नवरात्र, दसरा, कोजागिरी आणि आपले आरोग्य – शरद ऋतु आणि आपले आरोग्य

पावसाळा संपला की हळूहळू दिवसा उन्हाचा चटका जाणवतो आणि रात्री मात्र गारवा!!! शारदीय नवरात्रौत्सव घेऊन येणारा हाच तो शरद ऋतु.

साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा पाऊस पडतो, आकाश स्वच्छ, निळे दिसू लागते.

पावसाळी पिके तयार होऊन कापणीचे दिवस येतात. तलावांमध्ये कमळे फुलतात, रात्री आकाश निरभ्र, चांदण्यांनी भरलेले असते आणि गार वारा मन प्रसन्न करतो.

या ऋतुमध्ये कोणता आहार घ्यावा, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती या लेखातून खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.

सण आणि आरोग्य

नवरात्र, दसरा, कोजागरी पौर्णिमा हे या ऋतुमधले सण. परंपरेनुसार प्रत्येक सणाला आहारात सुद्धा सुयोग्य असा बदल केलेला दिसतो.

पावसाळ्यात भूक कमी लागते, शरीरात वाताचे प्रमाण वाढते. पित्त साठून रहाते. त्यामुळे पचनसंस्था नाजूक झालेली असते.

म्हणून पावसाळ्या नंतर येणाऱ्या शरदाच्या सुरुवातीला नवरात्रात उपवास केले जातात. अर्थातच पचायला हलके पदार्थ, गरम पाणी, या सिझन मध्ये मिळणारी फळे खाऊन उपवास करतात.

त्यामुळे साठलेले दोष निघून जातात आणि पुन्हा शरीर कार्यक्षम होते.
यानंतर येणारा दसरा सण आणि श्रीखंड यांचे अतूट नाते आहे.

दह्यापासून चक्का आणि त्यात साखर, वेलची जायफळ, केशर मिसळून श्रीखंड तयार होते.

श्रीखंड शास्त्रोक्त पद्धतीने बनवायचे तर खडीसाखर वापरावी. हे श्रीखंड मधुर, पित्तशामक, तोंडाला चव आणणारे असे आहे.

चक्का घोटण्याच्या प्रक्रियेत त्याच्यावर जे संस्कार होतात त्यामुळे जायफळाचे गुणधर्म वाढतात.

श्रीखंड मेधाशक्ती वाढवणारे म्हणजे बुद्धी वाढवणारे आहे. आधुनिक शास्त्रानुसार यात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन C असल्यामुळे हाडांना मजबूत बनवते. प्रतिकारशक्ती वाढवते. आतड्यातील उपयोगी बॅक्टेरीया वाढवते.

प्रोबायोटिक, मूड स्विंग मध्ये उपयुक्त आहे. ताजे श्रीखंड सहा तासांच्या आत संपवावे नाहीतर त्याचे गुणधर्म बदलतात.

नंतर येते कोजागरी पौर्णिमा. हिला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. शरदाचे चांदणे कवींनी वर्णन करून सांगितले आहे. हे चांदणे शीतल, प्रसन्न असते.

रात्रीच्या पहिल्या प्रहरी चंद्राच्या शीतल प्रकाशात बसून आप्तपरिवारा सहीत आटवलेले दूध प्राशन करावे. हे दूध मातीच्या मडक्यात मंद आचेवर आटवावे.

त्यात मनुका, काजू, बदाम, देशी गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात.

चंद्रप्रकाशात हे पूर्ण थंड होऊ द्यावे. म्हणजे ते शीत गुणाचे होते. या दुधाचा फायदा पित्त विकार, रक्ताचे विकार आणि त्वचारोग यात होतो.

मनाला आनंद देणारे, तणाव दूर करणारे असे याचे गुण सांगितले आहेत. चंद्र हा मनाचा कारक आहे.

कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो. म्हणून चंद्राचे शीत, आल्हादक हे गुण आटवलेल्या दुधात उतरतात आणि ते औषधी गुणधर्म युक्त होते. आता काही ठिकाणी कोजागरी पार्टी समोसा, वडा, पावभाजी आणि त्यासोबत आटवलेले दूध अशी केली जाते.

म्हणजे पित्तशमन हा उद्देश बाजूलाच राहिला उलट ॲसिडिटी होण्याची हमखास खात्री !!! म्हणून आपले सण, परंपरा यांचे शरीर शास्त्रानुसार काय महत्व आहे हे नीट समजून घेणे गरजेचे आहे.

नवान्न पौर्णिमा ही कोजागरी नंतरच्या दिवशी साजरी करतात. हा सण कृषीसंस्कृतीची महती सांगतो.

शेतातील तयार झालेले नवीन धान्य तूर, ज्वारी इत्यादी यांचे धान शेतकरी घरी आणतात.

दरवाजावर या नवीन धान्याच्या ओंब्या बांधतात. याला “नवे बांधणे” असेही म्हणतात. याच धान्याचे चार पाच दाणे वरण, भात, भाजी, नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थात टाकतात. गरीब, भुकेल्या लोकांना जेवू घालतात. अश्याप्रकारे नवीन धान्याचे उद्घाटन केले जाते.

पंचकर्म उपचार आणि शरद ऋतुत का करतात?

पंचकर्म चिकित्सा शरीराचे शुद्धीकरण करणारी आहे. आधुनिक शास्त्रात ज्याला डिटॉक्स म्हणतात ते सर्व फायदे पंचकर्म केले असता मिळतात.

शरद ऋतुत विरेचन आणि रक्तमोक्षण ही पंचकर्म चिकित्सा केली जाते. पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे पोट साफ होण्यासाठी दिलेले औषध आणि रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त शरीराबाहेर काढणे, याकरिता सिरावेधन म्हणजे नसांमधून अथवा जलौका म्हणजे जळू लावून उपचार करणे.

जळवा दूषित रक्त शोषून घेतात. सोरायसिस, इसब, गजकर्ण अश्या चिवट रोगांवर रक्तमोक्षण हा रामबाण इलाज आहे.

शरद ऋतुत आणि आहार कसा असावा?

या दिवसांतमधुर, हलका आहार घ्यावा. दूध, मनुका, डाळींब, गोड ताक, खडीसाखर, मूगडाळ, पडवळ, भेंडी, घोसाळे, दुधी भोपळा, कोहळा, काकडी, मडक्यातील थंड पाणी असा साधा आहार घ्यावा.

या दिवसात झेंडूच्या फुलांचा बहर असतो. झेंडूच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ते पाणी गाळून पिण्यासाठी वापरले असता आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून वाटतात ती आपट्याची पाने औषधी गुणधर्म युक्त आहेत.

पडजीभ, हृदयाचे स्नायू, अंगदुखी यावर उपयोगी आहेत. निसर्ग सुद्धा त्या त्या ऋतुंमध्ये उपयुक्त असे अन्नधान्य, फुले निर्माण करत असतो. आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे.

शरद ऋतूतील सणांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

शरद ऋतुतील सण हे देवीतत्त्वाचे पूजन करणारे आहेत. धान्यरुपात सृजनशक्ती, सरस्वती पूजन म्हणजे ज्ञानाची उपासना, कोजागरीच्या रात्री माता लक्ष्मी कोs जागरति म्हणजे कोण जागे आहे हे पहाते अशी धारणा आहे.

जागरण म्हणजे धांगडधिंगा करून निरुद्देश जागत बसणे नव्हे तर जागृत होणे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर सजग होणे असा याचा अर्थ आहे.

शरद ऋतुबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जरूर कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करा. जागरूक होऊन आपल्या तब्येतीची काळजी घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय