पाल्यांचा Sexting चा विषय हाताळतांना….

“अहो, आमच्याशी संपर्कात राहावी म्हणून आम्हीच तिला स्मार्ट फोन दिला. पण त्यावर हि नकोनको ते मेसेजेस करते. परवा, सहज म्हणून ती नसताना तिचा फोन पहिला आणि ते वाचून मलाच कसंतरी झालं. १६ वर्षं हे काही वय आहे का हो अशा गोष्टींचं? “

हल्ली थोड्याफार फरकाने हि वाक्यं अनेक मुलांच्या आईवडिलांकडून ऐकायला मिळतात. आता प्रेमात पडणे ह्या गोष्टींच्या बरोबरीने Sexting चा प्रकारही झोप उडवणारा ठरतो आहे.

Sexting म्हणजे सोशल मेडिया, स्मार्ट फोन्स चा वापर करून लैंगिकदृष्ट्या उत्तेजक स्वत:चे फोटो पाठविणे (Naked/Half Naked) किंवा Chatting/Texting करणे.

हे असे फोटो शक्यतो Boyfriends ना किंवा Girlfriends ना, म्हणजेच प्रेमात पडून पाठवले जातात. भारतामध्ये जवळपास २१% मुलींकडून आणि ४२% मुलांकडून अशा फोटोसाठी मागणी केली जाते. जिज्ञासूंनी हे नक्की वाचावे👉 (Sexting culture fast catching up with Indian teens)

बहुतेक मुली नाराजीनेच फोटो पाठवतात. तेंव्हा ते नातं त्यांच्यासाठी आवश्यक असतं.

फ़क्त फोटो पाठवून काय होणार? असा एक भाबडा प्रश्न डोक्यात असतो. त्याचबरोबर आपल्या बॉयफ्रेंड वरती वेडा विश्वाससुद्धा असतो. नात्यातली involvement वाढविणे हाही एक हेतू असावा. नवीन काहीतरी करून पाहणे आणि परिणामांची पर्वा न करणे हेही sexting च्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

जेंव्हा Sexting चा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येतो, तेंव्हा खूप टोकाची भूमिका घेतली जाते. क्लास, शाळा बंद केली जाते. नाही-नाही ते बोलले जाते. त्याऐवजी, मुलं (मुलगा/ मुलगी) जेंव्हा स्मार्टफोन्स वापरायला सुरुवात करतात, तेंव्हा ह्याविषयांवर बोलणे. त्यांना धोके सांगणे. फोनचा वापर नियंत्रित करणे, मुख्य म्हणजे मुलांशी वागताना मोकळेपणा ठेवणे. फार आवश्यक ठरते. Sexting च्या पाठोपाठ अनेकदा, डिप्रेशन, काळजी किंवा मोबाईलचे व्यसन ह्या गोष्टी येतात त्यावेळी Counselor ची मदत घेणे फायद्याचे ठरते.

तरीही, मुलं चुकलीच तर मुलांना स्वीकारून,बाहेर पडायला मदत करणे आणि जगात कितीतरी सुंदर गोष्टी आहेत ह्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

वसुधा देशपांडे-कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, पुणे

वाचण्यासारखे आणखी काही…..

किरण बोरकर यांचा ब्लॉग
संगीत शेंबेकर यांचा ब्लॉग
वसुधा देशपांडे यांचा ब्लॉग

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय