रस्त्यावर गाडी चालवताना अपघात होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी.

गाडी चालवताना अपघात होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रवासाला निघाला आहात? आपला प्रवास सुरक्षित व्हावा अशी साहजिकच सर्वांचीच इच्छा असते. म्हणूनच गाडी चालवताना अपघात होऊ नये यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.

Samriddhi Highway Accident | गेल्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांमुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या अपघातांमध्ये सिनेसृष्टीतील काही नामवंत नट नट्यांचे दुःखद निधन झाले होते हे देखील अजून आपण विसरलेलो नाही.

अशा प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेल्या अत्याधुनिक महामार्गांवर होणारे अपघात ही त्या महामार्गांचीच चूक आहे का? याबाबतीत सजग नागरिक म्हणून आपले सर्वांचे काहीच कर्तव्य नाही का? नेमके काय ते आपण पाहूया.

सर्वांच्या सोयीसाठी बांधलेल्या आधुनिक महामार्गांवर जेव्हा असे अपघात होतात तेव्हा त्या मागची कारणे जाणून घेणे गरजेचे बनते.

मागच्या आठवड्यात झालेला अपघात किंवा वारंवार होणारे असे महामार्गावरील अपघात का होतात याची तांत्रिक बाजू तर महामार्ग बनवणारे तंत्रज्ञ आणि सरकार जाणून घेतीलच आणि त्यानुसार दुरुस्ती ही करतील.

परंतु कोणताही अपघात होताना ती काही केवळ रस्त्याची चूक नसते. गाडी चालवणाऱ्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती, गाडीची स्थिती अशा अनेक गोष्टी अपघाताशी निगडित असू शकतात.

आज आपण महामार्गावर अपघात का होतात आणि असे अपघात होऊ नयेत यासाठी नेमके काय करता येईल हे जाणून घेणार आहोत.

महामार्गावर अपघात होण्याची कारणे

१. अपेक्षित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे.

बहुतांश वेळा प्रवासाला निघाले की लोकांना प्रवास लवकरात लवकर संपवण्याची घाई होते. अशावेळी महामार्ग मोकळा दिसला की सहाजिकच वेगाने गाडी चालवली जाते. परंतु सगळ्याच महामार्गांवर कोणत्या गाडीने किती वेगाने जाणे अपेक्षित आहे याचे काही नियम लिहिलेले असतात. त्या नियमांचे पालन न करता अपेक्षित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवली की गाडीवरचा कंट्रोल सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे नियंत्रित करता येईल इतक्या वेगानेच गाडी चालवावी.

२. गाडीची कंडीशन चांगली नसणे.

खूप लोकांना फक्त वेगाने गाडी दामटवणे माहीत असते परंतु गाडी वेळोवेळी सर्विसिंग करणे, टायर मधील हवा चेक करणे, आवश्यकतेनुसार गाडीचे पार्टस बदलणे अशा गोष्टी लोक करत नाहीत. त्यामागे कशाला गाडीवर खर्च करायचा अशी देखील मानसिकता असू शकते. परंतु आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासाला घेऊन जाणारी गाडी ही चांगल्या कंडिशन मध्ये असणे अतिशय आवश्यक असते. बरेच अपघात हे गाडीची कंडीशन विशेषतः टायरची कंडीशन चांगली नसल्यामुळे टायर फुटून होऊ शकतात. आपण चालवणार असलेल्या गाडीची कंडिशन चांगली आहे ना हे तपासणे हे प्रत्येक ड्रायवरचे कर्तव्य आहे.

३. गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करणे.

फक्त सार्वजनिकच नव्हे तर खाजगी गाड्यांमध्ये सुद्धा गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून प्रवास करण्याकडे लोकांचा कल असतो. चार किंवा पाच सीटर गाडीमध्ये सहजपणे सात ते आठ लोक भरून लोक प्रवास करतात. किंवा लक्झरी बसमध्ये भरपूर प्रवासी आणि त्यांचे भरपूर सामान, शिवाय इतरही इकडून तिकडे पोहोचवण्याचे सामान असा गाडीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त लोड भरलेला असतो. असे करण्यामुळे ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटून अपघात होऊ शकतो. तसेच प्रवासी संख्या जास्त असल्यामुळे अपघातग्रस्त गाडीतून लोकांना सहजपणे बाहेर पडता येत नाही. ते अडकून पडतात. असे करणे टाळून गाडीत क्षमतेईतकेच प्रवासी भरुन प्रवास करावा.

४. ड्रायव्हरची शारीरिक आणि / अथवा मानसिक स्थिती ठीक नसणे.

रस्त्यावरील अपघातांचे ड्रायव्हरला झोप लागणे हे एक प्रमुख कारण आहे. सार्वजनिक वाहतूक असो अथवा खाजगी वाहतूक असो गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची नीट झोप झालेली असणे, ती व्यक्ती ताजीतवानी असणे, गाडी चालवणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारे आजारी नसणे, तसेच त्या व्यक्तीने मद्यपान केलेले नसणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. काही ड्रायव्हर्स सलग अनेक अनेक तास ड्रायव्हिंग करतात. त्याचे त्यांना भूषण वाटत असते. परंतु शरीराला विश्रांतीची गरज ही असतेच. त्यामुळे गाडी चालवत असताना काही क्षणासाठी का होईना झोप लागून क्षणार्धात अपघात होऊ शकतो. त्याचप्रमाणे मध्यरात्रीचे ड्रायव्हिंग टाळणे श्रेयस्कर असते कारण सगळ्याच लोकांना मध्यरात्री साधारण एक ते चार ह्या वेळात निश्चितपणे झोप येते. ही आपल्या सर्वांची गाढ झोपेची वेळ असते. त्यामुळे ह्या वेळात प्रवास केल्यास ड्रायव्हरला पेंग येण्याची किंवा झोप लागण्याची शक्यता खूप जास्त असते.

त्याचप्रमाणे ड्रायव्हरची मानसिक स्थिती देखील उत्तम असणे आवश्यक असते. कारण माथेफिरू ड्रायव्हरने विचित्र पद्धतीने गाड्या चालवून अपघात घडल्याच्या अनेक घटना जगभरात घडलेल्या आहेत.

५. लांबलचक रस्त्यावर ड्रायव्हरला संमोहन होणे.

रोड हिप्नोसिस road hypnosis किंवा रस्ता संमोहन ही एक संकल्पना सध्या आढळून येत आहे. लांब पल्ल्याचे महामार्ग जेव्हा बांधले जातात तेव्हा सहाजिकच अनेकानेक किलोमीटर लांब सरळसोट रस्ता बांधलेला असतो. अशावेळी एका ठराविक गतीने गाडी चालवत असताना ड्रायव्हरला हिप्नोसिस होण्याची शक्यता असते. म्हणजेच त्याला किंवा तिला एक प्रकारची गुंगी येऊन गाडीवरील कंट्रोल सुटतो. आणि अपघात होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून लांब पल्ल्याच्या रस्त्यावर गाडी चालवताना वेग नियंत्रणात ठेवणे, दर दोन तासांनी पंधरा मिनिटांचा हॉल्ट घेणे, ड्रायव्हरने स्वतः आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने संपूर्ण वेळ जागरूक राहणे असे करणे गरजेचे असते.

तर ही आहेत अशी काही कारणे ज्यांच्यामुळे महामार्गावर अपघात होऊ शकतात.

दरवेळी अपघात झाल्यानंतर केवळ रस्त्याला, रस्ते बांधणीला दोष देऊन चालणार नाही. नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आपण ओळखली पाहिजे.

म्हणूनच प्रवासाला निघताना गाडीची कंडीशन उत्तम असली पाहिजे तसेच ड्रायव्हरची देखील शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असली पाहिजे ह्याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे जुन्या, खराब झालेल्या गाड्या वापरातून काढून टाकून उत्तम कंडिशन असलेल्या चांगल्या गाड्या वापरल्या पाहिजेत. लांबच्या प्रवासाला जाताना विनाकारण घाईने पोहोचण्याचा प्रयत्न न करता योग्य ते हॉल्ट घेऊन प्रवास करावा. इतरांशी विनाकारण स्पर्धा करून आपला व गाडीतील प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये.

अशी सर्व प्रकारची काळजी घेतली तर आपला प्रवास नक्कीच सुरक्षित आणि सुखकर होऊ शकेल.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसेच याविषयीची तुमची मते देखील कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “रस्त्यावर गाडी चालवताना अपघात होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी.”

  1. good inputs, there should be training provided at / near toll plaza before entering such roads 10- 15 minutes. so that repeated hammering will make changes

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय