सिंगल पेरेंट

किरणच्या डोळ्या समोर अंधारी आली.

डोळे पहात आहेत ते खरचं आहे कि भास? तीने स्वतःला चिमटा काढला “आईगं ” म्हणजे खरंच आहे हे.

रवि आणि त्याच्या हातात हात घालून चालणारी ती. कोण असावी? ऑफिस मधली कि कुठे पार्टीत ओळख झाली असेल? कुठं का असेना पण आपला संसार मात्र क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्या सारखा कोसळला.

तेव्हढ्यात अरुणाने हाक मारली “किरण अगं तुझं लक्ष कुठे आहे . हा रंग बघ साडीचा, अस्मानी मस्त आहे ना?”

गदा गदा हालवण्याने किरण भानावर आली” अरुणा चल घरी जाऊया निदान मी तरी जाते मला कससंच व्हायला लागलंय घरी जाऊन पडते जरा” अरुणा काही बोलायच्या आत किरण गाडीत बसली शोफारला गाडी घराकडे न्यायला सांगितली.

डोळे मिटून सीटवर मागे डोकं टेकवलं क़ाय वाढून ठेवलंय आपल्या नशिबात आणि का? कुठे चुकले मी?

माझ्याच नशिबात हे भोग का? लहानपणा पासून आई, माझे बाबा कुठे आहेत. सगळ्या मुलांचे आई-बाबा एकत्र राहतात माझे बाबा का राहत नाहीत आपल्या जवळ? किती तरी वर्ष उत्तर मिळालंच नाही.

एकदा फारच हट्टाला पेटले तेव्हा आईने सांगितलं. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. लग्नाच्या आणा भाका घेतल्या पण जेव्हा त्याच्या घरी कळल तेव्हा कडाडून विरोध झाला. भेटायला बंदी घातली आणि त्याला ताबडतोप अमेरिकेला पाठवण्यात आलं.

श्रीमंत आई वडिलांचा नेभळट मुलगा!! पण हे समजायला खूप उशीर झाला होता प्रेमात इतके पुढे गेले होते कि त्याच्या खुणा हिच्या अंगावर दिसू लागल्या. आपल्याला दिवस गेलेत कळल्यावर आजी आजोबांनी खूप आरडा ओरडा केला अबोर्शन कर म्हणून मागे लागले पण मन तयार झालं नाही. एकटी ने राहायचा निर्णय घेतला आणि तुझा जन्म झाला.

किरण सुन्न होऊन हे ऐकत होती. आयुष्य भर आई सिंगल पेरेंट म्हणून राहिली. आपल्याला बाबांची उणीव जाणवायची इतर मैत्रिणींचे वडील त्यांचे लाड करायचे तेव्हा किरण एकटीच बसून रडायची. जस् जशी मोठी झाली तिने एक मनाशी पक्क ठरवलं. आईने जी चूक केली ती आपण करयची नाही. रीतसर लग्न करयचं. प्रेम बीम कुछ नहि!!! जेंव्हा रविचं स्थळ आलं नाव ठेवयला जागाच नव्हती मोठ्या हुद्यावर घर दार गाडी घराणं हि चांगलं. झट पट लग्न झालं.

किरणने ठरवलंच होतं अगदी सुखाने संसार करयचा. रवीच्या सुखात सुख मानायचं. आणि आज तर किरण फारच खुश होती तिला बाळाची चाहूल लागली होती. हि गोड बातमी रविला कधी एकदा सांगते असे झाले होते. रविला ऑफिस मधून यायला खूप उशीर व्हायचा.

आज ऑफिसला दांडी मारून अरुणाबरोबर शोपिंगला आली होती रवी साठी सरप्राइज गिफ्ट घेण्यासाठी पण तिलाच जीवघेणं सरप्राइज मिळालं…..

किरण घरी आली सोफ्यावर धपकन बसली. काय करायचं…. खरंच त्या दोघांच एक मेकांवर प्रेम असेल? त्यांचे गुंफलेले हात आणि गुंतलेली नजर तर हेच सांगत होती कि ते एकमेकांच्या किती जवळ आहेत. उद्या त्याने घटस्फोट मागितला तर?

खूप रडून झाल्यावर किरणने आपल्या ओटीपोटावरून हात फिरवला म्हणाली “बाळा मला क्षमा कर आजचा तुझा शेवटचा दिवस. मी आयुष्यभर बिन बापाची वाढले सिंगल पेरेंटचदुःख मी आईच्या डोळ्यात बघितलं आहे. मी भोगलंय ते तुला भोगू द्यायचं नाहीये बाळा. उद्या तुला ह्या जगातून जायचंय good byee” भरल्या कंठाने किरणने उद्याची अबॉर्शन ची वेळ घेतली. कर्कश्य आवाजात बेल वाजली शांत मानाने किरणने घरी आलेल्या रवी साठी दार उघडले….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय