विविध मार्गाने मिळू शकणारे करमुक्त उत्पन्न (Tax Free Income)

आयकर कायद्यानुसार वर्षभरात सर्व मार्गांनी मिळालेल्या पैशांची आपल्या उत्पन्नात गणना होते. विविध वजावटी आणि शून्यकर असलेले उत्पन्न वगळून वरील उत्पन्नावर कर भरावा लागतो हे आपल्याला माहीत आहेच. असे असले तरी आयकर कायद्यातील कलम १० नुसार अनेक उत्पन्न काही मर्यादेत किंवा पूर्णतः Tax Free आहेत. त्यांची माहिती करून घेवूयात.

  • ग्रेजुटी : सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार ग्रेजुटीची रक्कम मिळते. ही रक्कम शेवटी मिळणाऱ्या मासिक पगारास (मूळ पगार + महागाई भत्ता) १५ /२६ ने गुणुन त्यास झालेल्या सेवाकालाच्या वर्षाने गुणले असता येणाऱ्या रकमेचे एवढी तरी किमान असतेच. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी पूर्ण रक्कम आणि खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणारी १० लाख रुपये (ही मर्यादा नजीकच्या काळात २० लाख रूपये होईल) एवढी रक्कम कलम १०(१०) नुसार करमुक्त आहे.
  • स्वेच्छानिवृत्तीची रक्कम : आयकर कलम १०(१०/C) नुसार स्वेच्छानिवृत्तीची भरपाई म्हणून मिळणारी रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे तर इतरांना ५ लाख रुपयांच्या मर्यादेत करमुक्त आहे. मांत्र ही सवलत पूर्ण आयुष्यात एकदाच घेता येते.
  • भारतीय नागरिकांना परदेशात काम करण्याबद्धल मिळणारे भत्ते : आयकर कलम १०(७) नुसार जे भारतीय नागरिक परदेशी काम करतात त्याबद्दल त्यांना मिळणारे भत्ते हे पूर्णपणे करमुक्त आहेत.
  • शेअर आणि इक्विटी म्यूचुयल फंडावरील डिव्हिडंड : शेअरबाजारात नोंदणीकृत कंपन्यांवर मिळणारा १० लाख रुपयांपर्यंत डीवीडेंड आणि १ एप्रिल २०१८ नंतर इक्विटी म्यूचुयल फंडावर मिळणारा डीवीडेंड हा १०% डीवीडेंड डिस्ट्रीब्यूशन टॅक्स कापून घेवून मिळत असल्याने कलम १० (३४) नुसार लाभार्थींना पूर्णपणे करमुक्त आहे.
  • शेतीपासून मिळालेले उत्पन्न : आयकर कलम १०(१) नुसार शेतीपासून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. परंतू हे उत्पन्न ५ हजारांहून अधिक असले तर एकूण करपात्रता निश्चित करण्यासाठी एकूण उत्पन्नात मिळवण्यात येते. ग्रामीण भागातील शेतजमीन विक्री केल्याने झालेला दीर्घ मुदतीचा फायदा कलम २(१४) नुसार आणि विकास कामासाठी सक्तीने संपादित जमिनीचा मोबदला कलम १०(३७) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.
  • सन्मान वेतनधारक : वीरचक्र , महावीरचक्र आणि परमवीरचक्र विजेते किंवा सरकारी मान्यताप्राप्त शौर्य पदक विजेते किंवा त्यांचे वारस यांना मिळणारे रोख पुरस्कार, सन्मानवेतन आणि निवृत्तीवेतन कलम १०(१८) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.
  • पार्टनरशिप मधून मिळालेले उत्पन्न : पार्टनरशिप फर्मने व्यक्तीप्रमाणेच स्वतंत्रपणे टॅक्स भरला असेल तर कलम १०(२/A) नुसार भागीदाराना मिळालेल्या लाभावर कर भरावा लागत नाही.
  • हिंदू अविभाज्य कुटुंबाचे उत्पन्न : हिंदू अविभाज्य कुटुंबाचा घटक म्हणून मिळालेल्या रकमेवर कलम १० (२)नुसार कोणताही कर भरावा लागणार नाही.
  • करमुक्त व्याजदराचे रोखे : सरकारने मान्यता दिलेल्या या विशेष रोख्यावरील व्याज कोणत्याही मर्यादेशिवाय कलम १०(१५) नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.
  • विमा पॉलिसी मुदतपूर्तीची रक्कम : काही अटींसह विमापॉलिसीच्या मुदतपूर्तीची रक्कम १०(१०/D) पूर्णपणे तर १ एप्रिल २०१२ नंतर विमोचन होणाऱ्या पॉलिसीची देय रक्कम एक लाख असेल तर त्या रकमेवर १% कर कापून उरलेली रक्कम करमुक्त आहे.

‘म्रुत्यु आणि कर आपण टाळू शकत नाही’ अशा आशयाचे एक वचन आहे. असे असले तरी आयकर अधिनियम १० नुसार वरील दहा गोष्टी त्याला अपवाद आहेत.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय