हि ६ दमदार पावले उचला आणि पर्सनल ब्रॅण्ड म्हणून उदयास या!

हल्ली “शार्क टॅंक इंडिया” या रियालिटी शो मुळे. व्यवसाय करणे, ब्रँड म्हणून उदयास येणे, याबद्दल सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.

पर्सनल ब्रॅण्ड म्हणजे काय?

पर्सनल ब्रॅण्ड म्हणजे तुमची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख!!!

तुमचे प्रॉडक्ट्स असोत की तुम्ही पुरवत असलेल्या सेवा पर्सनल ब्रॅण्ड मुळे इतर स्पर्धकांपेक्षा तुमचे स्वतंत्र अस्तित्व ग्राहकांपर्यंत अगदी ठळकपणे पोहोचते.

या लेखातून आम्ही तुम्हाला काही विशेष टिप्स देणार आहोत. तुमचा पर्सनल किंवा प्रोफेशनल ब्रॅण्ड बनवताना तुम्ही या टिप्स लक्षात घेऊन त्यानुसार ब्रॅण्डिंग केले तर तुमचा कस्टमर बेस तर वाढेलच पण तुमचे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व सतत लोकांच्या नजरेसमोर राहील.

पर्सनल ब्रॅण्ड बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

१. तुमचे उद्दिष्ट ठरवा

कोणताही ब्रॅण्ड हा त्या व्यवसायाचा किंवा त्या व्यक्तीचा आरसा असतो. ती तुमची ओळख असते. त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत कोणता संदेश पोहोचवायचा आहे हे नक्की ठरवा.

हा संदेश देण्याकरिता तुमचे ध्येय स्पष्ट असले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील उत्कृष्ट ज्ञान लोकांपर्यंत नेणार असाल तर तुमचा सेवा क्षेत्रातील व्यवसाय असेल किंवा तुमचा अनुभव तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा देणे किंवा नेतृत्व करणार असाल तर तुमचा प्रोफेशनल कोच हा ब्रॅण्डिंगचा प्रकार असेल.

२. पहिल्या नजरेत आकर्षित करणारा ब्रॅण्ड असावा

जी गोष्ट पहिल्या नजरेत डोळ्यात भरेल, त्याच गोष्टीकडे ग्राहक आकर्षित होतो. म्हणून तुमचा ब्रॅण्ड बनवताना डिझाईनवर बारीक लक्ष द्या.

तुमच्या सेवा किंवा प्रोडक्ट यांना मिळताजुळता रंग, अक्षरे आणि संदेश निवडा.

हे डिझाईन तात्पुरते लक्षात रहाणारे नको तर त्याचा प्रभाव दीर्घकाळ कस्टमरच्या मनात घर करून राहिला पाहिजे.

३. योग्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वापरा

सध्या सोशल मिडियाचे कित्येक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत पण त्यांचे यूजर्स सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे आहेत. यात विविध वयोगट, सामान्य जनता, प्रोफेशनल्स असे अनेक प्रकार दिसतात.

इंस्टाग्राम वर तरुण वयातील तर फेसबुक वर मध्यम किंवा प्रौढ व्यक्तींचा वावर जास्त प्रमाणात आढळतो. याचप्रमाणे लिंक्ड इन हा पूर्णतः व्यावसायिक/ प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे.

त्यामुळे आपला ग्राहक नेमका कोण याचा व्यवस्थित अभ्यास करून त्यानुसार तुम्ही जाहिरात केलीत तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट तर मिळतोच पण बाजारात टिकून रहाण्यासाठी उत्तेजनही मिळते.

सोशल मिडिया वर खूपच संधी उपलब्ध आहेत. तुमचा व्यवसाय किंवा सेवा यांची प्रचंड प्रगती होऊ शकते पण तुम्ही अचूकपणे प्लॅटफॉर्म निवडलात तरच!!!

४. प्रामाणिकपणा आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली

तुमच्या ब्रॅण्ड मधून तुमचे व्यक्तित्व लोकांसमोर येत असते. त्यामुळे कोणत्याही भूलथापा मारुन कायमस्वरूपी कस्टमर मिळत नाही आणि टिकतही नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा ही पहिली गरज आहे.

तुम्ही आपल्या व्यवसायाबद्दल जी माहिती लिहीता ती नुसतीच आकर्षक असून उपयोगाचे नाही तर जे लिहाल त्या क्वालिटी बाबत तुम्ही सजग असले पाहिजे.

सातत्याने आपल्या ब्रॅण्ड्ची
जाहिरात करत रहा. यामधून नक्कीच तुमचा ब्रॅण्ड उठून दिसेल आणि लोकप्रिय होईल.

५. नेटवर्क असणे महत्त्वाचे

तुमच्या समव्यावसायिक अथवा तुमच्या क्षेत्रातील इतरांशी तुमचा संवाद असला पाहिजे. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील नवीन संधी, टेक्नॉलॉजी यांचे ज्ञान मिळते.

एकमेकांच्या अनुभवातून खूप काही शिकता येते. तुमचे ज्ञान इतरांशी शेअर करता येते. तुम्ही आपले मत, अनुभव कमेंट्स द्वारे सातत्याने मांडत राहिलात तर तुम्ही सतत लोकांच्या नजरेसमोर रहाता आणि संवादात भाग घेतल्यामुळे तुम्ही व्यवसायाबाबत गंभीर आहात, ॲक्टीव्ह आहात हे समजते आणि इतर व्यक्ती तुमच्या ब्रॅण्डला महत्त्व देतात.

एकाकी राहून आपली प्रगती होऊ शकत नाही म्हणून नेहमी कनेक्टेड रहा.

६. नवीन ट्रेंड्स ओळखून आपलेसे करा

तुमच्या क्षेत्रातील नवनवीन घडामोडी माहीत करून घ्या. व त्यानुसार आपल्या कंटेंट मधून आवश्यक ती माहिती अपडेट करा. ऑनलाईन जगात स्पीड म्हणजे वेग फार महत्त्वाचा आहे.

त्या वेगाशी जुळवून घेवून तुम्ही पावले टाकलीत तरच यशस्वी व्हाल. म्हणून नियमित वाचन, निरनिराळ्या सेमिनारमध्ये सहभाग घेणे खूप गरजेचे आहे.

नवीन प्रयोग करणे आणि त्याचे रिझल्ट्स तपासून पाहणे हे वेळोवेळी केले पाहिजे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही रिजीड न होता दृष्टीकोन व्यापक ठेवला तर नवीन ट्रेंड आपलासा करणे सहज शक्य होईल. सतत स्वतःला बदलत्या काळाशी जोडून ठेवणारा ब्रॅण्ड काळाच्या ओघात टिकून रहातो.

पर्सनल ब्रॅण्ड बनवणे ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. त्यासाठी नियमितपणे, प्रामाणिक प्रयत्न करावेच लागतात. ग्राहकांचा विश्वास जिंकणे हा एक मोठा प्रवास आहे.

आणि त्या प्रवासातील प्रत्येक पाऊल समजून उमजून टाकले पाहिजे. असे सजगतेने टाकलेले एक एक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच घेऊन जाईल.

तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कष्टाचा असला तरी अपार समाधान देणारा असेल कारण तुमचा ब्रॅण्ड ही तुमची ओळख बनून ग्राहकांच्या मनावर राज्य करेल!!!

पर्सनल ब्रॅण्ड बनवताना या सूचना किंवा छोट्या टिप्स नक्कीच ध्यानात ठेवा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करा.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय