सावधान! यूपीआय पेमेंट द्वारे होणाऱ्या फ्रॉड पासून स्वतःला वाचवा.

जाणून घ्या असे पाच सोपे पण महत्त्वाचे उपाय ज्यांच्या मदतीने यु पी आय पेमेंट द्वारे होणारे फ्रॉड रोखता येतील आणि होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

डिजिटल पेमेंट या सुविधेमुळे आता भारतात मोठी क्रांती झाली आहे. कोणतेही पेमेंट करताना रोख रकमेची फारशी आवश्यकता उरलेली नाही. ऑनलाइन पेमेंट द्वारे अगदी पटकन एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करता येतात. ऑनलाइन पेमेंट ही खरे तर एक मोठी सुविधाच आहे.

परंतु कोणतीही फायदेशीर गोष्ट आली की त्याबरोबर काही तोटे देखील येतात. ज्या प्रमाणात डिजिटल पेमेंट मध्ये वाढ झाली त्याच प्रमाणात त्यासंबंधी होणाऱ्या फसवणुकीच्या केसेस देखील वाढू लागल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल पेमेंट करणाऱ्या लोकांना फसवणाऱ्या गुन्हेगारांची टोळीच निर्माण झाली आहे.

आज आपण यु पी आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय उपाय करता येतील ते पाहणार आहोत.

ऑनलाइन पेमेंटद्वारे कॅशलेस ट्रांजेक्शन करण्यासाठी यूपीआय ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. यु पी आय म्हणजे आपल्या बँक अकाउंटशी जोडलेला आपला युजर आयडी आणि पिन यांचा वापर करून केले जाणारे ऑनलाइन पेमेंट. यु पी आय आयडी आणि पिन वापरून अक्षरश: काही मिनिटात डिजिटल पेमेंट करता येऊ शकते. परंतु या सुविधेबरोबरच हे माध्यम वापरणाऱ्या लोकांच्या फसवणूकीच्या घटनादेखील समोर येऊ लागल्या आहेत.

अशा पद्धतीच्या फ्रॉड मध्ये फसवले जाऊन आपले कष्टाने कमावलेले पैसे गमावण्यासारखे दुसरे दुःख नाही. आपल्या बाबतीत असे होऊ नये म्हणून आम्ही काही सोपे उपाय सुचवत आहोत. या सोप्या उपायांचा अवलंब केल्यास आपण आपले कष्टाचे पैसे फ्रॉड करणाऱ्या लोकांपासून वाचवू शकतो.

यु पी आय फ्रॉड कशा पद्धतीने होऊ शकतो?

यू पी आय पेमेंट करणाऱ्या एखाद्या ग्राहकाला गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती फोन करून आपण बँकेकडून बोलत आहोत असे भासवून तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे अन्यथा तुमचे अकाउंट ब्लॉक होईल अशा पद्धतीची भीती घालून ग्राहकाची गोपनीय माहिती ( यू पी आय आयडी, पिन नंबर, पासवर्ड, ओटीपी) विचारते.

ग्राहक देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून कदाचित आपले अकाऊंट ब्लॉक होईल या भीतीने सगळी माहिती सांगून टाकतात. सदर गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती या माहितीच्या आधारे ग्राहकाच्या अकाउंट मधील सगळे पैसे काढून घेते. ग्राहकाने स्वतः सगळी माहिती पुरवली असल्यामुळे असे करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला कोणताही अडथळा येत नाही. तसेच बँक देखील या बाबतीत काही हस्तक्षेप करू शकत नाही.

परंतु अशी घटना होऊ नये म्हणून सर्व प्रथम आपण आपली गोपनीय माहिती ( कॉन्फिडेंशीयल इन्फॉर्मेशन) कोणालाही सांगू नये. बँकेचे अधिकारी कधीच फोनवर पिन नंबर किंवा ओटीपी अशा पद्धतीची माहिती विचारत नाहीत.

त्याच प्रमाणे तुम्हाला अमुक रकमेची लॉटरी लागली आहे किंवा तुम्ही आधी इतके पैसे दिले तर तुम्हाला इतके जास्त पैसे मिळू शकतील अशा पद्धतीच्या भूलथापा करणाऱ्या फोनला देखील बळी पडू नये.

या क्षेत्रात काम करणारे तज्ञ अधिकारी यू पी आय फ्रॉड पासून स्वतःला वाचवण्यासाठी खालील पाच उपाय करावयास सांगतात.

१. यु. पी. आय. पिन

आपला यू पी आय आयडी आणि पिन नंबर कधीही कोणालाही सांगू नका. कुठल्याही कस्टमर केअरच्या कॉलला अथवा मेसेजला उत्तर देताना आपला पिन नंबर सांगू नका. सरकारी अथवा बँकेचे अधिकारी कधीही यु पी आय पिनची मागणी करत नाहीत.

जर तुम्हाला कोणी फोनवर पिन नंबर मागत असेल तर तो नक्कीच तुमच्या फसवणुकीचा प्रयत्न आहे याची खात्री बाळगा. जरी फोन वरील व्यक्तीने तुमचे अकाउंट ब्लॉक होईल असे सांगितले तरी त्याकडे लक्ष न देता तसेच आपली कोणतीही गोपनीय माहिती त्यांना न सांगता फोन बंद करा आणि नंतर आपल्या बँकेत जाऊन प्रत्यक्ष चौकशी करून सर्व गोष्टींची खात्री करून घ्या.

२. मोबाईल किंवा कम्प्युटरचा कंट्रोल

ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करत असताना आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरचा कंट्रोल कोणत्याही ॲपद्वारे कधीही फोन वरील दुसऱ्या व्यक्तीला देऊ नका. आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटर मधील काही सेटिंग अपडेट करण्याच्या बहाण्याने असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या मोबाईलचा कंट्रोल मिळवतात आणि नंतर फसवणूक करून आपल्या खात्यातील सर्व पैसे काढून घेतात.

असे होऊ नये म्हणून कोणताही बँक अथवा केवायसी अपडेटचा फोन आल्यास अतिशय सावधगिरी बाळगून उत्तरे द्या.

३. अनधिकृत वेबसाइट द्वारे पेमेंट करणे टाळा

कोणत्याही रॅण्डम वेबसाईटला विजीट करून तिथून पेमेंट करणे टाळा. काही वेबसाईट ग्राहकांना भुलवण्यासाठी तुम्हाला रिवॉर्ड, कॅश बॅक किंवा प्राईज मनी मिळाले आहे असे सांगून ग्राहकांना आपल्या वेबसाईट कडे आकर्षित करतात.

अगदी किरकोळ म्हणजे एक रुपया वगैरे इतक्या कमी किमतीचे ट्रांजेक्शन करायला सांगून ते तुमचा यु पी आय पिन मिळवण्याचा प्रयत्न करतात. एकदा का त्यांना पिन नंबर मिळाला की तुमच्या अकाउंट मधले सगळे पैसे काढून घेण्यासाठी त्यांना काही मिनिटे देखील पुरेशी असतात.

असे होऊ नये म्हणून कोणत्याही अनधिकृत किंवा वेबसाईटला भेट देण्याचा मोह टाळा. किरकोळ कॅश बॅकच्या मोहाने मोठी रक्कम गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

४. यु पी आय पिन नंबर बदलत राहा

आपले अकाउंट सुरक्षित राहावे यासाठी आपला यू पी आय पिन नंबर सतत बदलत राहा. असे करण्यामुळे आधीचा एखादा पिन नंबर जरी कुणाला समजला असेल तरी बदलेल्या पिन नंबर मुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित राहू शकेल.

५. यू. पी. आय. पेमेंट लिमिटेड ठरवून घ्या

आपल्या अकाउंट मध्ये कितीही जास्त पैसे असले तरीही यू पी आय पेमेंट द्वारे ठराविक रक्कमच काढता येऊ शकेल असे सेटिंग करून ठेवा. असे करण्यामुळे दुर्दैवाने एखाद्या वेळी आपली माहिती गुन्हेगारांना समजून त्यांनी फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तरी निदान आपले होणारे नुकसान कमी किमतीचे असेल.

यू पी आय पेमेंटचे डेली ट्रांजेक्शनचे लिमिट ठरवता येते. यासंबंधीची अधिक माहिती तज्ञ व्यक्तीकडून मिळवा आणि आपले अकाऊंट सुरक्षित ठेवा.

तर हे आहेत अगदी सोपे पाच उपाय जे वारंवार केल्यास आपण आपले अकाउंट आणि त्यातील रक्कम सुरक्षित ठेवू शकू.

मित्र-मैत्रिणींनो, ऑनलाइन पेमेंटची सुविधा वापरत असताना आपल्या कष्टाच्या पैशांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच तुम्ही देखील वर सांगितलेल्या पाच उपायांचा नेहमी वापर करा आणि आपले पैसे सुरक्षित ठेवा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय