कैलास पर्वताला कोणीही सर करू शकत नाही असे म्हणतात ते खरे आहे का?

कैलास पर्वत ट्रान्सहिमालीयन आणि चीन च्या तिबेट भागात वसलेला आहे.

६,६३८ मीटर (२१,७७८ फुट) इतकी उंची असलेला हा पर्वत जगातील एक रहस्यमयी पर्वत मानला जातो.

ह्याला कारण त्याचं अनेक धर्मामधील पवित्र स्थान आणि त्या जोडीला त्याच्या भोवती अनुभवायला येणाऱ्या गोष्टींमुळे त्याचं रहस्यमयी रूप अजून गडद झालं आहे.

एवरेस्ट हे जगातील सर्वाधिक उंचीचं शिखर (८८५० मीटर) आजवर अनेक लोकांनी सर केलं आहे.

पण कैलास पर्वत आजही सर करू शकलेलं नाही.

जर ६६३८ मीटर पेक्षा जास्त उंचीचं शिखर सर केलं जातं तर ६६३८ मीटर उंची असलेलं कैलास पर्वत सर करायला अडचण यायला नको.

पण कैलास पर्वत हा इतक्या रहस्यांनी वेढलेला आहे की आज तिकडे जाणं हेच पूर्णतः निषिद्ध अथवा बंद केलं गेलं आहे.

कैलास पर्वत

कैलास पर्वताला बोन, बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मात अतिशय पावित्र्याचं स्थान आहे.

हिंदू धर्मात कैलास पर्वत हा आपल्या प्रकृतीचा निर्माता आणि त्या प्रकृतीला नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या श्री. शंकराचं निवासस्थान मानलं गेलं आहे.

त्यामुळेच कैलास पर्वतावर चढाई करणं हे हिंदू धर्मात निषिद्ध मानलं गेलं आहे.

इतर धर्मांच्या धार्मिक प्रथेतही कैलास पर्वत हा कोणत्याही मानवासाठी निषिद्ध मानला गेला आहे.

पण असं असताना १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरवातीला जगातील अनेक साहसी गिर्यारोहकांनी हे शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. ह्यातील एक कर्नल विल्सन ह्यांनी शिखरावर जातानाचा अनुभव आपल्या शब्दात लिहून ठेवला आहे. ते म्हणतात…

Just when I discovered an easy walk to the summit of the mountain, heavy snow began to fall, making the ascent impossible.

Colonel Vilson

ह्या शिवाय रशियन गिर्यारोहक सर्जी क्रिस्तीकोव ला आलेला अनुभव तर खूपच विलक्षण आहे, सर्जी म्हणतो….

When we approached the foot of the mountain, my heart was pounding.

I was in front of the sacred mountain, Mount which says it cannot be beaten.

I felt extremely emaciated and suddenly I became captivated by the thought that I do not belong on this mountain, it must necessarily come back! As soon as we started the descent, I felt liberated.

Sarji Christokove

कैलास पर्वताला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. असं म्हंटल जातं.

अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते. यातील सत्यासत्तात जाणण्यासाठी आजवर बरेच जणांनी प्रयत्न केले.

अनेक रशियन संशोधकांनी कैलास पर्वताचा खूप अभ्यास केला.

१९९९ साली रशियन नेत्ररोग तज्ञ एरनेस्ट मुलाडेशेव ह्यांनी कैलास पर्वताचा अभ्यास करण्यासाठी एक मोहीम आखली.

ह्या मोहिमेत जीओलॉजी, इतिहास, फिजिक्स मधील अनेक तज्ञ सहभागी होते.

कैलास पर्वताच्या पायथ्याशी अनेक महिने अभ्यास केल्यावर त्यांनी मत मांडल की कैलास पर्वत एक मानवनिर्मित पिरॅमिड आहे.

ह्याच्या भोवती अनेक लहान पिरॅमिड ची श्रुंखला असून हे सगळं एका असामान्य घटनेचा भाग आहेत. एरनेस्ट ह्यांनी लिहिलं आहे….

It is hard for me to discuss this topic from a scientific point of view.

But I can quite positively say that Kailash complex is directly related to life on Earth, and when we did a schematic map of the ‘City of the Gods,’ consisting of pyramids and stone mirrors, we were very surprised – the scheme was similar to the spatial structure of DNA molecules.

Ernst Muldashev

कैलास पर्वताला सगळ्या जगाचं केंद्रबिंदू मानलं गेलं आहे.

फिजिकल जग आणि स्पिरीच्युअल जग जिकडे मिळते त्या स्वर्गाचा रस्ता कैलास पर्वतावर आहे असे म्हंटले जाते.

म्हणून ह्या पर्वताचं अनन्यसाधारण महत्व जगातील बिलियन लोकांच्या मनात आहे.

२००१ साली चीन सरकारने एका स्वीडनच्या टीम ला ह्या पर्वतावर मोहीम आखण्यास परवानगी दिली होती.

पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलास पर्वताचं पावित्र्य लक्षात घेता त्या दबावाखाली चीन सरकारला अश्या मोहिमांवर कायस्वरूपी बंदी आणावी लागली.

कैलास पर्वत

कैलास पर्वताच्या बाजूला दोन जलायश आहेत.

त्यातील एक आहे ४५९० मीटर (१५,०६० फुट) उंचीवर असलेलं जगातील सर्वाधिक उंचीवरचं मानसरोवर.

४१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं, ९० मीटर खोल असलेलं हे सरोवर गोल आहे.

ह्यातून ब्रह्मपुत्रा, इंड्स, घगहारा ह्या नद्यांचा उगम होतो.

मानसरोवरचं पौराणिक महत्व खूप आहे. पण त्याच्या फक्त ३.७ किलोमीटर अंतरावर असलेलं राक्षसतळं मात्र ह्या पेक्षा पूर्णतः वेगळं आहे.

राक्षसतळं हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं गेल्याची कथा आहे. त्यामुळे ह्याचं पाणी खारट आहे.

ह्याच्या उत्तरेकडून सतलज नदीचा उगम होतो. दोन्ही जलाशय इतक्या जवळ असून पण ह्या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे.

राक्षसतळ्यात कोणत्याही जलचर आणि जल वनस्पतीचं अस्तित्व आढळून येत नाही.

ह्याचे पाणी नेहमी अशांत असते. तर मानसरोवराचं पाणी अतिशय शांत आहे.

कितीही वारे वाहिले आणि हवेचा जोर असला तरी मानसरोवरा मधील पाणी नेहमीच शांत रहाते.

विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तर शोधू शकलेलं नाही.

कैलास पर्वताचा एकूणच आकार, त्याचं वातावरण तसेच तिथे येत असलेले अनुभव हे सध्या तरी एक रहस्य आहे.

कैलास पर्वताचा उल्लेख अगदी वेदांमध्येही केला गेला आहे.

त्यातही कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य असल्याचं म्हंटल गेलं आहे.

हे शिखर तिबेट इथल्या मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याचं बोललं जातं. पण त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे.

१९८० ला चीन सरकारने प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर, ज्यांनी जगातील ८००० मीटर (२६,००० फुट) पेक्षा जास्ती उंचीची सगळी म्हणजे १४ शिखर सर केली आहेत त्यांना कैलास पर्वतावर आरोहण करण्यासाठी बोलावलं होतं.

पण त्याने ते निमंत्रण नाकारलं होतं. राईनहोल्ड मिसनेर ह्यांनी एकदा म्हंटल होतं….

If we conquer this mountain, then we conquer something in people’s souls. I would suggest they go and climb something a little harder. Kailas is not so high and not so hard.

Reinhold Messner

असा हा पवित्र, अदभूत कैलास पर्वत आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन आजही हिमालयात उभा आहे.

कैलास मानसरोवर यात्रा आजही अनेक खडतर यात्रांपेकी गणली जाते.

ह्याचं कारण ह्याच्या आसपास न कोणता विमानतळ आहे, न रस्ते आहेत, न कोणतं बंदर आहे.

इकडे जायचं असेल तर त्या निसर्गाला शरण जाऊन खडतर पायी प्रवास केल्यावरच ह्या अगम्य पर्वताचे दर्शन मानवाला होते. अश्या ह्या रहस्यमयी पर्वताला माझा नमस्कार.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय