महापात्रा… (कथा भाग – १)

आदित्यनाथ आपल्या खोलीत बसून देशी दारूचे घुटके घेतोय… दारु प्यायल्याशिवाय त्याला झोप लागतंच नाही. खोलीत उजेड तसा कमीच आहे. त्या मंद प्रकाशात आदित्यनाथचं ते पोट सुटलेलं शरीर अगदीच विद्रूप दिसतंय…

त्याचा अवतारही पाहण्यासारखा नसतोच. केस विस्कटलेले, मळलेला झब्बा आणि धोतर, जुनाट शबनब… नीट नेटकं राहणं हे त्याच्या गावी नव्हतंच… आता तो धोतर आणि बनियानवर बसलाय… त्याच्या बनियानला पडलेली भोकं उगाच तो गरीब असल्याचा आव आणत होती. समाजाने त्याला पूर्णपणे स्वीकारलं नसलं तरी तो गरीब मुळीच नव्हता. त्याच्या धंद्यात त्याला बरे पैसे मिळत होते. म्हणजे पौरोहित्याला धंदा कसा म्हणायचा हा प्रश्न कुणालाही पडेल. पण धंदाच तो…

पोटापाण्यासाठी करत असलेल्या व्यवसायाला धंदा म्हणायला कसली लाज. स्वतः आदित्यनाथ घरात आपल्या कामाचा उल्लेख धंदा असाच करायचा. तो आज जरा जास्तच विचार करतोय… तशा या गोष्टी त्याच्यासाठी नव्या नाहीतच… प्रेतं पाहण्यात त्याची हयात गेली. माणासाचा मृत्यू हा त्याच्या पोटापाण्याचा विषय होता… पण या कामामुळे तो बर्‍याचदा अस्वस्थ असायचा.

आजचंच घ्या ना… रात्री १० वाजता दोन माणसं आली आणि जवळजवळ त्यांनी त्याला खेचतंच नेलं. या सर्व गोष्टींची त्याला सवय होतीच. त्याच्या धंद्यामुळे अनेक भल्या बुर्‍या लोकांशी त्याचा संबंध यायचा… एकाच बाईकवर ट्रिपल सीट बसून ते स्मशानाकडे रवाना झाले. रात्री त्या भयाण रानातून जाताना त्याच्या काळजात धस्स झालं. हे खरं आहे की तो रस्ता त्याच्या ओळखीचा आहे. पण तो रस्ताच त्याला त्रास द्यायचा… रस्त्याच्या आजूबाजूला फिरती झाडे जणू त्याच्याकडे डोळे वटारुन पाहत असायचे आणि विचारायचे…. का? मग तो त्या झाडांकडे नजर चुकवून डोळे गच्च मिटून बसला. बाईक थांबली तेव्हा त्याने डोळे उघडले. यजमानाने सगळी तयारी करुन ठेवली होती. समोर एका १५ वर्षांच्या मुलीचं प्रेत होतं. काही क्षण त्या प्रेताला पाहून तो थबकला…

आधी त्याला वाटलं की माझी मिथिला तर नाही ना? मिथिला ही त्याची मुलगी. सध्या ती ९ वीत शिकतेय… तो जेव्हा जेव्हा वयात आलेल्या मुलीचे अंतिम संस्कार करायचा तेव्हा तेव्हा त्याला त्यांच्यात त्याची मिथिलाच दिसायची. त्याने आपले डोळे चोळले आणि पुन्हा प्रेताला निरखून पाहिलं. तर दुसरीच एक मुलगी पहुडली होती. तिच्याकडे पाहून त्याला दया आली… काय झालं असेल हिच्यासोबत? उत्तर भारतात बाल विवाह हा काही नवीन प्रकार नाही. बापाने मुलीचं बळजबरी लग्न करुन दिलं असेल आणि मुलीने आत्महत्या केली असेल किंवा ही मुलगी कुणासोबत तरी पळून गेली असेल आणि मग बापानेच तिचा जीव घेतला असेल… काय झालं असेल? तो विचार करु लागला…

त्याने धाडस करत एका माणसाला विचारायचं ठरवलं… तशी सगळीच माणसं अनोळखी होती. आदित्यनाथ हा गावात आणि आपसापच्या गावात प्रसिद्ध होता. कारण एखाद्या प्रेताची विधीप्रमाणे विल्हेवाट लावायची असेल तर लोक आदित्यनाथकडेच यायचे. तसे अजूनही दोन तीन जण होते. पण आदित्यनाथला रात्री १२ नंतर जरी बोलावलं तरी तो हाजीर होत असे. त्याचे त्याला चोख पैसे मिळायचे. आदित्यनाथने एका माणसाला विचारलं की नेमकी कशि काय गेली ही?

हा प्रश्न यजमानांच्या कानावर पडला. तो गुगगुरला, ए भडव्या… तुला तुझे पैसे मिळणार आहेत ना? मग गपगुमान तुझं काम कर… त्याच्यासोबत एक समजूतदार माणूस होता. त्याने यजमानाला समजवलं की ब्राह्मणाला शिव्या घालू नये. नाहीतर पाप लागेल… तसं यजमानाने नमतं घेतलं… त्याने विधीला सुरुवात केली. तेवढ्यात एक बाईक येऊन थांबली. त्या बाईकवरुन एक तरूण उतरला आणि आरडाओरड करु लागला… माझी सरीता… माझी सरीता… मला आता जगायचं नाही… मलाही तिच्यासोबत जाळून टाका. यजमानाचं डोकं सटकलं… तो पुढे गेला आणि त्या तरुणाच्या कानाखाली जोरदार आवाज काढला. तसा तो तरुण ढसाढसा रडू लागला… यजमान त्याच्यासोबत बोलत होता. ते आदित्यनाथला स्पष्ट ऐकू येत होतं… यजमान म्हणाला, अरे ही गेली तर दुसरी बघू तुझ्यासाठी.

जगात काय मुली नाही का? पण उगाच आरडाओरडा करु नकोस. लोकांना जर याबद्दल कळलं तर तुझाही जीव घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. आदित्यनाथने अंदाज बांधला की हा तरुण यजमानाचा नातेवाईक आहे. कदाचित मुलगा, पुतण्या किंवा भाचा असेल आणि ही मुलगी त्याची प्रेयसी किंवा बायको असेल. कदाचित यजमानानेच तिचा खून केला असेल. पण का?

कारण त्याला ह्या दोघांचं लग्न किंवा प्रेम मान्य नसेल. तेवढ्यात तो तरुण म्हणाला, दुसर्‍या मुलीशी लग्न केलं तर तुम्ही तिच्यावर सुद्धा बलात्कार कराल… तीही मरेल… यजमानाचा पारा चढला आणि त्याने त्या तरुणाचे कान चांगलेच लाल केले. तो मगासचा समजूतदार माणूस मध्ये पडला आणि यजमानाला त्याने आवरलं… त्या तरुणाला एका जीपमध्ये बसवून कुठेतरी नेण्यात आलं.

आदित्यनाथला त्या उत्तर भारतातल्या थंडीत सुद्धा घाम फुटू लागला. म्हणजे सासर्‍याने सूनेवर बलात्कार केला होता आणि त्याने तिला मारलं… किंवा तिने जीव दिला किंवा बलात्काराच्या वेदना सहन न होऊन ती मरण पावली… तो समजूतदार माणूस आदित्यनाथकडे आला आणि म्हणाला लवकर विधी आटपून एकदाचं प्रेत पेटवून दे… त्याच्या सांगण्याप्रमाणे त्या मुलीवर अंतिम संस्कार करण्यात आला. त्या समजूतदार माणसाने त्याच्या हातावर नोटांची बंडल ठेवली आणि त्या दोन माणसांनी त्याला पुन्हा घरी सोडलं…

दारु ढोसत असताना तो या विचाराक गर्क झाला होता. अचानक कुणाच्या तरी रडण्याचा आवाज त्याला ऐकू आला… बाबा…. बाबा मला वाचवा… हे लोक मला मारुन टाकतील… ओह्ह… खूप दुखतंय… खूप झोंबतंय… सहन होत नाहीये… बाबा… तो घाबरला… बेटा मी काही होऊ देणार नाही… मी आहे ना… आणि अचानक समोरुन एका स्त्रीचा आवाज आला… काय झालं? बरे आहात ना? त्याने विचारलं… कोण? मिथिला? समोरुन पुन्हा आवाज आला मी सिंधू… सिंधू ही आदित्यनाथची बायको.

उत्तर भारतीय सौंदर्याचं प्रतिक… या गचाळ माणसाला इतकी सुंदर बायको कशी भेटली याचं आश्चर्य सार्‍या गावालाच आहे. कधी कधी त्यालाही याचं आश्चर्य वाटतं… सिंधूने त्याच्यासाठी मुळे कापून आणलेत. सिंधूने ती डीश टेबलावर ठेवली आणि ती जायला निघाली. तर आदित्यनाथने तिला थांवबलं… विचारलं, मुलं काय करतायत? ती म्हणाली रात्रीचे १ वाजलेत. मुलं केव्हाच झोपली. मीही चाललेय झोपायला…

त्या मंद प्रकाशात सिंधूचं सौंदर्य अजूनही उजळलं होतं… आदित्यनाथमधला पुरुष आता जागा झाला होता… तो उठला त्याने तिला मागून गच्च मिठी मारली आणि आपले दोन्ही हात तिच्या उरोजावर नेले… ती नको… नको म्हणत असताना सुद्धा तो तिच्याशी लगट करत होता आणि अचानक त्याला तो आवाज पुन्हा ऐकू आला… नको नको… खूप त्रास होतोय… दुखतंय… झोंबतंय…. त्याने सिंधूला सोडलं… तशी ती बाहेर निघून गेली… तो आवाज आता अगदीच स्पष्ट ऐकू येत होता… त्याने गटागटा दारु संपवली… पण आता तर चारही दिशेने आवाज येऊ लागला… त्याने आपल्या कानावर हात ठेवला… पण आवाज थांबेच ना…

क्रमशः

आणखी काही कथा…

स्वातंत्र
मार्ग…


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।