महिलांनी आपल्या पर्स मध्ये या ११ वस्तू ठेवल्या तर त्यांना कसलीही अडचण येणार नाही

मैत्रिणींनो तुमच्या पर्समध्ये या ११ वस्तू असतात ना?

महिलांची जीवाभावाची सखी म्हणजे म्हणजे पर्स!!!

मैत्रिणींनो, तुमच्याकडे कितीही पर्सेस असल्या तरी अजून हव्याशा वाटतात.

प्रत्येक ठिकाणी नेण्याची पर्स वेगवेगळी असते.

म्हणजे लग्नसमारंभासाठी वेगळी तेही जवळचा लग्नसमारंभ असेल तर वेगळी पर्स, दूरच्या ओळखीतला लग्नसमारंभ असेल तर वेगळी पर्स, ऑफिससाठी वेगळी, बाजारहाट करण्यासाठी वेगळी मोठ्या खरेदीसाठी वेगळी अशा असंख्य पर्स तुमच्याकडे असतात…..

पण ज्या मैत्रिणी नोकरी करतात त्यांच्या पर्समध्ये असंख्या चीजा बघायला मिळतात.

एक जादूगाराची पोतडीत असते म्हणा ना ! त्यातून काय काय निघते माहितीये का?

औषधं, लवंगा, वेलदोडे, चणे-फुटाणे, चॉकलेट्स, पेन्सिल, पेन, कॉम्पॅक्ट पावडर, पाण्याची बाटली छोटे कानातले टिकल्या, रुमाल अरे बापरे ! ही यादी तर न संपणारी आहे…

नोकरीनिमित्त तुम्हाला रोज दूर जावं लागत असेल प्रवास करावा लागत असेल किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर प्रवासाला गेलेला असाल तर तुमच्या पर्समध्ये या 11 गोष्टी आवर्जून आहेत ना याची खात्री करा

त्याचबरोबर या अकरा गोष्टींचा उपयोग काय आणि कसा करायचा तेही जाणून घ्या.

१) पेन

कुठलाही महत्त्वाचा फोन नंबर, पत्ता लिहून घ्यायला, सही करायला आपल्याजवळ पेन असणं महत्त्वाचं आहेच.

पण त्याच बरोबर एक अवजार म्हणून तुम्ही पेनचा वापर करू शकता.

तुमच्यावर हल्ला झाला तर हा पेन समोरच्या व्यक्तीच्या मानेवर रुतवून तुम्ही तुमची तात्पुरती सुटका करून घेऊ शकता.

२) सुई दोरा आणि सेफ्टी पिन

प्रवास करत असताना रेल्वेत किंवा बसमध्ये अडकून तुमचा ड्रेस फाटू शकतो.

त्यासाठी जवळ सुई दोरा आणि एखादी सेफ्टी पिन आवर्जून ठेवा.

बस मधून प्रवास करताना स्वसंरक्षणासाठी सुद्धा या सेफ्टी पिन चा चांगला उपयोग काही महिलांना माहिती असतो.

३) स्प्रे

मेकअपमधलं बाकी सगळं सामान आठवणींनं घेणाऱ्या मैत्रिणी, स्प्रे घ्यायला मात्र का विसरतात काही कळत नाही.

हा स्प्रे अगदी रेग्युलर परफ्यूम स्प्रे असला तरी चालू शकतो.

तुमचं व्यक्तिमत्त्व सतत अपडेट ठेवण्यासाठी या स्प्रेचा उपयोग होईलच, पण तुमच्यावर कोणी हल्ला केला, तुम्ही अडचणीत सापडला तर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यावरती हा स्प्रे फवारून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकता.

बाजारात स्वसंरक्षणासाठी वेगळे स्प्रे उपलब्ध असतात. मात्र तुमच्या गावांमध्ये असे स्प्रे मिळत नसतील तर साधे नेहमी वापरले जाणारे स्प्रे तुम्ही जवळ ठेवू शकता, आणि संकटाच्या वेळी ही वापरू शकता.

४) टिशू पेपर

टिश्यू पेपर घाम पुसण्यासाठी, हात पुसण्यासाठी उपयोगी पडू शकतो.

५) पेपर चा मोठा तुकडा

भारतातील महिलांना पी टू राइट चळवळ करावी लागते, कारण त्यांना जवळपास कुठेही मोकळं होण्यासाठी जागा नसते.

जागा उपलब्ध असेल तर ती स्वच्छ नसते.

सध्या कमोड सिस्टीम सगळीकडे असते आणि ती अतिशय खराब असते.

अशा वेळेला तुमच्या पर्स मधला मोठा पेपर उपयोगी पडेल.

पेपर योग्य पद्धतीने कट करून तुम्ही कमोड वर अंथरू शकता आणि खराब कमोडचा सुद्धा वापर करू शकता.

६) बॅन्डेड

प्रवास करताना तुम्ही सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असाल तर गर्दीमुळे कुठेतरी खरचटण्यासारखे प्रसंग येऊ शकतात.

तुम्ही तुमच्या वाहनाने प्रवास करत असाल तरीही छोटासा अपघात झाला तर,
तुमच्या बरोबर लहान मुलं असतील तर ती कुठे तरी धडपडली तर त्यांच्यासाठी सुद्धा बॅन्डेड महत्त्वाचं ठरतं.

७) ग्लू (गम)

अभिनेत्री सीनियर ‘सोनाली कुलकर्णी’ हिने आपल्या एका लेखात चपलांची गंमत लिहिली होती.

त्यात एका अवॉर्ड फंक्शन साठी गेल्यानंतर तिची चप्पल कशी तुटली? आणि संपूर्ण समारंभात त्या तुटक्या चप्पलसह कसं वावरावं लागतं याचं वर्णन तिने केलं होतं.

यावरती उपाय म्हणून सोनाली कुलकर्णीने गाडीमध्ये आणखीन एका चपलेचा जोड ठेवण्याची पद्धत सुरू केली.

तर मैत्रिणींनो आपण सगळीकडे चपलांचा आणखीन एक जोड कॅरी करू शकूच असं नाही.

त्यासाठी एखादं ग्लू (गमची /डिंकाची पेस्ट) तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायला हरकत नाही.

बऱ्याच वेळा हिल्स तुटतात आणि मग अडचण होते त्यापेक्षा तुमच्या जवळच्या इन्सन्ट ग्लूने तुम्ही ते पटकन चिकटवून कामाला लागू शकता.

८) मॉइश्चरायझर

प्रवासात चेहरा किंवा हात ड्राय होतात किंवा कधीतरी हात साफ करायचा असेल मॉइश्चरायझर लावून तुम्ही ओलावा मिळवू शकता.

भारतासारख्या कोरडया हवामानामध्ये मॉइश्चरायझर ची गरज लहान मुलींपासून प्रत्येक स्त्रीला आहे.

त्यामुळे चांगल्या प्रतीचा मॉइश्चरायझर निवडा आणि ते तुमच्या पर्समध्ये नेहमी ठेवा.

९) पेन किलर

पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी अशासाठी एखादी पेनकिलर तुमच्या पर्समध्ये असणे गरजेचे आहे.

१०) सॅनिटायझर

कोविड नंतरच्या काळामध्ये सॅनिटायझर तुमच्या पर्समध्ये असणं गरजेचं झालेलं आहे.

११) सॅनिटरी पॅड आणि काळी बॅग

मैत्रीणींनो ही गोष्ट तर कधीच विसरू नका.

कारण प्रवासात कधीही, कुठेही तुम्हाला गरज पडू शकते.

पॅड तुम्ही काळ्या बॅगमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवलं तर ते कुणाच्या नजरेला ही पडणार नाही.

प्रवास अगदी रोजचा असो किंवा कधीतरी असो महिलांनी घर सोडण्यापूर्वी या ११ वस्तू आपल्या पर्समध्ये आहेत याची खात्री करून घ्यावी आणि बिनधास्त प्रवास करावा.

मैत्रीणींनो, या ११ वस्तुपैकी कोणती वस्तु तुम्हांला कशा पद्धतीने उपयोगी पडली तो अनुभव आम्हांला ही सांगा कमेंटमधून !

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय