प्र_ण_यशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेलं खजुराहो चं कंदारिया महादेव मंदिर!

हिंदू धर्मात तीन देवांना खूप महत्व दिलं गेलं आहे. हे तिन्ही देव म्हणजे सृष्टीचे रचनाकार, निर्माणकर्ता आणि त्याचे विनाशक म्हणून प्रसिद्ध आहेत.

ह्यातील सृष्टीचा निर्माता म्हणून ब्रह्मदेवाला मानलं जातं. तर विष्णू देवाला ह्या सृष्टीचे सारथ्य किंवा त्याला चालवण्याची जबाबदारी दिली गेली आहे.

तर तिसरा सगळ्यात महत्वाचा देव म्हणजे शंकर, शिव, महादेव. शंकराला सृष्टीचा विनाशक पण त्याच वेळी सृष्टीचा जनक म्हणून सगळ्यात जास्त मान सन्मान दिला गेला आहे.

शंकराला ह्या विश्वाची निर्मिती करणारा म्हणून बघितलं जाते. आजच्या विज्ञानाप्रमाणे ह्या विश्वाची निर्मिती आणि शेवट हा सिंग्युलॅरिटी मधून होईल.

विश्वाच्या विनाशातून अजून एक बिंग बँग होऊन पुन्हा एक नवीन विश्व तयार होईल ह्यावर अनेक संशोधकांच एकमत आहे.

हिंदू धर्मात ह्या सिंग्युलॅरिटी कडे नेणारा आणि त्यातून पुन्हा एका नवीन सृष्टीचा जन्म करणारा देव म्हणून शंकर महादेवाचं महत्व आणि स्थान सगळ्यात मोठ आहे.

म्हणूनच पौराणिक काळात त्याला सगळ्या देवांमध्ये वरचं स्थान दिलं आहे. शंकराची पूर्ण भारतात असलेली मंदिरं ही अवाढव्य, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, स्थापत्यशास्त्र, गणित त्या काळची संस्कृती ह्यांची सगळ्यात मोठी विरासत असलेली बांधली गेली.

काळाच्या कसोटीवर उतरून ही मंदिरं येणाऱ्या अनेक पिढ्यांना संस्कृतींना प्रेरणा देतील अशी बांधली तर गेलीच पण आज १००० पेक्षा जास्त वर्षानंतर त्याचं सौंदर्य, त्यातलं विज्ञान, गणित आणि कला त्या सोबत प्रत्येक शास्त्र आजही आपल्याला स्तिमित करते हा वारसा आपल्या देशात आणि आपल्या पूर्वजांनी निर्माण केला ह्याचा अभिमान आपल्याला नेहमीच असायला हवा.

शंकराच्या ह्या अद्भुत प्रतिभेचा वारसा आजही आपल्याला दाखवणारं तब्बल १००० वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून निसर्गाच्या उन, वारा, पाउस ह्यांना पुरून उरत उभं असलेल एक मंदिर म्हणजे आपल्या संस्कृतीचं अभिजात सौंदर्य आहे.

कंदारिया महादेव मंदिर जे की पूर्ण विश्वात खजुराहो मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

खजुराहो

युनोस्को चा जागतिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे मंदिर म्हणजे कलेचा एक अप्रतिम अविष्कार आहे.

खजुराहो इकडे असलेलं हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे ते इथे असलेल्या प्र_ण_य शिल्पांनी.

१८३० मध्ये ब्रिटीश अधिकाऱ्याने शोध लावेपर्यंत अनेक वर्ष हे मंदिर प्र_ण_य करत असतानाच्या शिल्पांमुळे अनेक शतकं समाजाकडून दुर्लीक्षित झालं.

पण खरे तर माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य अंग असलेल्या से_क्स_ला / प्र_ण_याला इतक्या सुंदर पद्धतीने जगात दुसरीकडे कुठे चित्रित केलं गेलेलं नाही व आज हीच शिल्प ह्याची ओळख बनली असली तरी ह्या मंदिराच्या एकूण शिल्पांपैकी १०% ही शिल्प आज शिल्लक नाहीत.

खजुराहो त्या काळी चांडेला राजपूत साम्राज्याची राजधानी होती. राजा गांडा ह्याने १०१७ ते १०२९ मध्ये कंदारिया महादेव मंदिराची निर्मिती केली.

९ व्या ते १२ व्या शतकापर्यंत चांडेला साम्राज भारताच्या मध्यापासून ते उत्तरेपर्यंत पसरलेलं होतं. ह्या काळात ह्या परिसरात जवळपास ८५ मंदिरांची निर्मिती केली गेली.

ज्यातील आता फक्त २० शिल्लक आहेत. ह्यातील सगळ्यात भव्यदिव्य मंदिर म्हणजेच कंदारिया महादेव मंदिर.

कंदारिया महादेव मंदिर हे ६५०० स्वेअर फुट जागेवर उभारलेलं असून जमिनीपासून ११७ फुट उंच आहे. हे मंदिर सरळ सरळ जमिनीवर न बांधता एका प्लाटफॉर्म वर बांधल गेलं आहे.

ह्याची उंची जवळपास ३ – ४ मीटर इतकी आहे. हा पूर्ण प्लाटफॉर्म ग्रानाईट दगडाने बांधला गेला आहे. ग्रानाईट हा दगड आजच्या वैज्ञानिक भाषेत प्रचंड कठीण समजला जातो.

Granite is nearly always massive (i.e., lacking any internal structures), hard and tough. The average density of granite is between 2.65 and 2.75 g/cu .cm. (165 and 172 lb/cu ft),[3] its compressive strength usually lies above 200 MPa, Granite is made up of three minerals: quartz, feldspar, and mica. It is a hard, crystalline rock, which is very resistant to erosion.

ज्या भव्यतेची निर्मिती आपल्याला निर्माण करायची आहे त्यासाठी लागणारा बेस पण तितकाच मजबूत आणि काळाच्या कसोटीवर हजारो वर्ष टिकून राहणारा हवा ह्यासाठी ग्रानाईट सारख्या दगडाचा वापर हा आपल्याला मंदिराच्या निर्माणातील दूरदृष्टी दाखवून देतो.

कोणतंही मंदिर बांधताना त्यात अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला जातो.

पण हे सगळं करत असताना मंदीराचं सौंदर्य आणि ह्या अनेक गोष्टी ह्यांची सरमिसळ अश्या प्रकारे केली जात होती की ह्या सगळ्या गोष्टी एकाच मंदिराच्या रचनेचा भाग आहेत असं बघणाऱ्याला वाटावं.

कंदारिया महादेव मंदिर हे पण अश्याच रचनेचा वापर करून बांधलं गेलं आहे. मंदिराची रचना आत शिरताना अर्धमंडपा कडून मंडपाकडे तिकडून पुढे गर्भगृहाकडे केली असून गर्भगृहात शंकराचं लिंग बसवण्यात आलं आहे.

ह्या पूर्ण रचना सगळ्या बाजूने अतिशय सुंदर शिल्पांनी आणि अनेक रचनांनी वेढलेल्या आहेत.

ह्या रचनांमध्ये माणसाच्या चार प्रमुख तत्वांचा समावेश केला आहे. ज्यात काम, अर्थ, धर्म आणि मोक्ष ह्यांचा समावेश आहे.

ह्या मंदिराची रचना शंकराचं स्थान असणाऱ्या कैलास पर्वता प्रमाणे केली आहे.

मुख्य शिखर हे ८४ इतर शिखरांनी वेढलेलं आहे. वरच्या मुख्य शिखराचा आकार हा कैलास पर्वताप्रमाणे केलेला आहे.

हे सगळं जमिनीपासून ११७ फुट उंच आहे. हे सगळं बाधकाम हे बलुआ दगड म्हणजेच सॅण्डस्टोन मध्ये केलं गेलं आहे.

हा दगड का वापरला गेला ह्यामागे ही तंत्रज्ञान आहे. आजचं विज्ञान बलुआ दगड म्हणजेच सॅण्डस्टोन बद्दल सांगते.

sandstone is composed of quartz or feldspar (both silicates) because they are the most resistant minerals to weathering processes at the Earth’s surface, as seen in Bowen’s reaction series.

इतके दगड उपलब्ध असताना मंदिराच्या निर्माणासाठी बलुआ आणि त्याच्या बेस साठी ग्रानाईट चा वापर करताना त्याकाळी ह्या दगडांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला गेला होता.

त्यानंतर काळाच्या कसोटीवर उतरणारे हे दगड मंदिराच्या निर्माणासाठी वापरले गेले. इकडे वापरण्यात आलेल्या दगडांच्या शिळा ह्या प्रचंड वजनाच्या आहेत. काहींच वजन हे २० टन ( २०,००० किलोग्राम) च्या घरात आहे.

मंदिरात उभं केलेलं संपूर्ण बांधकाम हे कोणत्याही मोर्टार म्हणजेच सिमेंट किंवा इतर कोणत्याही वेगळ्या मटेरीअल ने जोडण्यात आलेलं नाही.

तर ह्या प्रचंड शिळा एकमेकात मोर्टाईज – टेनंन ह्या जोडण्याच्या पद्धतीने एकमेकात अश्या पद्धतीने गुंफण्यात आल्या आहेत की त्यांना त्यांच्या जागी स्थिर ठेवण्याचं काम हे गुरुत्वाकर्षणाने तोललेलं आहे.

ह्यातील प्रत्येक रचनेची शिखरं ही एका सरळ रेषेत आहेत. हे सर्व करताना ह्या मंदीराचं सौंदर्य कुठे डागाळणार नाही ह्याची काळजी घेतली गेली आहे.

खजुराहो इथलं कंदारिया महादेव मंदिर हे फक्त से_क्स किंवा प्र_ण_याशी निगडीत नाही.

त्यात प्रचंड तंत्रज्ञान, विज्ञान, स्थापत्यशास्त्र आणि त्याचवेळी कैलासपती शंकराच्या भव्य दिव्य प्रचीतीचं दर्शन देणारं आहे. आज कंदारिया महादेव मंदिराचा वारसा आपण हरवून बसलो आहोत.

आज खजुराहो मधलं कंदारिया महादेव मंदिर प्रसिद्ध आहे ते जगातून प्र_ण_य शिल्प बघण्यासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पण ह्या मंदिराच्या निर्मितीत जे विज्ञान, तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे ते काळाच्या पुढचं आहे.

त्यापलीकडे से_क्स सारख्या विषयाला नुसत्या शिल्पातून अ_श्ली__ल न बनवता सौंदर्यातून एक दोन नाही तर तब्बल हजार वर्ष दाखवण्याच कसब साधणाऱ्या त्या अनामिक कलाकारांना माझा कुर्निसात.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय