प्रत्येक पालकाने मुलांच मनोविश्व समजून घेण्यासाठी वाचावं असं पुस्तक

दोन पद्धतीची मुलं असतात, एक कोणत्याही गोष्टीला नकारात्मक प्रतिसाद देणारे, भांडण करणारे, कोणाशी सौजन्याने न वागणारे, स्वतःची चूक मान्य न करणारे आणि या मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी सतत ओरडावं लागतं. दुसरे असतात इतरांचा विचार करून वागणारे, भांडणतंट्याऐवजी संवादाने प्रश्न सोडवणारे, स्वतःला पडलेल्या प्रश्नांच्या शोधात असणारे. नकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या मुलांना समजवताना पालकांना नाकीनऊ येतं, आता टीव्ही किंवा मोबाईल बंद कर असं ओरडाव लागतं. अभ्यास केला नसेल तर ओरडून अभ्यासाला बसवावं लागतं, रोज झोपताना किती तरी वेळा झोप झोप म्हणावं लागतं.

मुलांचा मेंदू नकारात्मक का झाला? तर प्रश्नाचं उत्तर आपण शोधल्यावर सापडू शकेल. शाळेत असणारे नियम, दुसऱ्या मुलांबरोबर होणारी तुलना, पाठ करून किंवा रट्टा मारून शिकण्याची पध्दती, क्लासेसच ओझं, डिजिटल मीडियाचा गृहप्रवेश, घरात असणारं वातावरण या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मकतेला जबाबदार आहेत. त्यात अभ्यासाचं वाढलेलं ओझं आणि पालकांच्या मुलांकडून वाढलेल्या अपेक्षा अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांनी सगळ्या क्षेत्रात हुशार असायला हवं असं वाटत राहतं. मुलांच्या कोणत्याही गोष्टी शिकण्यामध्ये पालकांचा वाटा महत्वाचा असतो. जी मूल्ये किंवा गुण आपल्याला मुलांमध्ये विकसित करायचे आहेत त्या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांना उद्युक्त करण हे पालकांचं महत्वाचं काम आहे. छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्यांच्या जिज्ञासेला फुंकर घालू शकतो.

लहान मुलांचा मेंदू पूर्णतः विकसित न झाल्या कारणाने ती आपल्या भावनांवर व विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यावेळी पालकांची जबाबदारी महत्वाची असते. ज्यावेळी लहान मुलं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण करू शकत नाही त्यावेळी पालकांनी या गोष्टी समजावून किंवा कृतीतून त्यांना दाखवून देणं गरजेचं असतं.

राजू हा १० वर्षांचा मुलगा, त्याला फुटबॉल खेळायला आवडतं म्हणून त्याचे वडील त्याला रोज खेळायला घेऊन जायचे. ज्यावेळी तो जिंकायचा किंवा त्याची टीम जिंकायची त्यावेळी तो प्रचंड खुश व्हायचा. पण जर का तो हरला किंवा त्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडल्या नाही तर तो चिडायचा, रागाराग करायचा. शहाणा म्हणता म्हणता त्याच रूपांतर रागीट मुलामध्ये कधी व्हायचं कळायचं नाही. मग त्याला समजावलं तरी तो ऐकत नसे. काय घडलं इथे? तर जो भावनांचा समतोल असायला हवा होतो तो इथे बघायला मिळत नाही. एका बाजूला खूपच आनंद तर दुसऱ्या बाजूला खूप सारी चिडचिड. असे अनुभव आपण आपल्या मुलांबाबत नेहमी घेतो.

भावनिक नियंत्रण ठेवता न येणं ही समस्या आपणाला थोड्या जास्त प्रमाणात सर्व मुलांमध्ये पहावयास मिळते. हे सर्व घडण्यामागे काही करणं आहेत ती आपण पाहू…..

  • शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकसित होणारं वय
  • मनावर झालेले आघात मग ते मानसिक असो किंवा शारीरिक
  • झोपेच्या समस्या
  • संवेदना प्रक्रियेत घडून येणारी आव्हान
  • शारीरिक किंवा मानसिक आजार
  • कोणतीही गोष्ट समजण्यात किंवा शिकण्यात येणारे अडथळे
  • पालकांचा किंवा शिक्षकांचा दबाव
  • मुलांकडून ठेवण्यात आलेल्या गरजेपेक्षा जास्त अपेक्षा

वरील करणं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या भावनात्मक असमतोलास जबाबदार आहेत. ज्याचा परिणाम म्हणून राग येणं, मोठमोठ्याने ओरडणं, ताठरपणा किंवा लवचिकता नसणं, स्वतःला एकटं समजणं, निराश वाटणं इत्यादी लक्षण मुलांमध्ये दिसून येतात. याच घटना वारंवार घडत गेल्या तर हा स्वभाव मुलांच्या अंगवळणी पडून त्यांची ही वागणूक उत्तरोत्तर वाढत जाते. मग यावर उपाय काय?

जर आपणास वाटतं की आपली मुलं सकारात्मक विचार करणारी व्हावीत, संकटांच्यावेळी व समस्या उद्भवल्यास समतोल विचार करून प्रतिसाद देणारी व्हावीत तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. मुलांमध्ये ही कौशल्ये कशी विकसित करावी यासाठी विशेष मार्गदर्शन या पुस्तकात पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या प्रत्येक पालकाने हे पुस्तक नक्की वाचावं.

पुस्तकाचा पूर्ण परिचय :

The Yes Brain: How to Cultivate Courage, Curiosity, and Resilience in Your Child


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “प्रत्येक पालकाने मुलांच मनोविश्व समजून घेण्यासाठी वाचावं असं पुस्तक”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय