भारतात दाखवलेल्या पहिल्या सिनेमात इंजिन हलतांना पाहून लोक चक्क घाबरले होते

याच हॉटेल मध्ये मुहमद अली जिना पूल खेळून अधिकचे पैसेही कमावत असत. त्या काळात असे म्हटले जायचे की जमशेदजी टाटा यानां या हॉटेलचे कर्मचारी हॉटेलमध्ये येऊ देत नसत. कारण त्यांनी त्यांच्या ताजमहल हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते.

मुबंईतील काला घोडा या परीसरात वॅटसन हॉटेल नावाची एक इमारत आहे. (आज ही इमारत ‘Esplanade Mansion‘ म्हणून ओळखली जाते.) भारतातील पहिली Cast Iron Building म्हणून ही ओळखली जाते. या इमारतीचे फॅब्रिकेशन इंग्लंड मध्ये करण्यात आले होते आणि १८६०-६३ च्या दरम्यान मुंबईत बांधकाम झाले. १८६७ मध्ये ही इमारत ९९९ वर्षांसाठी लिजवर देण्यात आली. वर्षाचे ९२ रूपये आणि १२ आणे असा भाडे करार अब्दुल हक या इसमा बरोबर करण्यात आला.

या हॉटेलमध्ये जग प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन काही दिवस थांबले होते. बाल्कनीत बसून ते मुंबई न्याहळत व लिखाण करत असत. त्यांच्या Following the Equator या पुस्तकात इथले काही वर्णन आले आहे. याच हॉटेल मध्ये मुहमद अली जिना पूल खेळून अधिकचे पैसेही कमावत असत. त्या काळात असे म्हटले जायचे की जमशेदजी टाटा यानां या हॉटेलचे कर्मचारी हॉटेलमध्ये येऊ देत नसत. कारण त्यांनी त्यांच्या ताजमहल हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते.

तर अशा या हॉटेलमध्ये एक खास घटना घडणार होती. ७ जुलै १८९६ चा तो दिवस होता. हॉटेलच्या हॉलमध्ये एका खास शोसाठी अनेकानां आमंत्रीत करण्यात आले होते तर सर्वसाधारण प्रेक्षकांसाठी १ रूपया तिकीट ठेवण्यात आले होते. पॅरीस वरून दोन भाऊ कसले तरी एक मशीन घेऊन आले होते. त्यांच्या म्हणण्या नुसार त्यांनी एक नवीन संशोधन केले होते आणि त्याचाच एक प्रयोग इथे होणार होता. ऑगस्ट आणि लुईस लुमिए अशी त्यांची नावे. हॉल लोकांनी गच्च भरला. थोड्याच वेळात हॉलचे दिवे घालविण्यात आले. लोकांना समजेना की या अंधारात आपण काय बघणार आहोत. आणि थोड्याच वेळात समोरच्या पांढऱ्या पडद्यावर चक्क रेल्वेचे एक इंजिन दिसायला लागले. गमंत म्हणजे ते इंजिन हळूहळू पूढे येऊ लागले.

लोकानां तर विश्वासच बसेना. हे कसे शक्य आहे.? समोरचे इंजिन धावतांना कसे काय दिसतेय? सगळा हॉल टाळ्यांच्या कडकडाटांनी भरून गेला. काहीजण तर घाबरले देखिल !!! आत्ता पर्यंत लोकांनी छायाचित्रे बघितली होती, अगदी रंगीत छायाचित्रे देखिल……पण धावणारे कृष्णधवल इंजिन खरोखरच एक चमत्कार होता. हाच भारतात दाखविला गेलेला पहिला सिनेमा.

अवघ्या काही मिनीटातच या नवीन तंत्राने सर्वांची मने जिंकली होती. लोकांचा अमाप आग्रह पाहून पुन्हा दुसऱ्या दिवशी आजचे जिथे नॉव्हेल्टी सिनेमागृह आहे त्या जागेत याचा शो ठेवण्यात आला. इतकेच नाही तर तो सर्व स्तरातल्या लोकानां बघता यावा म्हणून वेगवेगळे तिकट दर ठेवण्यात आले. कमीत कमी दर चार आणे होता. शिवाय परंपरावादी महिलांसाठी वेगळा स्वतंत्र शो देखील ठेवण्यात आला.

ऑगस्ट आणि लुईस लुमिए बंधूनी सर्वप्रथम आपला पहिला शो १२ मार्च १८९५ मध्ये पॅरीसमध्ये ठेवला होता. यात १० छोट्या छोट्या आर्ट फिल्मस होत्या. यातील प्रत्येक फिल्म १७ मीटर लांबीची होती आणि ती पडद्यावर साधारण ३८ ते ५० सेंकद दिसत असे. जगभर या फिल्म दाखवित असताना ते भारतात दुसऱ्याच वर्षी म्हणजे १८९६ ला आले.

या शो नंतर अवघ्या पाच वर्षात म्हणजे १९०१ मध्ये एस.एच. भाटवडेकर उर्फ सावे दादा यांनी भारतीय विषयांवर वृत्तचित्रांचे शुटींग केले. त्यानंतर अवघ्या ७ वर्षांने दादा साहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा ‘राजा हरीश्चंद्र’ हा चित्रपट तयार केला. चित्रपट या माध्यमाची ही जादूच अशी होती की हे तंत्र संशोधना नंतर अवघ्या १८ वर्षात भारतात चित्रपट व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मी तर असेही म्हणेन की आधुनिक काळातील हे एकमेव असे संशोधन आहे ज्याने १०० वर्षांत अवघे जग जिंकले.

७ जुलै २०१७ रोजी भारतातल्या या सिनेतंत्राच्या शोला १२१ वर्षे पूर्ण झाली आणि या खेळाचे साक्षीदार ठरली ही वॅटसन इमारत. आजही ही इमारत या ठिकाणी बघायला मिळते. या इमारतीच्या आजूबाजूने मुंबईकर सतत धावत असतात पण कदाचित त्यानाही हे माहित नसावे की ही इमारत चित्रपट इतिहासाची एक मुख्य साक्षीदार आहे. या इमारतीत आता वॅटसन हॉटेल मात्र नाही. या इमारतीत मात्र एक रेस्टॉरेंट आहे जिथे जवळच्या उच्च न्यायालयातील वकीलांची वर्दळ असते. पूर्वी या रेस्टॉरेंटमध्ये विविध संघटनेचे कार्यकर्ते येऊन तास न् तास चर्चा करत असत.

१३ जून २०१० साली या इमारतीचा समावेश जागतिक वारसा वास्तू-२ च्या यादीत करण्यात आला आहे…….सन २०१६ मध्ये ही इमारत म्हाडाच्या धोकादायक इमारत यादीत गेली असे वाचल्याचे स्मरते, नंतर या इमारतीची काही डागडुजी झाली असेल तर माहित नाही. पण मला स्वत:ला तर ही इमारती विलक्षण बोलकी वाटते. एखाद्या निवांतक्षणी या इमारती समोर काही काळ घालविला तर कदाचित ती पुन्हा बोलू लागेल. या इमारतीला भारतीय चित्रपटसृष्टीत नक्कीच एक खास स्थान आहे…तेव्हा त्या बाजूला कधी गेलात तर नक्कीच तिला सलाम करायला विसरू नका.

वाचण्यासारखे आणखी काही…..

एक विलक्षण आयुष्य जगलेल्या ललिताबाई….
हिंदी सिनेमाची ट्रॅजिडी क्वीन : मीना कुमारी
पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय