जीसॅट ११ भारताचा इंटरनेट स्पीड बदलवणारा उपग्रह..

भारतीय वेळेप्रमाणे आज सकाळी २ वाजून ७ मिनिटांनी भारताच्या आजवरच्या सगळ्यात शक्तिशाली उपग्रहाने अवकाशात यशस्वी उड्डाण केलं. ५८५४ किलोग्राम इतकं प्रचंड वजन असणारा जीसॅट ११ उपग्रह म्हणजे इस्रो च्या आजवरच्या प्रवासातील सगळ्यात मोठा उपग्रह. एरियन स्पेस च्या एरियन ५ रॉकेट द्वारे फ्रेंच गयाना इकडून हा उपग्रह प्रक्षेपित केला गेला. २९ व्या मिनिटाला मुख्य रॉकेटने जीसॅट ११ उपग्रहाला जिओ ट्रान्स्फर ऑर्बीट मध्ये स्थापन केले. त्यानंतर इस्रो च्या मास्टर कंट्रोल सेंटर हसन, कर्नाटक ने उपग्रहाचं सारथ्य आपल्याकडे घेताच भारताच्या अवकाश इतिहासात अजून एक सोनेरी पान जोडलं गेलं आहे. पुढल्या ५ दिवसात उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बीट मध्ये त्याच्या ठरलेल्या ठिकाणी स्थापन केला जाईल. सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्यावर हा उपग्रह भारताचा इंटरनेट स्पीड बदलावायच्या आपल्या कार्याला सुरवात करेल.

इस्रोचं बाहुबली रॉकेट जी.एस.एल.व्ही मार्क ३ हे सध्या ४ टन किंवा ४००० किलोग्राम पर्यंत वजनाचे उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बीट मध्ये प्रक्षेपित करण्यात सक्षम आहे. ६ टन वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या रॉकेट वर इस्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे जीसॅट ११ सारख्या प्रचंड ५.८ टन वजनाच्या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यासाठी इस्रो ला एरियन स्पेस ची मदत घ्यावी लागली आहे. असं म्हंटल जातं की दुसऱ्या देशातून सोडण्यात येणारा हा अखेरचा उपग्रह असेल ह्या नंतर इस्रो स्वबळावर भारताच्या भूमीवरून असे महाकाय उपग्रह सोडण्याची क्षमता सिद्ध करेल.

१२०० कोटी रुपये किंमत असणारा हा उपग्रह भारताच्या इंटरनेट चा चेहरा येत्या काळात बदलवून टाकणार आहे. हा उपग्रह इतका मोठा आहे की ह्याचे सोलार पॅनल जवळपास ४ मीटर पेक्षा मोठे म्हणजे एखाद्या सेदान श्रेणीतील गाडीपेक्षा मोठे आहेत. १५ वर्ष आयुष्य असलेल्या या उपग्रहामुळे इंटरनेट स्पीड हा १०० गिगाबाईट प्रती सेकंद इतका वेगवान होणार आहे. ह्यावर ४० ट्रान्सपोंडर के.यु. आणि के.ए. बँड चे आहेत त्यामुळे हाय बँड विड्थ कनेक्टीव्हिटी शक्य होणार आहे. जीसॅट ११ हा उपग्रह सध्याच्या सगळ्या इस्रो आणि भारतीय उपग्रहांपेक्षा ६ पट जास्त शक्तिशाली आहे. जीसॅट ११ हा ह्या सिरीज मधला तिसरा उपग्रह असून आपली इतर भावंड म्हणजेच जीसॅट १९, जीसॅट २९, जीसॅट २० मिळून भारतात १०० गिगाबाईट प्रती सेकंद हा वेग गाठला जाणार आहे. ह्यामुळे शहरी आणि खेडेगाव ह्यामध्ये असलेली डिजिटल दरी प्रचंड कमी होणार आहे.

हा उपग्रह खरे तर ह्या वर्षाच्या सुरवातीला प्रक्षेपित केला जाणार होता पण ऐनवेळी इस्रो ने पुन्हा एकदा त्याला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. जीसॅट ६ ए हा उपग्रह नियंत्रण सुटल्याने अवकाशात भरकटला होता. त्या स्थितीमध्ये जीसॅट ११ च्या बाबतीत काही गोंधळ होऊ नये म्हणून इस्रो ने ही खबरदारी घेतली होती. इस्रो चा गेल्या महिन्याभरातील आढावा घेतला तर तब्बल तीन प्रोजेक्टवर इस्रो काम करत होती. तिन्ही ठिकाणी यशाची चव इस्रो ने आपल्या मेहनतीने चाखली आहे. आधी भारताच बाहुबली रॉकेट जी.एस.एल.व्ही डी ३ चं प्रक्षेपण त्या पाठोपाठ ३१ परदेशी आणि भारतीय उपग्रहांच प्रक्षेपण व आज लगेच भारताच्या सगळ्यात शक्तिशाली उपग्रहाचं सफल परीक्षण. भारताचा अवकाश क्षेत्रातील प्रगतीचा आलेख येत्या काही वर्षात प्रचंड वेगाने वर जातो आहे. हे संपंत नाही तोच जानेवारी महिना चांद्रयान २ ची मोहीम घेऊन येत आहे. तूर्तास जीसॅट ११ च्या सफल प्रक्षेपणासाठी इस्रो च्या सर्व अभियंते आणि वैज्ञानिकांच अभिनंदन.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय