भारतीय सेना आणि वैज्ञानिक यांनी अमेरिकेच्या सी.आय.ए ला पाजलेला अपयशाचा डोस.

११ मे १९९८ घड्याळात दुपारचे ३ वाजून ४५ मिनिटे झाल्याची वेळ झाली आणि बुद्ध हसला. १९७४ च्या अणुचाचण्या नंतर भारत अणुबॉम्ब बनवू शकतो असं जगातील अनेक देशांना वाटत होतं. १९९८ च्या चाचण्यांनी मात्र भारताला अण्वस्त्रधारी देशाचा दर्जा मिळवून दिला. १३ मे १९९८ ला अजून दोन अणुचाचण्या भारताने केल्या. त्यानंतर ह्या चाचण्या संपल्याचं भारताने घोषित केलं. १९९८ ला भारताने एकूण पाच अणुचाचण्या केल्या होत्या. त्यातल्या ४ ह्या फिशन स्वरूपाच्या एक फ्युजन स्वरूपातील होती. ह्या अणुबॉम्ब मध्ये भारताने वेपन ग्रेड प्लुटोनियम चा वापर केला होता. ह्या बॉम्ब ना शक्ती १ ते शक्ती ५ अशी नाव देण्यात आली होती. भारताने ह्यात एक फ्युजन टेस्ट केली होती. ज्या प्रमाणे सूर्यावर उर्जा दोन अणुमिलनातून निर्माण होते तश्याच पद्धतीने हायड्रोजन बॉम्ब मध्ये हे तंत्र वापरले जाते. फिशन मध्ये अणुविखंडन करून त्याचा बॉम्ब मध्ये वापर केला जातो.

१९७४ नंतर भारताने अणुविज्ञानात खूप प्रगती केली होती. ते विज्ञान तपासून घेण्याची गरज ८० च्या दशकात वैज्ञानिकांकडून केली जात होती. पण आंतराष्ट्रीय दबावाखाली ह्या चाचण्या घेण्याचं धारिष्ट्य राजकारणातील नेत्यांकडून घेतलं जात नव्हतं. १९९५ च्या आसपास भारताने ह्या चाचण्यांसाठी हालचाली सुरु केल्या. पण अमेरिकेच्या सी.आय.ए. ह्या गुप्तचर संस्थेला आपल्या हेरगिरी उपग्रहांमुळे भारत पोखरण ला काहीतरी करत आहे ह्याची चाहूल लागली. तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटन ह्यांनी भारतावर दबाव टाकत भारताला ह्या चाचण्या घेण्यापासून रोखलं होतं. पण भारताला त्याच्या चुका कळल्या. अमेरिका आपल्यावर नजर ठेवून आहे हे कळून चुकलं.

वैज्ञानिक
सैनिकी वेशात असलेले डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, आर. चिदंबरम, डॉक्टर अनिल काकोडकर पोखरण इकडे पाहणी करताना.

१९९८ साल उजाडलं. भारतात एक नवीन सरकार आलं. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि आर. चिदंबरम ह्यांनी भारताची वैज्ञानिक गरज तत्कालीन नेतृत्वाला पटवून सांगितली. भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळताच वैज्ञानिकांनी पुढच्या तयारीला सुरवात केली. १९९५ सालात झालेल्या चुकांपासून भारत शिकला होता. म्हणून १९९८ च्या ह्या चाचण्यांमध्ये कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ह्या पूर्ण मोहिमेची कल्पना फक्त १०-१२ लोकांना होती. ज्यात डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, आर.चिदंबरम, डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांच्यासह इतर काही महत्वाचे वैज्ञानिक होते. भारताच्या ह्या चाचण्यांची माहिती कोणालाच कळू नये म्हणून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अगदी सरकारमधील अनेक अधिकाऱ्यांना काय चालू आहे ह्याचा थांगपत्ता नव्हता.

भारतीय सेनेच्या ५८ इंजिनिअर रेजिमेंट ला ह्या चाचण्यांची तयारी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कर्नल गोपाल कौशिक ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या जागेवर काम करताना अमेरिकी उपग्रहाना फसवण्यासाठी अनेक उपाय केले गेले. ह्या पूर्ण मोहिमेला “बुद्ध हसला” असं नाव देण्यात आलं होतं. भारतीय सेनेसह, डी.आर.डी.ओ., डी.ए.ई., बी.ए.आर.सी., ए.एम.डी.ई.आर. ह्या सगळ्या संस्था अतिशय गुप्ततेने ह्या मोहिमेवर काम करत होत्या. भारताच्या वैज्ञानिकांना सुद्धा भारतीय सेनेचे गणवेश देण्यात आले होते. तसेच कोणताही मेसेज पाठवताना सांकेतिक भाषेत तो पाठवला जात होता. ह्या मोहिमेत असलेले सगळे वैज्ञानिक सांकेतिक भाषेतून एकमेकांशी संवाद साधत असत. ह्या सांकेतिक भाषेचा योग्य अर्थ काढणं हे वैज्ञानिकांना अणुचाचणी करण्यापेक्षा कठीण वाटत होतं.

उदाहरण द्यायचं झालंच तर…

An army officer manning the operations room was asked by Delhi: “Is Sierra serving whiskey in the canteen yet? Has the store arrived?” Decoded that meant: “Has the nuclear device been lowered in the special chamber (Canteen) in the shaft called White House (Whisky was its other name) and have the scientists (Sierra) started working on them?”

A little later Delhi was on line with another query: “Has Charlie gone to the zoo? And is Bravo saying prayers? Mike is on.” The decoded version: “Has the DRDO team (codenamed Charlie) gone to the deer park (the zoo or the control room)? And has the BARC team (codenamed Bravo) gone to the bunkers where the nuclear devices are being assembled (prayer hall). The dg, military operations (Mike) wants to know the progress.”

ज्या शूरवीर भारतीय सैनिकांमुळे अमेरिकेला बुद्धू बनवता आलं त्या भारतीय सेनेच्या शूरवीर सैनिकांसोबत डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, आर. चिदंबरम, डॉक्टर अनिल काकोडकर

इतकी कमालीची गुप्तता ह्या मोहिमेत बाळगण्यात आली होती. अमेरिकी उपग्रहांना चुकवून रात्रीच्या वेळी काम चालत असे. सकाळी सगळी उपकरण आणि यंत्रणा त्याच्या ठरलेल्या जागी परत आणून ठेवली जात असतं. जसं काही झालंच नाही. ह्या मोहिमेतील सगळे वैज्ञानिक वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. तिकडून भारतीय सेनेच्या वेशात त्यांना पोखरण इकडे भारतीय सेना आणून सोडत असे. जेणेकरून कोणालाच कोणताही सुगावा लागू नये.

ज्या खड्ड्यामध्ये अणुबॉम्ब ठेवणार होते त्यांना नावं ही अशीच वेगळी दिली गेली होती. फिशन बॉम्ब ज्यात होता त्याला “ताजमहल” तर थर्मोन्युक्लीअर डीव्हाईस असलेल्याला “ व्हाईट हाउस” तर अजून एकाला “कुंभकर्ण”. १ मे १९९८ ला सकाळी ३ वाजता मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातून (बी.ए.आर.सी.) पाचही बॉम्ब भारतीय सेनेच्या कर्नल उमंग कपूर ह्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना झाले. तिकडून भारतीय हवाई दलाच्या एका स्पेशल विमानाने जैसलमेर इथल्या आर्मी च्या तळावर नेण्यात आले. तिकडून ते पोखरण इकडे पोचवण्यात आले. १० मे १९९८ ला हे बॉम्ब त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी उतरवण्यात आले होते.

कमालीची गुप्तता बाळगताना भारतीय सेना, संशोधक आणि वैज्ञानिक ह्या सोबत राजकारणी ह्यांनी अमेरिकेला बुद्धू बनवून भारतात पुन्हा एकदा “बुद्ध हसला” होता. अमेरिकेच्या सी.आय.ए. चं हे अपयश आजतागायत त्याचं सगळ्यात मोठ अपयश मानलं जाते. ज्यात एक क्षणभर सुद्धा अमेरिकेला भारताच्या ह्या चाचण्यांचा सुगावा लागला नाही. ह्याचे सर्वात मोठे श्रेय हे भारतीय सेनेला जाते. ज्यांनी अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून भारतीय संशोधक आणि वैज्ञानिकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. आज ह्या गोष्टीला २० वर्षाचा काळ लोटला पण त्या हसलेल्या बुद्धाचा चेहरा न अमेरिका विसरू शकली आहे न अमेरिकेची गुप्तचर संघटना सी.आय.ए.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय