नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग २ (How to find good Shares)

लेखाचा पहिला भाग.

आ. लिक्विडिटी रेशो:

नजीकच्या काळात अपेक्षित असलेली अल्प आणि दीर्घ मुदतीची देणी देण्याची क्षमता म्हणजे लिक्विडिटी यामुळे कंपनी आर्थिकदृष्टा किती सक्षम आहे ते समजते.

१. करंट रेशो: हे गुणोत्तर मालमत्तेला (current asset)देणीनी (current liabilities) भागून मिळते. मालमत्तेमधे रोख रक्कम, रोख्यातिल गुंतवणूक, शिल्लक कच्चा माल, उत्पादित माल, विविध येणी आणि उचल इत्यादी. तर करंट लियाबलिटीमधे घेतलेली कर्जे, आगाऊ रकमा व्यावसायिक देणी आणि अपेक्षित खर्चाची तरतूद इत्यादी. थोडक्यात येणे भागिले देणे. जर अॅसेट हे लियबलिटीचे दुप्पट असणे ही एक आदर्श व्यवस्था मानली जाते. जर हा रेशो २ हून बराच अधिक असेल कंपनीचे अॅसेट पुरेशा प्रमाणात बापरले जात नाहित असा याचा अर्थ होतो तर जर हा रेशो 1हून कमी असेल तर भविष्यात कंपनी वर मोठे आर्थिक संकट येवू शकते.
२. क्विक रेशो: हा ही एक करंट रेशोच असतो मात्र यात कच्चा माल धरला जात नाही जाचे तात्काळ रोखीकरण होवू शकते तेवढ्या मालमत्ता यात धरल्या जातात. या मुळे अल्प काळातील देणी देण्याची तयारी समजते. हा रेशो १ किंवा त्याहून अधिक असणे चांगले तर १ हून कमी असणे चिंताजनक असते. या रेशोस अॅसीड टेस्ट रेशो असेही दूसरे नाव आहे.

Circuit-filter-breaker

इ. सॉल्व्हन्सी रेशो :

या रेशोमुळे कंपनीने घेतलेल्या विविध कर्जामुळे ती दिवाळखोरीच्या मार्गावर तर नाहीना हे समजते.

१. डेबिट ईक्विटी रेशो : हा रेशो काढताना कंपनीची सर्व कर्जाना भांडवलाने भागले जाते. हा तेशो कमीत कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे.
२. डेब्ट अॅसेट रेशो : हा रेशो काढताना सर्व कर्जाला भांडवल आणि गंगाजळी या मालमत्तेने भागले जाते. कर्जाहुन मालमत्ता जास्त असेल तर कंपनी चांगली आहे म्हणू शकतो.

ई. कव्हरेज रेशो:

कंपनीची आर्थिक स्थिति यावरून समजते.

१. इंटरेस्ट कव्हरेज रेशो: व्याज आणि विविध कर देण्यापूर्वीच्या उत्पन्नात घसारा मिळवून त्यांस व्याजाने भागून हे गुणोत्तर मिळते जर हा रेशो छोटा असेल तर व्याज भरण्यासाठी कंपनीला अडचण येवू शकते. ह्या रेशोची तुलना गेल्या वर्षीच्या रेशोशी केली जाते .त्यावरुन कंपनीची आर्थिक स्थिति कशी आहे ती मागच्या वर्षाच्या तुलनेने बिघडली की सुधारली ते समजते.
२. डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो: निव्वळ नफ्यात घसारा, व्याज आणि कर यांची रक्कम मिळवून त्यांस कर्जफेडिची मूद्दल आणि व्याज यांच्या बेरजेने रकमेने भागले हा रेशो मिळतो हा रेशो लक्षात घेताना मागील कामगिरीचा विचार करतात हा रेशो कमी असल्यास कंपनी डबघाईस जाण्याची शक्यता असते.
३. डिव्हीडंड कव्हरेज रेशो: कंपनीच्या प्रेफरन्स शेअरच्या डिव्हिडंड रकमेने करपश्चात नफ्यास भागले की हा रेशो मिळतो. हा रेशो जेवढा मोठा तेवढी कंपनी सुधृढ समजली जाते.

उ. प्रोफिटेबिलिटी रेशो :

कंपनीला होणारा फायदा या रेशोमुळे अधिक चांगल्या रीतींने समजुन येतो .

१. ग्रॉस /नेट /ऑपरेटिंग प्रॉफिट मर्जीन रेशो : निव्वळ उत्पादन खर्चास निव्वळ विक्रिने भागून ग्रॉस प्रॉफिट मर्जीन रेशो तर करपश्चात नफ्यास निव्वळ विक्रिने भागून नेट प्रॉफिट मर्जीन रेशो मिळतात. ऑपरेटिंग प्रॉफिट मर्जीनला निव्वळ नफ्याने भागून ओपेरेटिंग प्रॉफिट मार्जीन रेशो मिळतो त्यांस १०० ने गुणले असता % मिळते. ऑपरेटिंग प्रॉफिट काढताना कर, घसारा व्याज ही रक्कम वजा करण्यापुर्वीची रक्कम धरण्यात येते. या सर्व रेशोंची तुलना मागील वर्षाशी करण्यात येते .
२. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड आणि रिटर्न ऑन नेट्वर्थ : घसारा व्याज आणि कर वजा न करीता निव्वळ उलाढालीस स्थिर मालमत्ता आणि भांडवल यांच्या बेरजेने भागले असता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड हा रेशो मिळेल करोत्तर नफ्यास भांडवल गंगाजळीच्या बेरजेतून संचित तोटा वजा करून भागले असता रिटर्न ऑन नेटवर्थ हा रेशो मिळतो. येणाऱ्या रेशोस १०० ने गुणले की %मधे रेशो मिळतो. हे रेशो मागील वर्षाशी तुलना करून जेवढे अधिक असतील तेवढे चांगले.

लेखाचा पुढील भाग वाचा.

शेअर मार्केटचा मराठीतून अभ्यास करण्यासाठी वाचाशेअर मार्केटची सूत्रे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग २ (How to find good Shares)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय