होमिओपॅथी- एक गुणकारी उपचार पद्धती, फायदे आणि पाळावयाची पथ्थे

होमिओपॅथी या गुणकारी उपचार पद्धती बद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

होमिओपॅथी ही जगभरात मान्यता पावलेली एक गुणकारी उपचार पद्धती आहे, जीची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून झाली. सुरूवातीला फारशी प्रचलित नसलेली होमिओपॅथी ही उपचार पद्धती हळूहळू मात्र लोकप्रिय होत गेली.

सध्या जगभरात अनेक लोक या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन आजारांचा सामना करत आहेत.

आज आपण होमिओपॅथी म्हणजे नेमके काय? ही उपचार पद्धती नेमकी कशी काम करते? हे उपचार घेत असताना कोण कोणती पथ्ये पाळावी? या सर्वांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

होमिओपॅथी या उपचार पद्धतीमध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्हीला बरोबरीचे महत्त्व दिले जाते, तसेच कोणत्याही आजारातून स्वतःला बरे करण्याची शरीराची क्षमता ओळखून उपचार केले जातात.

होमिओपॅथी म्हणजे काय?

इसवी सन १७९६ मध्ये जर्मनीतील एक संशोधक डॉ. साम्यूएल हेनिमेन यांनी होमिओपॅथी ही उपचार पद्धती शोधून काढली. परंतु १९व्या शतकात ही उपचारपद्धती जगभरात सगळीकडे स्वीकारली गेली आणि तिचा प्रसार सुरू झाला.

या उपचार पद्धतीमध्ये योग्य मात्रेमध्ये नैसर्गिक औषधे देऊन आजार बरे करण्याकडे कल असतो. होमिओपॅथीची औषधे निर्माण करताना वेगवेगळी खनिजे आणि औषधी वनस्पती यांचा वापर होतो.

होमिओपॅथीमध्ये तात्पुरत्या आजारांबरोबरच जुनाट आजारांवर समूळ उपचार करण्याची पद्धत वापरली जाते. यासाठी रुग्णाची संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्थिती तपासली जाते.

होमिओपॅथी उपचार पद्धतीचे फायदे

होमिओपॅथी ही सुरक्षित आणि सौम्य प्रकारची उपचार पद्धती असून या उपचार पद्धतीद्वारे लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया अशा सर्वांवर उपचार करणे सुरक्षित आहे.

हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार असणारे लोक आणि लॅक्टोज इंटॉलरंट लोक सुद्धा या उपचारपद्धतीचा लाभ घेऊ शकतात.

होमिओपॅथिक औषधांचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत आणि या औषधांची रुग्णाला सवय (एडिक्शन) देखील लागत नाही.

नेहमी होणाऱ्या साध्या आजारांबरोबरच काही गंभीर आजारांवर सुद्धा होमिओपॅथी औषधे गुणकारी आहेत. शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्यासाठी ऍलोपॅथीच्या औषधांबरोबरच होमिओपॅथी औषधे दिल्यास लवकर गुण दिसून येतो.

होमिओपॅथीची औषधे कशाप्रकारे तयार केली जातात?

होमिओपॅथीची औषधे संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवली जातात. ही औषधे बनवताना निरनिराळ्या औषधी वनस्पती (सिंहपर्णी, प्लांटेन, फॉक्सग्लोव), निरनिराळी खनिजे (मीठ, लोह, फास्फोरस) आणि इतर काही नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो.

काही औषधांमध्ये पेनिसिलिन आणि ऍस्प्रिन ह्या औषधी घटकांचा समावेश होतो.

औषधे बनवताना या सर्व घटकांचे प्रमाण कसे असावे याचे निकष आधीच ठरवले गेले असून त्याला केंद्रीय औषधनिर्माण संस्थेची मान्यता असते.

सर्व होमिओपॅथीची औषधे होमिओपॅथिक फार्माकॉपिया या संस्थेद्वारे नियंत्रित केली जातात. जगभरात सर्वत्र ही औषधे नियंत्रित केलेल्या पद्धतीनुसारच तयार केली जातात.

होमिओपॅथीची औषधे कशाप्रकारे घ्यावीत?

होमिओपॅथीची औषधे गोळ्या, ड्रॉप्स किंवा चूर्ण या स्वरूपात असतात. साबुदाण्याच्या गोळ्या ह्या नावाने ह्या गोळ्या प्रसिद्ध आहेत कारण त्यांचा आकार साबूदाण्यासारखा असतो आणि चव सहसा गोड असते.

आजाराच्या गंभीरतेने नुसार डॉक्टर औषधांची मात्रा ठरवतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दिवसातून किती वेळा औषधे घ्यायची ते ठरवावे.

होमिओपॅथीची औषधे घेण्याआधी किमान वीस मिनिटे काहीही खाल्लेले अथवा पाणी इत्यादी प्यायलेले असू नये. थोडक्यात रुग्णाची जीभ स्वच्छ असावी.

त्यामुळे होमिओपॅथीची औषधे शरीरात पटकन शोषली जातात आणि लवकर आपले काम सुरू करतात.

होमिओपॅथीची काही प्रसिद्ध आणि ठराविक औषधे घरच्याघरी सुद्धा पोटदुखी, अपचन किंवा सर्दी खोकला अशा सामान्य आजारांवर घेता येऊ शकतात.

परंतु गंभीर आजारांवरची औषधे मात्र तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. अशावेळी स्वतःच्या मनाने औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

होमिओपॅथीच्या औषधांचे फारसे साईड-इफेक्ट नसतात हा त्यांचा एक मोठा फायदा असून याच कारणामुळे ही औषध पद्धती सगळीकडे लोकप्रिय होत आहे. लहान मुलांसाठी देखील होमिओपॅथीची औषधे अतिशय सुरक्षित आहेत. चवीला गोड असल्यामुळे मुले ही औषधे पटकन घेतात.

होमिओपॅथीची औषधे घेताना पाळावयाची पथ्ये

लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरसमज असतो की होमिओपॅथीची औषधे घेत असल्यास कांदा, लसुण आणि कॉफी पूर्णपणे बंद करावी लागते. परंतु हे खरे नाही.

ही गोष्ट खरी आहे की तीव्र चवीचे कोणतेही पदार्थ कच्च्या स्वरूपात सेवन करून लगेच होमिओपॅथीचे औषध घेतल्यास औषधाचा परिणाम होत नाही. परंतु फार तीव्र चव नसलेले आणि शिजवलेले कांदा-लसूण युक्त पदार्थ आणि इंस्टंट कॉफी यांचे सेवन करण्यास हरकत नसते.

औषध घेण्याआधी पाळण्याचे एकमेव पथ्य म्हणजे किमान वीस मिनिटे आधी आणि वीस मिनिटे नंतर काहीही खाऊ अथवा पिऊ नये.

याव्यतिरिक्त आपल्या तब्येतीनुसार डॉक्टरांनी काही पथ्ये सांगितली तर मात्र त्यांचे पालन अवश्य करावे.

भारतात होमिओपॅथी ही औषध प्रणाली आयुष मंत्रालय आणि केंद्रीय औषध निर्माण केंद्र यांच्याद्वारे प्रमाणित केली गेली आहे. अशाच पद्धतीने जगभरातील वेगवेगळ्या देशात त्यांच्या त्यांच्या आरोग्य मंत्रालयाने होमिओपॅथी या उपचार पद्धतीला मान्यता दिली आहे.

यावरून आपल्या असे लक्षात येते की होमिओपॅथी हीसुद्धा एक महत्त्वाची उपचार पद्धती असून अतिशय सुरक्षित आणि कोणत्याही आजाराचे समूळ उच्चाटन करणारी अशी ही उपचार पद्धती आहे.

या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीचा अभ्यास करून रुग्णाचा आजार मुळापासून बरा करण्यासाठी औषधे दिली जातात.

त्यामुळे कदाचित या उपचार पद्धतीने बरे होण्यास थोडा अधिक काळ लागतो, परंतु रूग्णाच्या आजाराचे समूळ उच्चाटन शक्य होते. रुग्ण संपूर्णपणे बरा होतो हे निश्चित. अनेक जुनाट आजारांवर, अलर्जीवर होमिओपॅथी गुणकारी ठरते.

मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला ही लेखात सांगितलेली माहिती कशी वाटली? तुम्ही होमिओपॅथी ही उपचार पद्धती वापरता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना होमिओपॅथी या उपचारपद्धतीचा लाभ घेता यावा म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

स्वस्थ राहा आनंदी राहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “होमिओपॅथी- एक गुणकारी उपचार पद्धती, फायदे आणि पाळावयाची पथ्थे”

  1. खूप छान माहिती एखादे डॉ चांगले माहीत असल्या सुचवा

    Reply
  2. Dr.Girish Tathed Pimpri Chinchwad opp Lokmannya hospital , Tathed Clinic mob-no 8767760578

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय