रहस्य भाग-५ (बाहुबली) (Lord Gomteshwara)

बाहुबली हे नाव आज लहान मोठ्या सगळ्यांच्या मनात कोरलं गेलं आहे ते ह्या नावाच्या चित्रपटामुळे. बाहुबली ह्या चित्रपटाचं वादळ पहिल्यांदा २०१५ आणि नंतर २०१७ मध्ये आलं. पहिल्या भागात जवळपास ६५० कोटी आणि दुसऱ्या भागात १७९६ कोटी रुपये कमावणारा बाहुबली चित्रपट बघण्यासाठी तब्बल १०५ मिलियन तिकिटे विकली गेली होती. चित्रपटात दाखवला गेलेला आणि प्रत्यक्षातला बाहुबली ह्यांच्यात काहीही संबंध नसला तरी बाहुबली हे नाव भारतात अजरामर झालेलं आहे ते वेगळ्या कारणासाठी. कोण होता हा बाहुबली? जैन समुहाचे पहिले तीर्थंकर ऋषभंता ह्यांचा मुलगा बाहुबली होता. जैन ग्रंथाप्रमाणे बाहुबली अतिशय शूरवीर योद्धा होता. त्याने एक वर्ष कोणतीही हालचाल न करता चिंतन केलं. हे करत असताना त्याच्या अंगावर वेल सुद्धा चढले पण तो जागेवरून हलला नाही. एक वर्षानंतर त्याला सर्वज्ञता प्राप्त झाली. त्याच्या ह्याच चिंतनाच प्रतिक भारतात १००० वर्षापूर्वी उभारलं गेलं.

गोमटेश्वर (Lord Gomteshwara) ह्या नावाने उभा असलेला बाहुबली हाच जगातील सगळ्यात मोठा, ५७ फुट उंच अखंड पुतळा आज १००० वर्षापेक्षा जास्त कालखंडात आपल्यासोबत अनेक रहस्य घेऊन दिमाखात उभा आहे. बाहुबली ज्याला गोमटेश्वर असं म्हंटल जाते, ह्या पुतळ्याची निर्मिती साधारण इसवी सन ९८३ साली केली गेली आहे. दिगंबर म्हणजे पूर्ण नग्न स्वरूपात असलेला बाहुबली चा पुतळा पूर्णपणे एका दगडातून बनवला गेला आहे. ५७ फुट उंच आणि ४० फुट लांब असलेल्या ह्या पुतळयाच वजन तब्बल १००० टनापेक्षा जास्ती आहे (१ टन = १००० किलोग्राम). ज्या दगडातून हा पुतळा कोरला गेला असेल त्याचं वजन अंदाजे २००० टना पेक्षा जास्ती असावं. गोमटेश्वराचा हा पुतळा श्रवणबेळगोळ इथल्या टेकडीवर उभा आहे. ह्या टेकडीची जमिनीपासून उंची साधारण ४०० फुट आहे. पांढऱ्या ग्रॅनाइट पासून ह्या पुतळ्याची निर्मिती केली आहे. हा पुतळा उभारण्यासाठी लागणारा दगड कुठून आणला असेल हे अजूनही न उलगडलेलं रहस्य आहे. कारण ह्या पुतळ्याशिवाय अश्या प्रकारचा दगड ह्या टेकडीवर आणि आजूबाजूच्या परिसरात कुठेच आढळत नाही.

गोमटेश्वर च्या पुतळ्याचा दगड जर ह्या टेकडीवर नसेल आणि दुसरीकडून आणला असेल तर ते कसं शक्य आहे? आजही ह्या टेकडीचा चढ चढताना अनेकांना धाप लागते. दगडात कोरलेल्या पायऱ्यांवरून आजही अनेक लोक चढू शकत नाहीत. तर १००० वर्षापूर्वी तब्बल २००० टन वजनाचा दगड ह्या टेकडीवर कसा चढवला असेल? तज्ञांचा मताप्रमाणे हत्ती चा उपयोग त्याकाळी अवजड वस्तु वाहून नेण्यासाठी केला जात होता. पण हत्ती च्या वजन पेलवणाच्या काही मर्यादा आहेत. ह्या दगडाच्या अवाढव्य वजनाला पेलण्यासाठी ३००० पेक्षा जास्ती हत्तींची गरज लागली असेल. ते सुद्धा एकाचवेळेस सगळ्यांनी जोर लावण्याची गरज लागेल तेव्हा कुठे ह्या दगडाचं वहन शक्य होऊ शकलं असेल. पण ४०० फुट उंच अतिशय तीव्र उतार असलेल्या टेकडीवर ३००० हत्ती एका रेषेत उभे करून हा दगड टेकडीवर नेण अशक्य आहे. ह्यामुळे हा दगड इथवर कसा आणला त्यानंतर तो उभा कसा केला गेला? हे सर्व रहस्य आहे. ह्याचे तर्कसंगत उत्तर एकच येते कि असा वजनदार दगड वाहून नेण्यासाठी त्या काळात एखादं तंत्रज्ञान असावं. इकडे असलेल्या एका मूर्तीच्या हातात एक गोल दगडासदृश्य वस्तू हवेत तरंगताना कोरलेली आहे. मॅगलेव सारख्या चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर ह्या दगडाच्या वहनात केला गेला हे दर्शवणारी ही मूर्ती आहे का? कारण जर तसं असेल तर अश्या महाकाय दगडाचं वहन करता येण शक्य आहे. पण नक्की काय हे आजही रहस्य आहे.

बाहुबली (गोमटेश्वर) ची पूर्ण मूर्ती प्रमाणबद्ध आहे. ह्याच्या मधोमध जर एक रेषा आखली तर दोन्ही बाजू अगदी तंतोतंत जुळतात. पायावर कोरलेल्या वेलींच्या पानापासून सगळचं. इतकी प्रमाणबद्धता १००० वर्षापूर्वी एका मूर्तीत कशी काय आणली गेली असेल? ज्याकाळी तंत्रज्ञान आणि शिल्पकलेची अवजारं विकसित नव्हती त्याकाळी असा साचेबद्ध, प्रमाणबद्ध प्रचंड पुतळा घडवणं कस शक्य झालं असेल? त्याही पलीकडे हा पुतळा एकही चूक नसलेला आहे. ह्याच्या ओठांची ठेवण बघितली तर नाकाच्या खाली आणि ओठाच्या मध्ये असणारा भाग सुद्धा स्पष्टपणे कोरला गेला आहे. डोळे असो वा अगदी पायावर चढलेल्या वेलींच्या पानांच्या मधील शिरा सर्व काही अगदी तंतोतंत कोरलेलं आहे. १००० वर्षापूर्वी जेव्हा कोणतही तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना इतका रेखीव, सजीव पुतळा घडवण आजही एक रहस्य आहे.

बाहुबली (गोमटेश्वर) चा हा पुतळा १००० वर्ष उन, वारा, पाउस ह्याला पुरून उभा आहे. खरे तर इतक्या वर्षाच्या कालखंडात त्या दगडाची झीज व्हायला हवी होती. कारण हवेने, पावसाच्या पाण्याने, तपमानातील फरक ह्यामुळे दगडाची झीज होण क्रमप्राप्त आहे. पण १००० वर्षानंतर ही हा पुतळा त्याच तेजाने त्याचं सौंदर्य टिकवून आहे. इतिहासतज्ञ, संशोधक ह्यांनी हे कसं शक्य आहे ह्याचा अभ्यास केल्यावर जे सत्य समोर आलं ते भारताच्या अत्युच्य संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञान ह्याची साक्ष देणार आहे. गोमटेश्वर च्या ह्या पुतळ्यावर दर १२ वर्षांनी महामस्तकअभिषेक केला जातो. अतिशय पूर्वी पासून चालत आलेली ही प्रथा ह्या पुतळ्याच्या संवर्धनासाठी कारणीभूत ठरली आहे. दर १२ वर्षांनी ह्या पुतळ्यावर महामस्तकअभिषेकाच्या वेळेस पाणी, दुध, उसाचा रस, ह्या सोबत चंदन, हळद ह्यांच्या पावडरीचा अभिषेक केला जातो. १००८ कलशातून विशिष्ठ पद्धतीने बनवलेल्या पाण्यातून अभिषेक केला जातो. महामस्तकअभिषेक ह्या सोहळ्यात केल्या जाणाऱ्या अभिषेकामुळे ह्या दगडावर संरक्षक कवच किंवा लेप बनला जातो. ह्या लेपामुळे ह्या दगडाची तब्बल १००० वर्षानंतर ही झीज होऊ शकलेली नाही. ह्याचा परिणाम आपण ह्या पुतळ्यात बघू शकतो. मस्तकावरून अभिषेक होत असल्याने सगळ्यात जास्ती आवरण हे मस्तकावर आहे तर पायाच्या बाजूस हा अभिषेक पोहचत नसल्याने पायांच्या ठिकाणी दगडांची झीज स्पष्टपणे दिसून येते. त्याचवेळी मस्तक मात्र आजही तेजाने उजळून भारताच्या अजोड तंत्रज्ञानाची साक्ष पूर्ण जगाला देत आहे.

गोमटेश्वर अर्थात बाहुबली चा हा पुतळा भारताच्या समर्थ इतिहास, तंत्रज्ञान, विज्ञान, कला ह्याचं प्रतिनिधित्व करत तब्बल १००० वर्षाहून जास्ती काळ उभा आहे. हा पुतळा आपल्यासोबत अनेक रहस्य ही घेऊन उभा आहे. फक्त छिन्नी आणि हतोड्याने अशी अजोड, सुंदर, प्रमाणबद्ध कलाकृती शक्य नाही हे ह्या क्षेत्रातील तज्ञ ही मानतात. जर तस असेल तर हा पुतळा घडवताना अनेक अत्याधुनिक अवजारांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. ह्याचे पुरावे ह्या पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या दोन मूर्तीत दिसून ही येतात. आजच्या काळातील अवजारांप्रमाणे त्यांच्या हातात असलेल्या अवजारांचा मूर्ती घडवण्यासाठी केलेला सन्मान तर नसेल न? ह्याचं निश्चित उत्तर आत्ता देता येण शक्य नसलं तरी बाहुबली चा पुतळा आज आपल्यासोबत अनेक रहस्य लपवून आहे हे निश्चित.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय