प्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध?

कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून रुही आणि अर्णव यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली.

खरं तर दोघांनाही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताच स्वार्थ नव्हता.

त्या दोघांना नुसतं भेटणं, एकत्र राहणं, बोलणं खूप छान वाटायचं.

याच पद्धतीने त्यांचं पदवीं शिक्षण एकत्र पूर्ण झालं.

दोघांचं कॉलेज आणि क्लास ही एकच असल्यामुळे ते एकत्र यायचे जायचे.

यानंतर दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी लागली आणि काही दिवसांनी रुहीचं लग्नंही ठरलं.

रुहीनं ही गोष्ट अर्णवला फोनवर सांगितली.

रुही आणि अर्णव या दोघांना एकमेकांविषयी प्रेम होतं, जिव्हाळा होता पण ही निस्वार्थी भावना होती.

त्यामुळेच आजही ती दोघं एकमेकांचे जिवलग मित्र आहेत.

कसं आहे ना, “प्रेम” ही जीवनातल्या सुखद भावनांपैकी एक आहे.

ज्याच्या प्रेमात तुम्ही पडलेले असता त्या जोडीदाराकडून तुम्हाला काय हवं असतं?

आकर्षण असतं, इच्छा असतात, प्रणय, विवाह, घर, कुटुंब आणि बरंच काही हवं असतं.

पण मित्रांनो, तुम्ही कधी अशी नाती पाहिली आहेत का? असं प्रेम पाहिले आहे का? ज्यात खोल आसक्ती, निस्वार्थीपणा, अतूट विश्वास, समजूतदारपणा, प्रामाणिकपणा याच भावना असतात त्यात नावालाही स्वार्थ नसतो.

महान तत्वज्ञानी प्लेटो यांच्या नावानं जे प्रेम ओळखलं असं जातं ‘हे’ प्लॅटोनिक प्रेम, निस्वार्थी आहे.

सोप्या शब्दात सांगायचं तर त्याला अपरिचित प्रेम म्हणतात.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, ही भावना व्यक्त करणं खूप कठीण आहे.

याला फक्त आकर्षण म्हणता येणार नाही, कारण आकर्षण कालांतराने कमी होत जातं.

“नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, सा-याच चांदण्यांची जगतास जाण नाही”

कुसुमाग्रज यांच्या या ओळी या प्लॅटोनिक प्रेमाचं यथार्थ वर्णन करतात.

ज्याला कोणतं ही नाव देता येणार नाही असं हे प्लॅटोनिक प्रेम तुमच्या मधुर आठवणींमध्ये वसतं.

हे नेमकं कोणत्या प्रकारचे नातं हे समजणं कठीण आहे?

या प्रेमाची ठळक ओळख म्हणजे हे प्रेम कधीच आटत नाही, ते फक्त वाढत राहतं.

प्रणय आणि वासनेपासून दूर असलेलं हे नातं.

मित्रांनो, आपल्या भारताचं राष्ट्रगीत लिहिणारे तत्वज्ञ, कवी, आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा प्रेमावर अनेक काव्यं लिहिली.

त्यांच्या विपुल काव्यातील एक प्रसिद्ध रचना म्हणजे गीतांजली.

१९१४ मध्ये, अर्जेंटिनातील एका मुलीने फ्रेंचमध्ये त्यांचं हे काव्य वाचलं.

ही मुलगी म्हणजे २५ वर्षीय प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका व्हिक्टोरिया ओकॅम्पो, जी या कविता वाचून रविंद्रनाथ टागोरांच्या कवितांची निस्सीम चाहती झाली.

साधारण १० वर्षांनंतर, १९२४ मध्ये, पेरू या देशाला भेट देत असताना रविंद्रनाथ टागोर आजारी पडले.

त्यांना ब्यूनस आयर्समध्ये राहावं लागलं.

त्यावेळी अनेक भाषांमधील तज्ञ असलेल्या ओकॅम्पो यांची रविंद्रनाथ टागोरांशी भेट झाली.

त्यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन रविंद्रनाथ टागोरांनी त्यांना आपलं प्रेरणास्थान मानलं.

टागोर आणि ओकॅम्पो यांच्यातल्या विशुद्ध आणि अतुलनीय प्रेमाला प्लेटोनिक प्रेम म्हणता येईल.

विद्वानांनी याचं वर्णन करताना बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रेम असं म्हटलं आहे.

रविंद्रनाथ टागोर ओकॅम्पोमुळे इतके प्रभावित झाले होते की त्यांनी काही कविता ओकॅम्पोला समर्पित केल्या.

त्यांच्या या कलाकृती पूर्वी नावानं प्रकाशित झाल्या.

मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की रविंद्रनाथ टागोर त्यांच्या आयुष्यात फक्त दोनदाच ओकॅम्पोला भेटले.

दोघांची दुसरी आणि शेवटची भेट १९३० साली झाली.

मात्र रविंद्रनाथ टागोर हयात असेपर्यंत दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरूच होता.

ते ओकॅम्पोला प्रेमाने विजया म्हणत.

दोघांच्या पत्रांतून त्यांच्या बौद्धिक प्रेमाची आणि नात्याची स्पष्ट झलक मिळते.

शारीरिक आकर्षणापासून दूर असलेल्या दोघांची ही पूर्णपणे आध्यात्मिक असणारी भावना ही दोन भिन्न देश आणि संस्कृतींमधील एक उदाहरण आहे.

प्लॅटोनिक प्रेमाचं आणखी एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध कादंबरीकार बिमल मित्रा यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित १९६२ साली आलेला “साहब, बीबी और गुलाम” हा चित्रपट.

जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा.

या चित्रपटात जमीनदाराच्या घरातील धाकटी सून जिला छोटी बहूचं म्हटलेलं आहे (मीना कुमारी) आणि भूतनाथ (गुरुदत्त) यांच्यातही असेच नातं आहे, ज्यामध्ये शरीरापलीकडे असलेलं आध्यात्मिक प्रेम दिसतं.

या चित्रपटात एका दृश्यात नशेच्या आहारी गेलेल्या छोटी बहूच्या हातून दारुचा ग्लास हिसकावताना भूतनाथचा तिच्या हाताला स्पर्श होतो आणि तिला धक्का बसतो.

परस्त्रीच्या हाताला स्पर्श का केला यासाठी ती त्याची खरडपट्टी काढते! याला प्लॅटोनिक प्रेम असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

प्लॅटोनिक प्रेम हे लैंगिक किंवा शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेले अनैतिक संबंध नाहीत.

त्यात अजिबात स्वार्थ नसतो, नफा-तोट्याचा विचार ही नसतो.

फक्त एकमेकांच्या प्रगती, विकास आणि चांगल्या भविष्यासाठी मनापासून येणाऱ्या शुभेच्छा असतात.

हे प्रेम निरागस आणि निष्कलंक आहे.
सध्याच्या काळात आपल्या समाजाला हे प्रेम समजत नाही.

प्लॅटोनिक प्रेमात जगणा-यांनासुद्धा याची जाणीव नसते.

अनैतिक संबंधांच्या गर्दीत, जेव्हा प्लॅटोनिक प्रेमाला सामान्य प्रेम असं हिणवलं जातं तेंव्हा नातेसंबंध तुटायला लागतात.

वास्तविक ही सुंदर निस्वार्थी भावना कोणाच्याही मनात केंव्हाही जन्माला येऊ शकते.

ज्या विषयी तुमच्या मनात प्रेम आदर निर्माण होतो ती व्यक्ती तुमची नातेवाईक किंवा मित्र असू शकते.

कदाचित जिच्याविषयी ममत्व वाटतं ती व्यक्ती ओळखीची किंवा काहीवेळेला अनोळखी व्यक्ती ही असू शकते.

मित्रांनो, तुम्हाला फक्त ही अलौकिक भावना ओळखता आली पाहिजे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “प्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय