हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

“माझं १००% सगळं बरोबर असावं”, “सगळं अगदी परफेक्ट असावं”, “माझ्यात नावं ठेवायला जागा नसावी”, “माझी मुलं गुणी असावीत”, “माझं घर व्यवस्थित असावं”, अशी कितीतरी परिपूर्णतेची स्वप्न आपण सगळेच पाहतो. हि स्वप्न ‘१००%’ सत्यात उतरावीत ह्यासाठी प्रयत्नही करतो. जेंव्हा १००% मिळण्याऐवजी ९०% मिळतात तेंव्हा हे नसलेले १०% काहीवेळेस प्रेरणा देतात, आशावाद जागवतात तर काही वेळेस देतात निराशा. उरलेल्या १०% साठी उदास झालेले अनेकजण दिसतात. असं होतं तेंव्हा आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल वाटणारं समाधान कमी होतं. आणि दु:ख बोचत राहतं.

असं का होतं? नसलेले १०% मिळविण्याच्या इच्छेचा जेंव्हा अट्टहास होतो, तेंव्हा दु:खाला सुरुवात होते. ते १०% नाहीत तर काहीच नाही, असा दृष्टीकोण तयार झाला कि, आपण स्वत:ला त्रास करून घेऊ लागतो आणि ९०% कडे सरळ-सरळ दुर्लक्ष करतो. स्वत:लाच नको-नको ते बोलू लागतो. नालायक ठरवू लागतो. हे १००% आपल्याला अनेक गोष्टींमध्ये हवे असतात. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे घर, मुलं, संसार, नोकरी, परिक्षा सगळ्याच बाबतीत.

१००% मिळविणे पूर्णपणे आपल्या हातात नाही, हे माहिती असतं तरीही. मग तिथून पुढे, ‘माझ्या हातात सगळं का नाही?’ हा प्रश्न तयार होतो. जो परत तुम्हाला छळू लागतो. ह्या सगळ्या प्रकारात होतं एवढंच कि, तुम्ही आत्ता काय आहे, कसं आहे? ह्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करता आणि वर्तमानकाळातला आनंद गमावता. फक्त पळत राहता १०% मिळविण्यासाठी.

पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं.

आपण बदलायचं हे एकदा ठरवल्यानंतर बदलणं अगदी सोपं आहे. आपण एखाद्या घटनेकडे कसे पाहतो ह्यावर आपला आनंद किंवा दु:ख अवलंबून असतं. बरेचदा आपण त्या घटनेला कल्पनेतच मोठं केलेलं असतं. भयावह केलेलं असतं. त्यामुळे आधीच भीती, काळजी वाटू लागते. तसं करण्यापेक्षा वर्तमानकाळात राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आपल्याकडे ताकद असते. ती ओळखायला हवी. तसंच एखादा विचार डोक्यात येणं आणि प्रत्यक्षात घडणं ह्यांत फरक आहे हेही लक्षात घ्यावं.

काही वाक्य आपण स्वत:शीच बोलत असतो. “मला जमणारच नाही,” “मला चालणारच नाही,” “मी नालायक ठरेन”, अशी काहीशी ती वाक्यं असतात. स्वत:शीच केले जाणारे हे विचार आनंदापासून मागे खेचतात. त्या ऐवजी स्वत:शी सकारात्मक रितीने बोला. न जमणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी स्वत:ला माफ करायला शिका. थोडक्यात, स्वत:ला गुणदोषासह स्विकारा.

आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी असतात. सुंदर गोष्टी असतात. त्यांचं कौतुक करायला सुरुवात करा. आपल्याला जे आवडतं त्याच्यासाठी वेळ काढायला लागा. जरावेळ मोकळ्या हवेत फिरणे, मित्रांसोबत हसणे, जवळच्या, आवडणाऱ्या व्यक्तिसोबत वेळ घालवणे ह्या गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. बळ देतात. आणि १००% जगायला शिकवतात.

ह्या सगळ्यांचा अर्थ ध्येयाकडे दुर्लक्ष करावं असा अजिबात नाही. प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय