इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचे 10 फायदे

“रिटर्न फाईल केलेस का?” काही दिवसांनी अनेक घरातून (बहुतांश वेळा समस्त नवरे मंडळींना किंवा मुलांना) विचारला जाणारा हा प्रश्न आहे. यावर हो करतो, सीएना सांगितलय; अशी अनेक प्रकारची उत्तरे मिळतात.

“बघ हा नाहीतर आज-उद्या म्हणता म्हणता डेट उलटून जाईल. नेहमीचच आहे तुझ हे. कसला सिरिअसनेसच नाही. डेट उलटून गेली तर पेनॉल्टी बसेल. त्यापेक्षा ऑनलाईन भरुन टाक ना पटकन कितीसा वेळ लागतो?” असे अनेक सल्ले मिळाल्यानंतर मग रागाच्या भरात का होइना पण पटकन रिटर्न फाईल केला जातो. आजकाल अनेक कंपन्या आपल्या एंप्लॉयीजचा इनकम टॅक्स आणि रिटर्न फाइल करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा सी. ए. अपॉइंट करतात.

“काय आहे हे आयकर विवरणपत्रक म्हणजे ITR? तो फाईल करण बंधनकारक आहे का? त्याचे काय फायदे आहेत ?

इन्कम टॅक्स ॲक्ट, १९६१नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स बद्दल असणारा एक महत्वाचा गैरसमज म्हणजे, अनेकांना वाटत की ज्यांच इन्कम टॅक्सेबल नाही त्यांना रिटर्न्स फाईल करण्याची आवश्यकता नाही. निव्वळ नियम आहे म्हणूनच नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे अनेक फायदे आहेत.

  • रेसिडेंट प्रूफ(रहिवासी दाखला): आजच्या घडीला सर्वात महत्वाच डॉक्युमेंट कुठल असेल तर रेसिडेंट प्रूफ. अगदी मुलांच्या शाळेपासून पासपोर्ट ऑफिसपर्यंत सगळीकडेच रहिवासी दाखला मागितला जातो. “आधार फॉर्म” किंवा पासपोर्ट ऑफिससाठी या दाखल्याचे नियम थोडे कडक आहेत. परंतू इन्कम टॅक्स रिटर्न ची कागदपत्रे तुम्ही आधार कार्ड किंवा पासपोर्ट ऑफिसच्या कामासाठी रेसिडेंट प्रूफ म्हणून वापरु शकता.
  • लोन प्रोसेसिंग(कर्ज प्रक्रिया): अगदी सर्वसाधारण गरीब माणसापासून मोठ्या बिझनेसमन माणसापर्यंत सगळ्यांनाच आयुष्यात कधीना कधी कर्जाची गरज पडतेच. गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहनकर्ज अशी अनेक कर्ज घेताना अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. यासाठी मागील तीन वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची कागदपत्रे हे सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे जे बहुतेक सगळ्याच बॅंकामध्ये लोन प्रोसिसिंगच्या वेळी सादर करावे लागते.
  • क्रेडिट कार्ड ॲप्लिकेशन: क्रेडीट कार्ड च्या प्रोसेसिंग साठी इन्कम टॅक्स रिटर्न्स हे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट समजले जाते. हे डॉक्युमेंट प्रूफ म्हणून वापरता येते.
  • टि.डी. एस. रिफन्ड: जर तुमच्याकडून फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरुन द्यायचा राहिला असेल आणि तुमचा TDS कट झाला असेल तर ही कट झालेला TDS ची रक्कम परत मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक आहे.
  • विसा(Visa) प्रॉसेसिंग: इन्कम टॅक्स रिटर्न डॉक्युमेंट हे विसा प्रोसेसमध्ये खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे.
  • गुंतवणूकी संदर्भातील माहिती: जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी, कार, म्युच्युअल फंड्स यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक (investment) करता तेव्हा त्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जात असते. अशावेळी रिटर्न्स फाईल करुन सदर माहिती तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देवू शकता.
  • अतिरिक्त कपात: टॅक्स भरताना जर काही गोष्टींसाठी एंप्लॉयर कडून कपात(deductions) केलेली नसल्यास रिटर्न भरुन ती प्रोसिजर पूर्ण करता येते.
  • लेट फी : इन्कम टॅक्स रिटर्न उशीरा फाईल केल्यास त्याबद्दल लेट फी भरावी लागते. इन्कम टॅक्स ॲक्ट,१९६१कलम १३१(१) नुसार५०००/- ते१००००/- रकमेपर्यंतच्या लेट फी ची तरतूद करण्यात आलेली आहे.
  • अतिरक्त व्याज: रिटर्न्स फाईल न केल्यास बॅलन्स टॅक्सवर अतिरिक्त व्याज १% प्रती महिना भरावे लागते.
 • इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जाऊन टॅक्स रिटर्न ऑनलाईनही भरता येतो. त्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरुन लॉगिन कराव लागेल

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी८३०८२४७४८०या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय