शेतकरी

एका शेतकऱ्याला शेती करत असताना अनेक अडचणी येतात. तरीही न हरता तो जोमाने शेती करत असतो. त्याच्या काळ्या आईला तो जीवापाड जपतो. पैसे नसले तर कर्ज काढतो अन पीक घेतो. पण दरवेळी त्याला निसर्गाची साथ लाभत नाही. कर्ज फेडण्यासाठी तो जीवाच रान करतो, घाम गाळतो. पण कर्जाच व्याज इतकं वाढतं की घर चालवून शेतीला खर्च करून तो ते कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरतो. शेवटी तोही परिस्थितीसमोर हार मानतो अन् हे जग सोडून जातो….!

आयुष्यात जात-पात-धर्म न मानता
फक्त माणुसकीच्या वाटेने चालत आलो।
प्रामाणिक राहून स्वतःच्या हिमतीने पुढे
जाण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत राहिलो।।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?

नेटाने शेती करत यशस्वी होण्यासाठी
सगळी स्वप्ने बाजूला सारत राहिलो।
दुष्काळातसुद्धा चांगले पीक यावे म्हणून
खर्च करत कर्जबाजारी मी होत गेलो।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?

निसर्गाची अनेक संकटे आली तरीही हार
न मानता सतत नव्याने सुरवात करत राहिलो।
शेतीमालाचे भाव पडल्यावर मदतीच्या
आशेने सरकारकडे डोळे लावून बसलो।।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?

मुलांना चांगलं शिकवून मोठं करण्यासाठी
नेहमी माझं मन मी मारत आलो।
मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करताना
सर्वांसमोर हात पसरून लाचार मी झालो।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?

चांगुलपणावर विश्वास ठेवत सर्वांना
मला जमेल तशी मदत मी करत राहिलो।
कष्टाचे चीज न होता मिळालेली अर्धी
भाकरसुद्धा सगळ्यात वाटुन खात आलो।।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो?

सर्वांना सुखात बघण्यासाठी त्याग करत
आयुष्यभर जीवाचं रान करत राहिलो।
डोईजड झालेल्या कर्जाचा भार घेऊन मी
मृत्यूला कवटाळत या जगातून नाहीसा झालो।
तुम्हीच सांगा मी नेमका कुठे कमी पडलो

वाचण्यासारखे आणखी काही…..

भांडण शब्दांचं…..
कोडं आयुष्याचं सोडवूनच बघ!!
माझी म्हातारी

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय