहे. हे इंजिन पी.एस.एल.व्ही आणि जी.एस.एल.व्ही. च्या दुसऱ्या तर जी.एस.एल.व्ही मार्क-३ च्या प्रथम टप्प्यात वापरण्यात येतं. हे इंजिन एल.पी.एस.सी. म्हणजेच ( Liquid Propulsion Systems Center) ह्या इस्रोच्या एका युनिट ने बनवलं असून त्याची निर्मिती गोदरेज एंड बोयसे कंपनी इस्रोच्या सहकार्याने करत आहे. ह्यात यु.डी.एम.एच. (Unsymmetrical dimethylhydrazine) ह्याच्या सोबत नायट्रोजन टेट्राऑक्साईड चा वापर इंधन म्हणून करण्यात येतो. ह्यात नायट्रोजन टेट्राऑक्साईड हे ऑक्सिडायझर म्हणून काम करते. ह्या इंजिनाच पुढल वर्जन इस्रो ह्या उड्डाणात वापरत आहे ह्यामुळे इंजिनाच्या क्षमतेत ६% वाढ झाली असून त्यामुळे ७० किलोग्राम अजून जास्त पे लोड इंजिन नेऊ शकणार आहे. चंद्रयान-२ मध्ये अशी ५ इंजिन वापरण्यात येणार असून त्यामुळे २५० किलोग्राम अधिक वजन वाहून नेण्याची रॉकेट ची क्षमता वाढणार आहे.

ह्यापुढे जाऊन इस्रो अजून एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. क्रायोजनिक स्टेज मध्ये वैज्ञानिक वापरापेक्षा थोडं जास्त इंधन टाकीत घेतात. आपल्या गाडीचा रिझर्व मोड असतो तसा. पण सगळं योग्य रीतीने घडलं तर हे घेतलेल जास्तीच इंधन तसच वाया जातं. ह्यावर उपाय म्हणून इस्रो ह्या वेळेला पूर्ण टाकी संपवून इंधन वापरण्याच्या तयारीत आहे. पूर्णतः लिक्विड ऑक्सिजनचं प्रज्वलन इस्रो ह्या वेळेस करणार आहे. त्यामुळे रॉकेट ६०-७० किलोग्राम इंधन अजून वापरणार आहे जे आधी वाया जात होत. त्यामुळे रॉकेट च इंजिन आणखी ४-५ सेकंद जास्त प्रज्वलित राहणार आहे. ह्यामुळे इंजिनातून उपग्रहाला जास्त उंची तसेच वेग मिळणार आहे. ह्या गोष्टीमुळे पैसा तर वाचणार आहेच पण आपल्या क्षमतांचा आपण पुरेपूर वापर करू शकणार आहोत.

ह्या उड्डाणामुळे जी.एस.एल.व्ही. च्या नॉटी बॉय ह्या नावावर लंबी रेस का घोडा असं शिक्कामोर्तब व्हायला मदत होणार आहे. इस्रो च्या पी.एस.एल.व्ही. ला मिळालेल यश हे ह्या रॉकेट च्या अपयशाने थोडं झाकोळलं गेलं होतं. पण आता याच्या गेल्या काही यशस्वी उड्डाणानंतर ते मळभ दूर होणार आहे. ह्यामुळे इस्रो चा आंतरराष्ट्रीय उपग्रह प्रक्षेपणातील हिस्सा वाढण्यास खूप मदत होणार आहे. कारण आजच्या घडीला इस्रो चे रॉकेट उपग्रह प्रक्षेपणासाठी जगात सर्वात स्वस्त रॉकेट आहेत. जीसॅट-६/ए हा उपग्रह हाय पॉवर एस बँड असून त्यावर आय-२ के सॅटेलाईट बस आहेत. ह्याचा उपयोग उपग्रहावरील मोबाईल कम्युनिकेशन साठी होणार आहे. ह्याचं आयुष्य १० वर्षांचं असणार आहे.

चंद्रयान-२ मोहिमेची रंगीत तालीम समजलं जाणार हे उड्डाण यशस्वी होईलच. पण त्याच सोबत आपल्या अनेक गरजा भागवण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या इस्रो च्या संशोधक आणि वैज्ञानिकांसाठी एक आनंदाचा क्षण असणार आहे. तर एक भारतीय म्हणून आपणही त्यांच्या सोबत अवकाशात झेपावण्याचा आनंद घेऊ या. बघायला विसरू नका आकाशात झेपावताना आज दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांनी.

वाचण्यासारखे आणखी काही…..

इस्रो आणि नववर्ष २०१८
१२ जानेवारी २०१८ ला I.S.R.O लॉन्च करणार १०० वा सॅटेलाईट
Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय