तिच्यातली “ती”

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून प्रवास करत असताना स्त्री ला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून जावं लागतं. एक मुलगी ते एक प्रेयसी मधून मग तो प्रवास एक बायको ते एक आई असा होत जातो. ह्या सगळ्या भूमिकांमधून जाताना तिला आपलं स्वकर्तुत्व हि सिद्ध करावं लागत असते किंवा ते करण्याचं शिवधनुष्य ती पेलत असते. एका घरातून निघून दुसऱ्या घरात जाऊन स्वतःला तिकडे सिद्ध आणि त्या वातावरणात मिसळून घेणं तस सोप्प कधीच नसतं. आपली माणसं कधी परकी होतात किंवा लांब होतात अचानक आयुष्याच्या एका टप्प्यावर आलेल्या नवीन माणसांना आपलं मानून त्यांच्याशी एकरूप व्हावंच लागतं. ह्या सगळ्या बदलांचा परिणाम अथवा त्यांची व्याप्ती हि फक्त सामाजिक, शारीरिक इथवर नसून त्याचे परिणाम भावनिक आणि मानसिक पातळीवर हि खूप बदल करतात.

पुरुषाचा प्रवास तसा सोप्पा असतो. एक मुलगा ते एक बाप असा त्याचा प्रवास होत असला तरी त्याचं घर ते त्याची माणसं तशीच राहतात. शारीरिक बदल होत असले आणि त्याच्या वैचारिक संरचनेत अनेक बदल झाले तरी पुरुष हा शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीवर तसा फारसा बदलत नाही. ह्याला करणे अनेक आहेत. स्त्री मात्र शारीरिक आणि मानसिक पातळीवर प्रचंड बदलांना सामोरी जाते. अगदी मासिक पाळी सुरु होण्यापासून ते मातृत्वाची चाहूल लागल्यावर किंवा ते अनुभवल्यावर हि मोनोपॉज येई पर्यंत स्त्री च्या शरीरातील हार्मोन्स आणि मानसिक पातळीवर ह्या सगळ्याचा परिणाम प्रचंड होत असतो.

सुरवातीचे बदल मानसिक पातळीवर तितके जाणवत नाहीत कारण आयुष्यात अनेक रंग दिसत असतात. तारुण्याची आणि यौवनाची चाहूल लागलेली असते. पण आयुष्याच्या एका टप्प्यानंतर तिने सगळं अनुभवलेलं असत. मग अगदी ते शारीरक संबंध असो वा मातृत्व असो. जेव्हा आयुष्याचा उत्तरार्ध सुरु होतो तेव्हा मग ती तिच्यातल्या “ती” ला शोधायला निघते. आधीच्या आयुष्यात कधी कोणाच्या तरी सांगण्यावरून तर कधी सामाजिक बंधन म्हणून तर कधी असह्यतेने तर कधी जोशात निर्णय घेताना आपल्या इच्छांचा विचार खूप कमी वेळा ती करते. अनेकदा केला तरी त्या इच्छा कोणाच्या तरी पुढे दबल्या जातात. कधी घर, कधी नोकरी, कधी बायको तर कधी आई म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना आकाशात मोकळेपणे उडण्याच्या तिच्या महत्वकांक्षेला तिने स्वतःहून तर कधी अजून कोणीतरी तिलांजली दिलेली असते. पण ह्या सगळ्या गडबडीत तिच्यातली “ती” मात्र आत कुठेतरी गपचूप असते.

आयुष्याची पन्नाशी समोर आली कि ह्या टप्प्यावर सगळ्या बदलातून ती गेलेली असते. आता शेवटचा बदल हि हाकेच्या अंतरावर असतो. अश्या वेळी होणारे शारीरिक बदल म्हणजेच हॉरमनल चेंजेस मानसिक पातळीवर जास्ती प्रभावाने दिसून येतात. स्त्री आधीपासून भावनिक पातळीवर पुरुषापेक्षा एक पायरी वर असली तरी ह्या वयात तिची गरज अजून वाढते. पण तिच्यासोबत असणारा तिचा पुरुष तिकडेच असतो. कारण पुरुषाची भूक तीच असते न त्याच्या शाररीक परीस्थितीत कोणते बदल झालेले असतात. त्याचवेळी स्त्री ला अडकवून ठेवणाऱ्या बंधनातून पण ती बहुतांश मुक्त झालेली असते. मुलं मोठी झालेली असतात. करियर, नोकरी व्यवस्थित चालू असते. घराला घरपण मिळालेलं असतं पण त्याचवेळी इतके वर्ष दबलेली तिच्यातली “ती” मात्र शोधत असते तिचं आकाश.

मोनोपॉज सारख्या बदलात स्त्रीची मानसिक गरज प्रचंड वाढते. कुठेतरी वाटणारा एकटेपणा आणि सगळं असून सुद्धा काहीच नसल्याची भावना ह्या काळात खूप असते. अनेक इच्छा आयुष्याच्या प्रवासात दबलेल्या असतात. आता त्या खुणवत असतात. मग ते अगदी काहीही असू शकते. अगदी सायकल चालवण्यापासून ते नाटकात काम करे पर्यंत किंवा समुद्राच्या पाण्यात खोलवर जाण्यापासून ते एवरेस्ट शिखर आपलंस करण्या पर्यंत. खूप अभावाने खूप कमी स्त्रीया तिच्यातील त्या “ती” ला ओळखतात आणि त्या इच्छा पूर्ण करतात. इच्छा किंवा महत्वाकांक्षा ह्या मोठ्या असतात असं पण काही नसतं. अगदी कोणी शांतपणे आपल्याला ऐकून घ्यावं ते मोगऱ्याचा गजरा एकदा आपल्याला कोणीतरी माळून द्यावा इतकी माफक अपेक्षा पण त्या “ती” ची असू शकते.

खूप कमी पुरुष ह्या बदलांना समजून घेतात किंबहुना अनेक स्त्रियांना जिकडे हे खूप कमी वेळा समजते तिकडे पुरुषाबद्दल न बोललेलं बर. अनेकदा समजून पण तसं कोणी मिळणं हे हि महत्वाचं असतं. कारण इतके वर्ष सोबत राहून अंगवळणी पडलेल्या स्वभावासोबत हे सगळ शेअर करणं नकोस होतं. तर नवीन कोणासोबत हे सांगण म्हणजे दोन कड्यांवरून बोलण करणं कारण स्त्री जिकडे भावनिक आधार शोधते तिकडे पुरुष गादीवर जाऊन पोचलेला असतो. त्यामुळे ह्या सगळ्या अवस्थेत पुन्हा एकदा तिच्यातल्या “ती” ला आत दबून टाकताना त्याचे परिणाम मात्र बाहेर दिसून येतात. कारण वय झालेलं तर असतेच पण जबाबदाऱ्या पूर्ण केल्यावर पण आपलं आकाश न मिळाल्याची टोचणी जास्त खोलवर रुतते.

तिच्यातली “ती” हि एक फेज आहे. कोणाच्या आयुष्यात लवकर येते तर कोणाच्या आयुष्यात उशिरा पण येते मात्र नक्की. आपलं आकाश शोधायचं कि लपवायचं हे जिचं तिने ठरवायचं आणि ते हि कोणासोबत. कारण चांगल्या वाईट च्या सामाजिक कल्पना जितक्या सापेक्ष आहेत तितक्याच पुरुष सत्ताक सामाजिक बंधनावर बसवलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे निर्णय हि तिने घ्यायला हवेत. सगळेच पुरुष गादीवर पोहचतात आणि सगळ्याच स्त्रिया भावनिक असतात असं अजिबात नाही. अपवाद हे सगळीकडे असतात आणि असतील पण एकूणच स्त्री आणि पुरुष ह्यांची जडणघडण लक्षात घेता ह्या मधली रेषा धूसर असते हे नक्की. तिच्यातली “ती” माझ्यामते एक सुंदर वेळ असते जेव्हा आपल्याला मनापासून वाटणाऱ्या किंवा खरंच जाणवणाऱ्या गोष्टींना जगण्याची. शेवटी म्हणतात तस आयुष्य जगता यायला हवं. किती क्षण जगले ह्यापेक्षा किती क्षण तुम्ही त्याला जोडले ह्यावर ते आनंदी आणि समाधानी होते. स्त्री च्या बाबतीत तिच्यातली “ती” ला अनुभवण म्हणजे एक सर्वोच्च समाधानाचा आनंद घेणं.

वाचण्यासारखे आणखी काही…..

अनंताकडून अनंताकडे…
जाणीव
अनपेक्षित

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय