आर्थिक नियोजनातून श्रीमंती

गेल्या आठवडयात आरोग्यासंबंधी एक व्हाट्स ऍप मेसेज फिरत होता. डॉ.दीक्षित म्हणतात की ५५ मिनिटे जेवण करा आणि ऋजुता दिवेकर दर दोन तासांनी थोडे थोडे खात रहावे असे सांगतात.

आता नक्की कुणाला फॉलो करावे?

हा यक्ष प्रश्न ज्यांना खरंच स्वतःचा पृथ्वीवरचा भार कमी करण्याची मनीषा आहे त्यांना पडलाय. “No Meal Is Free” अशा आशयाची एक इंग्रजी म्हण प्रचलित आहे.

डॉ.दीक्षित आणि ऋजुता दिवेकर यांच काम जनजागृतीचं आहे. पण तुम्हाला त्यांना फॉलो करायचं असेल तर स्वतःची आरोग्य चाचणी करून तुम्हाला नेमकी कुठली मात्रा लागू पडेल?

यासाठी एका सल्लागाराची मदत घेणे त्यांना देखील अपेक्षित असेल. आपण लावला बोट आणि ढकलला पुढे म्हणजे जनजागृती केली असे होत नाही.

मिळकत, आर्थिक सल्ला आणि गुंतवणूक

  • मिळकत ही वेगवेगळ्या नावांनी संबोधली जाते. जसे धन वृद्धीसाठी, लक्ष्मी पूजनासाठी, पैसा बचतीसाठी, अर्थ संकल्पासाठी, वित्त ध्येयासाठी, रक्कम भांडवलासाठी, ऋण फेडण्यासाठी इत्यादी यादी लांबत जाऊ शकते.

  • या विविध संज्ञा समजून घेण्यासाठी आपण कुणाशी तरी सल्ला मसलत केली पाहिजे असे आपल्याला कधीच वाटत नाही. का?

  • कारण आपली (चांगली) आर्थिक परिस्थिती दुसऱ्याला सांगून कुठे त्याला जागे करत बसायचे, हा पहिला विचार आपल्या मनात येतो. जर याउलट परिस्थिती असेल तर आपण जामिनदार शोधण्यासाठी लगेच यादी बनवायला बसतो.

  • बहुतांशी आपलाआर्थिक सल्लागार आपले बँक खाते ज्या बँकेत असते तेथील कॅशिअर असतो.कारण त्याला तुमचे ठणठणीत आर्थिक आरोग्य योग्य प्रकारे माहित असते.

  • मग तोच तुम्हाला विविध मुदत ठेव योजना, विमा योजना, म्युचुअल फंड योजना याबद्दल माहिती देत असतो.

  • तो देत असलेली माहिती चुकीची असते का? अजिबात नाही. तो तुम्हाला गुंतवणूक योजनेची माहिती देतो, परंतु त्याला तुमचे ध्येय माहिती नसते.

  • जेव्हा तुम्हाला आर्थिक निकड भासते व तुमची गुंतवणूक काढण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला त्या योजनेला लागू असलेल्या अटींचा उलगडा होतो.

  • तोपर्यंत तुमच्या आर्थिक सल्लागाराची दुसऱ्या पदावर नेमणूक होऊन बदली झालेली असते.

 • मागे एकदा अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला२४% परताव्याचे आमिष दाखवूनमिस-सेलिंगकेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यासाठी तिला न्यायालयातून दाद मिळवावी लागली.

प्रगत देशातील गुंतवणूक

  • प्रगत देशांमधे तिथल्या गुंतवणूकदाराला सल्लागाराच्या मदतीशिवाय गुंतवणूक करता येत नाही. सल्लागार सर्वप्रथम इच्छित गुंतवणूकदाराचीजोखीमांक चाचणी (Risk Profiling)करून सरकारी विभागाला कळवतो.

  • गुंतवणूकदाराची माहिती आपल्याकडील आधार नंबरसारखी साठविली जाते. त्यामुळे त्या गुंतवणूकदाराला परवडेल अशीच गुंतवणूक विकणे इतरांना बंधनकारक असते.

 • भारतात बऱ्याचदा जोखीमांक चाचणी पानटपरी किंवा न्हाव्याच्या दुकानात घेतली जाते.कुणीतरी ज्याला आपण ओळखतही नसतो अशी व्यक्ती कुठल्याशा शेअर्समधे लाखभर रुपये ६ महिन्यात मिळविले अशी फुशारकी मारते आणि आपल्याला श्रीमंत बनण्याचे मार्ग खुणावू लागतात.

डिजिटल इंडिया (Digital India)

  • आज आपण डिजिटल युगात आहोत. त्यामुळे तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील व्यवहार (Transaction) करता येतो.

  • परंतुव्यवहार(Transaction) व गुंतवणूक(Investment) यातला फरक तुम्हाला ओळखता आला पाहिजे.

  • आता बऱ्याचशा वेबसाईट फुकटात आर्थिक सल्ला मिळवा व गुंतवणूक करा अशा जाहिराती महागडया कलाकारांना घेऊन करतांना दिसतात. आणि जर सगळं ऑनलाईन होत असेल तर त्यांचा प्रतिनिधी तुम्हाला का फोन करतो?

  • आर्थिक सल्लागार तुमच्या कुटुंबाशी विश्वासाचं नातं निर्माण करून तुमचे आर्थिक आरोग्य समजावून घेतो.तो वित्तीय गुंतवणूक व स्थावर गुंतवणूक यांची तुलनात्मक मांडणी करून तुमच्या वित्तीय ध्येय पूर्तीसाठी साहाय्य करण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्यासाठी केलेल्या गुंतवणुकांवर लक्ष ठेवून जास्तीचा परतावा कसा मिळेल? यासाठी नवीन गोष्टी शिकत असतो.

  • डॉक्टरांनी ५० रुपयांची औषधे लिहून देण्यासाठी घेतलेली १०० रुपये तपासणी फी आपण कुरबूर न करता देतो. कारण आजारपण दूर करून आपली जिवंत राहण्यासाठी धडपड सुरु असते. त्याप्रमाणे तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी दोन पैसे सल्लागाराला द्यावे लागले तरी तुम्हाला वावगे वाटायला नको. कारण तो तुम्हाला तुमचे इच्छित जीवन जगता यावे यासाठीआर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो.

 • तुमचा आर्थिक सल्लागार अनुभवाने कमी असला तरी चालेल परंतु अभ्यासू, विश्वासू व जबाबदार असला पाहिजे. आपण कितीही डिजीटल झालो तरी भावना समजून घेण्यासाठी फिजिकल अस्तित्व असलेलीच माणसं लागतील.

श्रीमंती म्हणजे काय? खूप पैसे मिळविणे म्हणजे श्रीमंती की आज मिळत असलेल्या मिळकतीतून भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या व पूर्ण होऊ शकतील अशा इच्छांची पूर्ती करण्यासाठी केलेले नियोजन म्हणजे श्रीमंती. तुम्हाला नेमकं श्रीमंत व्हायचंय की आर्थिक नियोजन करून बकेट लिस्ट पूर्ण करायची आहे? तुम्हीच ठरवा.

लेखन – अतुल प्रकाश कोतकर

सौजन्य : www.arthasakshar.com

वाचण्यासारखे आणखी काही…..

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.
आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय