हिवाळ्यात या 15 पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा

थंडगार हवा, गरमागरम आलं घातलेला चहा आणि गोधडीत गुरफटून बसण्याची मजा ही तर झाली गुलाबी थंडीची लक्षणं.

पण हळूहळू दिवस छोटा होतो, रात्र मोठी होते आणि थंडीचा कडाका वाढतो.

हेच तर आदर्श दिवस असतात तब्येत सुधारण्यासाठी. कारण या दिवसांत व्यवस्थित भूक लागते, आणि चांगलंचुंगलं खावसं वाटतं.

थंडी वाढायला लागली की तुमच्या सौंदर्याची आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी.

अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं आरोग्य जपू शकता.

त्यासाठी या 15 पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा आणि हा थंडीचा मौसम एंजॉय करा.

1) खसखस

थंडीच्या दिवसात खसखसीचा आहारात आवर्जून वापर करा.

रात्रभर भिजवलेली खसखस सकाळी उठल्या उठल्या खाल्लीत तर मेंदू ताजातवाना होईल आणि तुम्ही दिवसभर एनर्जेटीक फील कराल.

एखाद्या खीरीमध्ये खसखस वाटून घालू शकता किंवा दुधात ही घालून तुम्ही पिऊ शकता.

2) काजू

थंडीच्या दिवसांत शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कॅलरीजची गरज असते. ज्या आपल्याला काजूमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात.

त्यामुळे थंडीच्या दिवसात काजुचा समावेश आहारात करा.

3) बदाम

कुडकुडणा-या थंडीत डोकं काम करत नसेल तर त्याला पौष्टिक खुराक द्या.

प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त बदाम जे रात्रभर भिजवलेले असतील ते थंडीच्या दिवसांत मेंदूला तरतरीत ठेवण्याचं काम करतात.

4) अक्रोड

फायबर, व्हिटॅमिन ए, आणि प्रोटीनने परीपूर्ण असणारं अक्रोड थंडीच्या दिवसांत शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करायला तुम्हांला मदत करतं. ज्यामुळं तुमचं आरोग्य उत्तम राहते.

5) अंजीर

थंडीच्या दिवसांत भूक लागते व्यवस्थित जेवण केलं जातं. पौष्टिक जेवणाबरोबर आहारात अंजीर या फळाचा तुम्ही समावेश केलात तर अंजीर फळातील आयर्न तुमच्या शरीरातील रक्तवाढीसाठी मदत करेल.

6) च्यवनप्राश

आवळयाचं कोणत्याही स्वरूपात सेवन केलं तरी त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात. त्यामुळं आवळ्याचा च्यवनप्राश आपण रोज घ्यायला सुरुवात केली की शरीराची पचनसंस्था सुधारायला लागते आणि शरीरात उर्जा निर्माण होते.

7) तिळाची वडी

संक्रांतीच्या काळात आवर्जून केली जाणारी तिळाची वडी थंडी सुरू झाल्यापासून आहारात समाविष्ट केली तर शरीराला कॅलरीज चांगल्या प्रकारे मिळतील, आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहील. तिळातलं कॅल्शियम आणि वडीत वापरला जाणा-या गूळातलं आयर्न, फॉस्फरस यांचा आरोग्यासाठी फायदा होतो.

8) खजूर

आयर्न मिनरल्स आणि व्हिटॅमिननी परीपूर्ण असणारे खजूर थंडीच्या दिवसांत आठवणीने खावेत.

9) दूध

दूध न आवडणा-यांची संख्या मोठी असते. पण आरोग्याविषयी सजग असाल तर किमान हिवाळ्यात तरी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात
केशर, आलं, खजूर, अंजीर आणि हळद घालून तुम्ही ते प्यायला पाहिजे. यामुळे थंडीत उद्भवणाऱ्या सर्दीखोकल्यापासून तुमचं संरक्षण होईल.

10) डिंकाचे लाडू

डिंकाचे लाडू हे फक्त बाळंतीणीने खायचे हा आपल्याकडे एक गैरसमज आहे.अतिशय पौष्टिक असणारे हे लाडू प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने थंडीच्या दिवसात तरी खाल्ले पाहिजेत.

11) मिक्स डाळीचे लाडू

बेसनाचे, मुगाचे लाडू सणावाराच्या निमित्ताने तुम्ही करताच पण हिवाळ्यासाठी मिक्स डाळीचे लाडू तयार करून घ्या. यातून तुम्हांला प्रोटिन मिळेल, आणि हिवाळ्यातली केसगळती थांबायला मदत होईल.

12) हिरव्या भाज्या

हिवाळ्यात भाजी मंडई रसरशीत हिरव्या भाज्यांनी फुलुन जाते. थंडीत कडकडून भूक ही लागते. तेंव्हा या पौष्टिक हिरव्या भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा आणि चांगली ताकद कमवा.

13) मध

नैसर्गिक एंटीबायोटिक असणारा मध हिवाळ्यातल्या सर्दीपासून तुमचा बचाव करेल आणि प्रतिकारशक्ती वाढायला ही मदत करेल.

14) कडधान्य

हिवाळ्यात जठराग्नी प्रज्वलित झालेला असतो.
त्यामुळे मोड आलेली कडधान्य भरपूर प्रमाणात तुम्ही खाऊ शकता, आणि या कडधान्याच्या पोषक तत्वांचा फायदा करुन घेऊ शकता

15) तूप

हिवाळा म्हटलं की हाडं गोठवणारी थंडी आलीच. या थंडीत सांधेदुखी, गुडघे दुखी असे रोग डोकं वर काढतात. त्याचा त्रास कमी होण्यासाठी शरीरात वंगणाची आवश्यकता असते. ही गरज योग्य प्रमाणात घेतलेल्या तुपामुळे पुर्ण होते. मानसिक आरोग्यासाठी ही तुपाचा चांगला फायदा होतो.

तर मित्रांनो या 15 पैकी जास्तीत जास्त पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा आणि थंडीच्या दिवसांत आपलं आरोग्य उत्तम ठेवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय